Skip to main content

तेव्हा आई तुझी खूप आठवण येते

लेखक फटू यांनी शनिवार, 05/04/2008 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
आरक्त चेह~याने सांज ढळते अन् पाखरांची किलबिल होते घराकडे मी परतत असताना आई तुझी खूप आठवण येते तेच कुठेतरी सॅक फेकून देणे तेच घाईघाईत कपडे बदलणे अस्ताव्यस्त कपडे उचलताना मात्र आई तुझी आठवण येते एका हाताने बेसिनमध्ये भांडी धुनं दुस~या हाताने कडवट चहा पिणं तव्यातील चपाती जेव्हा करपून जाते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला आकाशी झेप तर घ्यावीच लागते दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा तेव्हा आई तुझी खूप आठवण येते आजही इथे साता समुद्रापार आई कधीतरी डोळे भरून येतात अन् पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते

जॅझ जुगलबंदी

लेखक धनंजय यांनी शनिवार, 05/04/2008 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
सॅक्सोफोन आणि ड्रमची जुगलबंदी सॅक्सोफोन-ड्रमच्या जुगलबंदीमध्ये कोणी प्रमुख कलाकार नाही कोणी सहायक कलाकार नाही जेव्हा सॅक्सोफोन त्याच्या हरकतींमध्ये गती आणतो, त्याच्या सुरांत मध ओघळतो - तो गोफ विणतो हृदयातील नसांचा आर्त गीतामध्ये. ड्रमर कळे-न-कळे शिवतो ताशाला, आणि मानतो आपल्या भाग्याला - सॅक्सोफोनच्या भरारीमागचे स्पंदन होणे त्याला प्राप्त झाले.
Taxonomy upgrade extras

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 05/04/2008 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, मिसळपावच्या सर्व सभासदांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो, आणि नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्री व्याडेश्वरचरणी प्रार्थना. आपला, (शुभचिंतक) धोंडोपंत पंचांगाबद्दल खुलासा:- दिनांक ०६/०४/२००८ रोजी आपले नवीन वर्ष सुरू होत आहे. या दिवशी सकाळी गुढी उभारून, नवीन पंचांगाची पूजा केली जाते. या वर्षी गुढीपाडव्याला क्षयतिथी आली आहे. याचा अर्थ शुद्ध प्रतिपदा कोणत्याही सूर्योदयाला नाही. सकाळी ९ वाजून २६ मिनीटांपर्यंत अमावास्या आहे. त्यानंतर प्रतिपदा लागते आहे.

तात्याचे हाटेल

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 04/04/2008 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
आजचे पटलावरचे सगळे विषय पाहीलेत का? अगदी ठरवुन सुद्धा असे होणार नाही. सगळे विषय वाचा १ काय जेवलात..... २ कोल्हापुरी मिसळ ( फसलेला अनुभव) ३ चिकन६५ स्टार्टर ४ चिकनसाग ५ पांढरा रस्सा ६ संडे स्पेशल ( व्हेज मान्चुरीअन) ७ खयाली पुलाव ८ संडे स्पेशल (खांडवी) ९ मांचुरियन आणि शेजवान ! १० चहा ......... .....झाले तात्याच्या हाटीलाचे मेन्युकार्ड..... हाय का नाय

चिकन ६५ - स्टार्टर

लेखक गीतांजली यांनी शुक्रवार, 04/04/2008 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
२५० ग्राम बोनलेस चिकन बारीक़ बारीक़ तूकडे करून घ्यावे. त्यात दोन चमचे तान्दुळ पीठ, एक चमचा डाळीचे पीठ, चमचाभर तिखट, चवीपुरते मीठ, कोथिम्बिर, ओवा आणि लिम्बू पिळावा. कढीपत्याची १५/२० पाने कुरकुरीत तळून घ्यावीत. ही तळलेली पानं बारीक़ कुस्करून चिकन मधे टाकावीत. सर्वात शेवटी एक अंडे फेटून टाकावे. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून अर्धा तास ठेवा. कढईत तेल गरम करायला ठेवून चिकनचा एक एक तुकडा हळू हळू तेलात सोडा व मंद आचेवर लालसर तळा. मंद आचेवर तळल्याने चिकन छान शिजते.
Taxonomy upgrade extras

ही पण "श्रीं" ची च इच्छा !

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 04/04/2008 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
रसिक वाचक, "सप्रे"म नमस्कार ! आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३२८ वी पुण्यतिथी ! या निमित्ताने , माझ्या आगामी "झंझावात" या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे. "माणसात पण देवत्वाचा अंश असतो" हे ग.दि.मांंई आपल्या एका चारोळीत म्हणून ठेवले आहे : ज्ञानियांचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे ! आजच्या या रसातळाला चाललेल्या "आरक्षण" रूपी आमिषांनी आपली तुंबडी भरणार्‍या राजकारणी जमान्यात , शिवराय तुमची खूप कमतरता भासते ! तुमच्या पवित्र स्मृतीला त्रिवार वंदन !

चिकनसाग

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 04/04/2008 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
बोनलेस ब्रेस्ट पिसेस- ५०० ग्राम, पालक २,३ जुड्या,फ्रोझन पालक घेतला तर ७५० ग्राम ते १ किलो. २/३ कांदे,२/३ टोमॅटो अथवा टोमॅटोची प्युरी १/२ वाटी.
Taxonomy upgrade extras