लेखकशितलयांनी शनिवार, 26/04/2008 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला एकदा तरी माणसातच देवाचे रुप दिसते, आणि त्या क्षणा करिता तीच व्यक्ती आपल्यासाठी देव असते. त्या व्यक्तीला आपण कधीच विसरत नाही त्याच्यातील माणुसकीला आपला सलाम असतो. मी येथे माझे दोन अनुभव सा॑गणार आहे.
लेखकअनिरुद्ध अभ्यंकरयांनी शनिवार, 26/04/2008 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
मला मनाचे पटले नाही
वाद आमचे मिटले नाही
मला नेहमी ऐकू येते
मनातही जे म्हटले नाही
राग तुला याचाच असावा
नाव तुझे पुटपुटले नाही
मला भेटल्या जखमा सुंदर
कुणात मन गुरफटले नाही?
अभिलाषेचे वादळ आले
पाय काधी लटपटले नाही
फक्त ठेवले नावा पुरते
नाते मी विस्कटले नाही
शब्द आणले उधार थोडे
दुःख तरी पण नटले नाही
तुझे एवढे कर्ज उरावर
या श्वासांनी फिटले नाही
नको नकोसे जगणे झाले
पाश तरी पण तुटले नाही
तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये
व्यसन कधी मग सुटले नाही
अनिरुद्ध अभ्यंकर
लेखकवर्षायांनी शनिवार, 26/04/2008 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
या बाईसाहेबांना मूर्तिमंत कागदावर उतरवणं निव्वळ कठीण आहे!
तिचा सर्वात सुंदर क्लोज-अप मिळवण्यासाठी प्रत्येक शॉटला पॉज घेत घेत मुगल-ए-आजम अथ पासून इतिपर्यंत मनसोक्त चाळला.
सर्वात सुंदर माझ्या मते ती 'मोहे पनघट पे' च्या 'नैनोंसे जादू किया' च्या या दृष्यात दिसल्ये. :)
Tools used: Derwent Charcol Medium & Dark, RAFFINE 2B Graphite pencil
-वर्षा
लेखकवाटाड्या...यांनी शनिवार, 26/04/2008 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
एका माणसाची कथा....
मिपावरचा पहीलाच प्रयत्न...प्रचंड धाकधुक चालू आहे. आपण तज्ञ मंडळींना हा लेख कसा वाटला ते जरूर सांगा.
आज मी तुम्हाला एका माणसाची कथा सांगणार आहे. विलक्षण स्वाभिमानी, करारी, निर्मळ, प्रामाणिक आणि प्रसंगी रागीट सुद्धा. मी असा एक माणुस पाहिलाय जो अतिशय तत्त्वशील, बुद्धीमान पण तरीही प्रसिद्धी पासून प्रयत्नपुर्वक दूर.
==========================================================================================
स्वातंत्र्यापुर्वीचा काळ. कोल्हापुर पासून जवळ जवळ ३०/४० कि.मी. आत चिकोडी जिल्ह्यात संकेश्वर नावाचं एक गाव आहे. तिथे पुर्वी एक अण्णा सरंजारदार होते.
लेखकशितलयांनी शनिवार, 26/04/2008 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक मित्र आहे, तो ज्या लग्ना स॑ब॑धी कार्यक्रमात जाई तेथे काही तरी गडबड ही निश्चित होते. त्यातील काही मजेशीर गोष्टी. एकदा त्याच्या मोठ्या भावाला मुलगी पहायला माझा मित्र, त्याचा भाऊ, आणि त्याचे आई,वडिल असे सगळे गेले, मुलगी अतिशय देखणी, माझ्या मित्राचे तर डोळे दिपलेच .
लेखकहेरंबयांनी शुक्रवार, 25/04/2008 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस हा संवयींचा गुलाम असतो असे म्हणतात. यापैकी कांही सभोवतालच्या परिस्थितीमुळे लागतात, कांही आनुवंशिक असतात तर कांही मुद्दामहून लावून घेतलेल्या असतात. प्रत्येक आईवडिलांना (स्वतःला नसल्यातरी) आपल्या मुलांना आदर्श संवयी लागाव्या असे वाटत असते. प्रत्यक्षांत मात्र तसे होत नाही. संवयी चांगल्या की वाईट हे ठरवण्यापेक्षा त्यांचे फक्त निरीक्ष्ण करणे जास्त मनोरंजक ठरेल.
सकाळी उठण्याचे प्रकारच पहा, लवकर उठणारे, अतिलवकर उठणारे, उशीरा उठणारे आणि चक्क बारा वाजता उठणारे! त्यातले पोटप्रकार आणखी मजेशीर.