Skip to main content

इतिहास

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी रविवार, 06/04/2008 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी ही लिहीन म्हणतो सारे जुने नव्याने संदर्भ भेटले मज आपापल्या कलाने उकरून काढला मी इतिहास आज थोडा केले जिवंत काही मुडदे पुन्हा नव्याने डोळ्यात आज माझ्या मी ही बघेन म्हणतो नजरानजर घडावी केव्हा तरी अशाने चुकलेच आज माझे संवाद साधला मी होईल वाद आता येथे नव्या दमाने ठाऊक सर्व होते होणार काय आहे! लिहिलेच मी तरीही का नाव ते दवाने? नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना? चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने ओढून बांधले मी अर्थास दावणीला येतील शब्द त्यांच्या मागून हंबर्‍याने नाही प्रकाश आला झाली अनेक वर्षे होती सताड उघडी गाभ्यात तावदाने गाडून टाक त्यांना होईल त्रास त्यांचा गुंतू नये कधीही स्

आठवण...

लेखक प्रगती यांनी रविवार, 06/04/2008 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक आठवण आपल्याला जगवते एक आठवण संपवते एक आठवण जगायला भाग पाडते एक आठवण जीवनातले सारं शोषून घेते आयुष्य नीरस बनवते पण ए़खादीच सुंदर आठवण आयुष्यभर पुरते जगण्यातले खरे जगणे शिकवून जाते (कल्पना)
Taxonomy upgrade extras

काही काळाच्या ओघात हरवलेले लेख/मुलाखती

लेखक प्रशांतकवळे यांनी रविवार, 06/04/2008 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
खुप वर्षापूर्वी कालनिर्णय मध्ये पु.ल.देशपांडेंनी एक पाककृती (विनोदी) लिहिली होती, त्यातले केवळ एक वाक्य मला आठवतेय "वाण्याकडून आणलेल्या गुळाची आख्खी पूडी पातेल्यात टाकावी... कागद व दोर्‍यासकट". कोणाकडे हा लेख (पाककृती) आहे का? पुलंच्या काळात पण साहित्य, संगीत ह्यांची चोरी व्हायची, असाच एकदा हा विषय निघाला आणी पुलं नी हातात पेटी घेऊन असा काही नजराणा पेश केला की सगळे गार झाले, संपल्यावर पुलं म्हणाले "पाहू या ह्याची नक्कल कोणी करु शकतो का" ह्या घटनेबद्दल कोणाला जास्त माहित आहे का? धन्यवाद प्रशांत

पाडवा पहाट

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 06/04/2008 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी प॑.शिवकुमार शर्मा व राहूल शर्मा या॑च्या स॑तूरवादनाने कान तृप्त झाले. तबल्याला प॑.आनिन्दो चटर्जी व पखवाजावर प॑.भवानी श॑कर अशी साथ स॑गत होती. शिवजी॑नी सुरूवातीस 'बसन्त मुखारी' हा राग वाजविला. भवानी श॑करा॑च्या धृपदाने वातावरण असे काही भारून टाकले की प्राचीन शिवम॑दिराच्या गाभार्‍यात रूद्र ऐकतो आहोत असे वाटले.. न॑तरच्या जोड-झालाने वातावरण आल्हाददायक बनले. आनिन्दो चटर्जी॑नी अतिशय नजाकतीने तबल्याची साथ केली. त्यान॑तर शिवजी॑नी भैरवी राग उपशास्त्रीय ढ॑गाने वाजविला. दादर्‍यातील ब॑दिश आणि शेवटी द्रूत त्रितालात समापन केले. स॑तूर हे वाद्यच अतिशय मुलायम आणि 'सूदी॑ग' आहे.

श्री स्वामीजयंतीच्या शुभेच्छा

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 06/04/2008 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, उद्या चैत्र शुद्ध द्वितीया. अक्कलकोटनिवासी परमपूज्य सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांची जयंती. स्वामीभक्तांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस. श्री स्वामींना आमचे त्रिवार वंदन आणि आपणा सर्वांना स्वामी जयंतीच्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थांची अखंड कृपा आपल्या सर्वांवर राहो ही श्रीस्वामीचरणी प्रार्थना. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय॥ श्री गुरूदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय॥ जय जय जय राजाधिराज, योगीराज महाराजा‌ऽऽऽऽऽऽ अलक्ष दिगंबर अवधूता, श्री दत्त स्वामीदादा समर्था‌‍ऽऽऽऽ आपला, (स्वामीचरणरज) धोंडोपंत

मश्रूम मसाला

लेखक प्रभाकर पेठकर यांनी रविवार, 06/04/2008 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ताजे मश्रूम - २०० ग्रॅम कांदे - २ मध्यम टोमॅटो - १ मध्यम लसूण - ८ पाकळ्या आलं - १ इंच अख्खी काळी मिरी - ४-५ लवंगा - २-३ दालचिनी - १इंच हिरवी वेलची - २-३ दही - अर्धी वाटी धणे पावडर - १ टी स्पून जिरे पावडर - १/२ टी स्पून गरम मसाला - १ टी स्पून (सपाट) हळद - १/२ टी स्पून तिखट - १ ते १-१/२ टी स्पून कसूरी मेथी पावडर - १/२ टी स्पून मीठ - चवी नुसार. कोथिंबीर - सजावटी साठी तेल. तयारी: मश्रूमचे प्रत्येकी ४ ते ६ तुकडे करून घ्या. कांदे आणि टोमॅटो लांब - लांब चिरून घ्या. लसूण आण
Taxonomy upgrade extras