Skip to main content

जॅझ जुगलबंदी

लेखक धनंजय यांनी शनिवार, 05/04/2008 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
सॅक्सोफोन आणि ड्रमची जुगलबंदी सॅक्सोफोन-ड्रमच्या जुगलबंदीमध्ये कोणी प्रमुख कलाकार नाही कोणी सहायक कलाकार नाही जेव्हा सॅक्सोफोन त्याच्या हरकतींमध्ये गती आणतो, त्याच्या सुरांत मध ओघळतो - तो गोफ विणतो हृदयातील नसांचा आर्त गीतामध्ये. ड्रमर कळे-न-कळे शिवतो ताशाला, आणि मानतो आपल्या भाग्याला - सॅक्सोफोनच्या भरारीमागचे स्पंदन होणे त्याला प्राप्त झाले. भाग्याचे देणे आहे दुप्पट.... कारण क्षणात बदले रंगपट आणि ड्रमर बोल बरसतो बहुपदरी ठेका, तालात नेमका नाजुक नक्षीची बुलंद इमारत! नि सॅक्सोफोन गहरा धरतो लहरा ज्यावर ड्रमचे तुफान गलबत. प्रमुख नाही कोणी कलाकार सहायक नाही कोणी कलाकार या प्रेमाच्या जुगलबंदीमध्ये
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3791
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया