आज पेपरात बातमी वाचली, 'भरतीच्या वेळी पाण्यात बुडून प्रेमी युगुलाचा मृत्यू', 'प्रेम उद्यानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर..',
म्हटलं... बघुया तर हा प्रश्न खरोखर ऐरणीवर आणून.... म्हणूनच हा काथ्याकूट प्रपंच...
मुंबईतल्या तरुणाईसाठी खरोखरच हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या दांभिक मुजोरपणापुढे नमून मुंबईचे पोलीसखाते जणु काय मुंबईतली सगळी गुन्हेगारी नष्ट झाल्यामुळे, आता दुसरे काहीच काम नसल्याच्या थाटात संस्कृतीरक्षणाचा विडा उचलल्याप्रमाणे प्रेम करणा-यांवर उठले आहे. भारतासारख्या देशात सार्वजनिक ठिकाणी वावरणा-या प्रेमी युगुलांवर पोलीसी कारवाई केली जाते. मुंबईत लेडीज बार आहेत, पण प्रेम करणा-या तरुणांसाठी अशी निवांत जागा नाही, की जिथे एकमेकांबरोबर प्रेमाच्या चार गुजगोष्टी करता याव्यात. रस्त्यावर हातात हात घालून चालणा-या जोडप्याकडे आपल्या संस्कृतीरक्षकांच्या देशात शंभर नजरा वळून वळून बघतात. एकाच वेळी ग्लोबल आणि संकुचित अशा द्विधा मनस्थितीत असलेले काय संस्कृतीचं रक्षण करणार? अहो ह्या संस्कृतीरक्षकांच्या पूर्वजांच्या गेल्या पाचशे पिढ्यांनी प्रेम केले नसते तर आज हे अस्तित्त्वात तरी असते का ?
ह्यावर कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या ओळी आठवतात,
त्याने प्रेम केलं, किंवा तिने प्रेम केलं, म्हणून तुमचं काय गेलं ?
तुमच्या आमच्या पूर्वजांनी, दुसरं काय केलं ?
तुम्हाला काय वाटतं, प्रेमी युगुलांसाठी खरोखर अशी ठिकाणे किंवा उद्याने असावीत का ?
याबाबत, मिपाकरांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत...
आपला
हैदर अली
(तथाकथित संस्कृतीचा टेंभा मिरवणा-यांचा कट्टर विरोधक)
वाचने
5433
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवश्य असावीत!
हे प्रेम करायचे आहे का कामक्रीडा करायच्या आहेत त्यावर अवलंबून.
:)
In reply to हे प्रेम करायचे आहे का कामक्रीडा करायच्या आहेत त्यावर अवलंबून. by llपुण्याचे पेशवेll
विरोध
>>एकाच वेळी