Skip to main content

जागो मतदार प्यारे

लेखक अनिरुध्द यांनी गुरुवार, 27/11/2008 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
आल्या आल्या निवडणूका जागा हो मतदारा आश्वासनं अन् सुविधांच्या बरसतात बघ धारा अनेक व्यक्ती अनेक पक्ष जनतेकडे ना कुणाचे लक्ष सत्ता, पैसा अन् खुर्ची मिळविण्या करीती मखलाशी शिवसेनेचा शिववडापाव अन् काँग्रेसचे कांदे-पोहे भ्रमिष्ट झाली जनता आता खावे काय हा प्रश्न पडे शिवसेनेचा प्रचार मोठा ठरविण्यास तो बर्गर खोटा बरीच वर्ष दुर्लक्षित होता भाव येई एकदम आता बघुन सेनेची युक्ती काँग्रेस काढे नवीन क्लूप्ती वडापाव तर रोजचाच आहे आम्ही आणतो कांदे-पोहे मैदानात घेतली उडी करण्या आता कुरघोडी बघता यांचे माकडचाळे जनता ही झाली वेडी म्हणून म्हणतो मतदारा आता तरी हो जागा मतदानाचा हक्क बजावून दाखवून दे यांना 'जागा
Taxonomy upgrade extras

फुलटू माज

लेखक टारझन यांनी गुरुवार, 27/11/2008 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
कोणतीही गोष्ट कधीही कशीही आठवू शकते. .. आम्ही किती माजुरडे होतो, याची आठवण झाली. असं म्हणतात, नुकत्याच तरूण वयात जर व्यायाम/कसरत केली की अंगात 'माज' येतो. हा 'माज' नकारात्मक दृष्टीने नव्हे, अंगात अशी एक प्रकारची रग शिरते की ती ताकद कुठे तरी कशी तरी दाखवलीच्च पाहिजे अशी माणसिकता होते. आणि मी अशा माणसिकतेतूनच गेलोय, थोडंस मोकळं करतोच ...यावरून फक्त मला 'जज' करू नका हीच विनंती. कारण काळा नुसार माणूस बदलतोच. परिपक्व होतो (अपवाद सोडता). असो, तर लहाणपणापासून तोंडात लै जोर होता.

मिपाचे वैभव..!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 27/11/2008 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो.. नुकताच मिपाकर सुनील यांनी 'मिपाचे बंद पडणे..' अशी तक्रार केली होती. त्या तक्रारीस तिथे आम्ही उत्तर दिले आहेच परंतु आमच्या उत्तराला सपोर्टिंग म्हणून आम्ही खाली काही चित्रे प्रकाशित करत आहोत.. या वरून मिपाची वाढती लोकप्रियता सहज लक्षात यावी.. आणि म्हणूनच आजूबाजूच्या संकेतथळावरील काही मिपाद्वेष्टी मंडळी मिपाच्या सर्व्हरवर अतिरिक्त कृत्रीम ताण आणून मिपा वारंवार बंद पाडत आहेत हे उघड आहे... असो, या बाबतीत शक्य ते सर्व प्रयत्न सुरू आहेत.

अघोषित युद्ध..!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 27/11/2008 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबैवरचा आतंकवादी हल्ला अजूनही सुरूच.. ताजमध्ये अतिरेक्यांनी पुन्हा फायरिंग ओपन केलं आहे.. छाबडा हाऊसमध्ये बेछुट गोळीबार.. तेथे एक इस्रायली कुटुंब ओलीस. नरिमन हाऊसमध्येही अतिरेकी घुसले आहेत..ओबेरॉय हॉटेलात लष्करी कारवाई जोरात सुरू.. मर्चंट हाऊसमध्येही अतिरेकी लपल्याची शंका.. विधानभवनासमोर दोन हॅन्ड ग्रेनेड मिळाले तेही पोलिसांनी निकामी केले आहेत...अतिरेक्यांकडे ग्रेनेड, एके ४७, एके ५७ यासारखी हत्यारे बर्‍याच मोठ्या प्रमाणावर असल्याचा अंदाज.. आता हा हमला केवळ मुबईवर नसून भारतावरच आहे, भारताच्या सार्वभौमत्वावर आहे!

स्वागत

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 27/11/2008 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ लेखकाद्वारे अलिखित.

निषेध.

लेखक मयुरेशवैद्य यांनी गुरुवार, 27/11/2008 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज झालेल्या आतंकवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ मी माझ्या घरावर काळा झेंडा लावून माझा निषेध व्यक्त केला आहे. शहीद हेमंत करकरे शहीद विजय साळसकर शहीद शशांक शिंदे शहीद अशोक कांन्ते ह्यांना अभिवादन. मयुरेश वैद्य.

मुंबईत गोळीबार/बॉम्बस्फोट..! (चर्चा क्र. २)

लेखक विकास यांनी गुरुवार, 27/11/2008 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत गोळीबार/बॉम्बस्फोट..! या मूळ चर्चेस तात्काळ खूप प्रतिसाद आल्याने. येथे अधिक प्रतिसाद करणे आणी नवीन वाचणे सोपे जावे म्हणून हा धागा चालू केला आहे. हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटेसह नऊ पोलिस शहीद डेक्कन मुजाहिदीनने घेतली जबाबदारी - मुंबईत बुधवारी रात्री ठिकठिकाणी गोळीबार करत सुरू झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी डेक्कन मुजाहिदीन नावाच्या संघटनेने घेतली आहे. मिडियाला इ-मेल करुन संघटनेने ही जबाबदारी स्वीकारली आहे.

मुंबईत गोळीबार/बॉम्बस्फोट..! (कृपया विकासने सुरु केलेल्या दुसर्‍या धाग्यावर प्रतिसाद देऊन सहकार्य करावे!)

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 26/11/2008 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार मुंबईत ताज हॉटेलच्या परिसरात गोळीबार सुरू आहे... हा अतिरेकी हल्ला असल्याचे समजते व अद्यापही पोलिस आणि अतिरेकी यांच्यात ताज परिसरात प्रचंड गोळीबार सुरू आहे.. नरीमन पॉईंट येथील ओबेरॉय हॉटेलात व ताजमध्ये अद्यापही अतिरेकी लपल्याची खबर आहे व तिथेही प्रचंड गोळीबात सुरू आहे... सी एस टी, कामा रुग्णालय आणि विलेपार्ले येथे बॉम्बस्फोट झाले आहेत व जखमींची व मृतांची संख्या ३० च्या वर आहे... महाराष्ट्रात हाय ऍलर्ट लागू झाले असून मुंबईत कमांडो ऍक्शन सुरू आहे... या अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लौकरात लौकर सुधारणा होवो हीच इच्छा.