Skip to main content

मनसेचं आणखी एक आंदोलन..!!

लेखक mina यांनी रविवार, 19/10/2008 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
मनसेनं पुन्हा परप्रांतीयांवर आपली चढाई केली. मुंबई-कल्याण येथे आज रेल्वेची परिक्षा देण्यासाठी काही परप्रांतीय तरुण आले होते.महाराष्ट्रात होऊ घातलेल्या या परिक्षेला मराठी तरुण अत्यल्प होते.पहीले महाराष्ट्रातल्या तरुणांना नोकरी द्या.या मागणीवरुन सदर आंदोलन करण्यात आले.त्यांनी चक्क त्या परप्रांतीय तरुणांना पळवून लावले आणि परिक्षेच्या ठिकाणी सवयीप्रमाणे तोड्फोड करुन मराठीला न्याय मिळावा अशी घोषणाबाजी केली.

आवडती शीर्षक गीते

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 19/10/2008 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी दूरदर्शनवरच्या मालिका॑ची शीर्षक-गीतेसुद्धा तेव्हढीच लोकप्रिय होत असत. एकतर एकच एक चॅनेल होता व काही मालिका खरोखरच दर्जेदार होत्या. आत्ताच्या सगळ्याच मालिका एकदम फालतू आहेत असे मला अजिबात म्हणायचे नाही पण रविवार सकाळी रामायण- महाभारताच्या वेळी रस्त्या॑वर अक्षरशः शुकशुकाट असायचा तसा आता 'क्यो॑ कि..' ला होत नाही हे खरे आहे. अश्या मालिका॑ची शीर्षकगीतेही मनावर खोल ठसा उमटवत असत. मालिकेच्या विषयाला अनुसरून तसे चित्रण व पार्श्वगायन अथवा स॑गीत असेल तर अचूक परिणाम साधला जायचा. नेमक॑ उदाहरण म्हणजे 'उडान' मालिका व त्याच॑ टायटल.

अमृतरूपी झरा

लेखक शर्मीला यांनी रविवार, 19/10/2008 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
अमृतरूपी झरा डोंगराच्या कुशीत मातीच्या पोटी उगवला एक झरा सहजच पाहिले मी त्याला खळखळ हासत होता पटपट बोलत होता झरझर पुढे चालत होता काट्या-कुट्यातून वाट शोधत होता दगडालाही भेग पाडत होता आपल
Taxonomy upgrade extras

आई

लेखक दत्ता काळे यांनी रविवार, 19/10/2008 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
देवभोळी कष्टवेडी माय माझी शब्द सोपा वाकल्या फांदीत अजूनी सुगरणीचा दक्ष खोपा * * * * * * *

आठवण

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी रविवार, 19/10/2008 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या स्वर्गवासी पत्निसाठी..... सख्ये तुझ्या आठवणी टच्च डोळ्यामध्ये पाणी एक एक चांदणी ओघळली.... *********** अजूनही तुझी वेणी मी शोधितो गं साजणी आपुल्या शयनी पुन्हा पुन्हा.... ************ कोण खुळा तुला सांगतो..? मी अजुनही एकटाच रहातो.. खोटेच सांगतो... हा बघ एकान्त घेउन उशाला मी रोज झोपतो.. खरे सांगतो... बघ तर येउन .. मी वाट पहातो वाट पहातो..... ***********
Taxonomy upgrade extras

त्रिवेणीचा प्रयत्न :

लेखक प्राजु यांनी रविवार, 19/10/2008 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिवेणीचा प्रयत्न : आज कधी नव्हे ते मला खरंच यशाची किल्ली मिळाली आहे.. अरे! कुलुपच बदललं कोणीतरी ! ****************************** यशाकडे जाणारा मार्ग दिसत असतो...पण नेहमीच अंडर कन्स्ट्रकशन असतो.. - प्राजु (कुठेतरी इंग्रजीमध्ये वाचलेल्या विचारांना त्रिवेणीचं रूप देण्याचा प्रयत्न केला आहे.)

आठवांचा पसारा..

लेखक प्राजु यांनी रविवार, 19/10/2008 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
भुजंगप्रयातात ही कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.. उगा जाहला आठवांचा पसारा खळेना कशा आज डोळ्यांत धारा सुगंधी क्षणांना जपावे उराशी उडू लागला गंध हा आज सारा असा ठेवला मोगरा मी जपूनी सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा जरी वादळी घेतली झेप मी ती तुझ्या प्रीतिचा ना मिळाला निवारा जरी टाळतो मी तुझ्या आठवांना तुला पाहता देहि येतो शहारा चला संपला अर्थ या जीवनाचा दिला नीयतीने मला हा इशारा - प्राजु
Taxonomy upgrade extras

...पण "वेळ' आली नव्हती!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 19/10/2008 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
--------- विधान परिषदेत कुठलं भाषण करायचं, याची तयारी सुबोध मोहितेंनी सुरू केली होती. शिवसेनेला नामोहरम करण्याच्या युक्‍त्याही योजून ठेवल्या होत्या. नितीन गडकरींच्या भाषणावर कडी कशी करता येईल, याचा विचार सुरू होता. सगळी जय्यत तयारी झाली होती. विमानही सज्ज होतं. विधान परिषदेच्या उमेदवारीचा अधिकृत फोन आला नव्हता, तरी त्यांना त्याबद्दल खात्री होती. मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांनी बाकीची "व्यवस्था' ठीकठाक असल्याचंही कळवलं होतं. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीही अर्ज भरण्याची सूचना आली नाही, तेव्हा मात्र मोहिते अस्वस्थ झाले. येरझारा घालत असतानाच फोन वाजला. त्यांनी उत्सुकतेनं घेतला.

व्यथा

लेखक सुरताल यांनी रविवार, 19/10/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
सारे ओळखीचे डोळे पुसून गेले! होते अनोळखी ते गाली हसुन गेले! ज्यांनी दिला दिलासा ते लोकही असे की, माझ्या व्यथाकथांचे पत्ते पिसुन गेले! माझ्या पराभवाची चर्चा कुठे न झाली घायाळ काळजाला विंचू डसून गेले! डोळ्यात चाहत्यांच्या मी बांधल्या हवेल्या कळले मला न केंव्हा घरटे बसुन गेले! जे काल जाहले ते मी आठवू कशाला? डोळ्यापुढे उद्याचे गाणे दिसून गेले! सुरताल
Taxonomy upgrade extras