ऍसेट.
Live stock (Poultry mgmt.) research साठी कामशेट मध्ये सहा वर्शे जात होतो. साधारण आठवड्याला दोन दिवस. ठाणे ते लोणावळा प्रवास ट्रेनने. फार्मच्या शेटने गाडी देउ केली होती.पण म्हटलं नको. ही जमात घटकेत सौभाग्यवती तर घटकेत गंगाभारती.मोठमोठी कर्जं काढायची आणि फुगवायची खरीखुरी आजीवन लोन-आवळा क्लब मेंबर्स.
एक चांगला फायदा झाला या अप डाउन चा. तो म्हणजे अफ्फाट जनसंपर्क,साध्याशा गोष्टीवरून चर्चा सुरु व्हायच्या आणि काशीची कावड रामेश्वरापर्यंत पोचायची. हल्ली काय उकाडा आहे अशी सुरु झालेली चर्चा एकमेकांच्या ऍसेट पर्यंत . शेअर्स ,म्युच्युअल फंड ,प्लॉट , सोनं वगैरेच्या चर्चांना जोर यायचा. सगळी मंडळी रोजचीच.
मिसळपाव