Skip to main content

पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमेवर.

लेखक बबलु यांनी रविवार, 30/11/2008 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच आलेली म.टा. च्या संस्थळावरील मुख्यपृष्ठावरील बातमी... अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेले एक लाख सैन्य हलवून ते भारताच्या सीमाभागाजवळ तैनात करणे आवश्यक असल्याचे पाकिस्तानने नाटो आणि अमेरिकन लष्कराला कळवले आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3775546.cms

नव्या दिशा (???) !!!

लेखक अभिजीत यांनी रविवार, 30/11/2008 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ल्याच्या नंतरचा दिवस काही नव्या दिशा घेवुन आला आहे. या दोन बातम्या पहा - यावेळच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ६०% मतदान झाले आहे. जी आतापर्यंतची मतदानची सर्वोत्तम आकडेवारी आहे. यात प्रथमच मतदान करणार्‍यांचा समावेश होता. मतदारांच्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत.

शिवराज पाटील यांचा राजिनामा

लेखक अनंत छंदी यांनी रविवार, 30/11/2008 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
म.टा.च्या संकेतस्थळावर ब्रेकींग न्यूज झळकते आहे. मुंबईतील हल्ल्याबाबत नैतिक स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी राजिनामा दिला आहे.

मिपाने एक कट्टा भरवावा.

लेखक कलंत्री यांनी रविवार, 30/11/2008 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर सध्याच्या मूंबईच्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात अनेक लेख आणि प्रतिक्रिया प्रसिद्ध होत आहेत. अर्थातच ते साहजिकही आहे. प्रत्येकाच्या मनातील काळजी, चिंता आणि भविष्याबद्दलची साशंकता प्रत्येकाला सैरभैर करीत आहे. मिपाने संकेतस्थळाच्या बाबतीत अनेक उपक्रम राबवलेले आहे आणि आपला सक्रिय उत्साह मरा्ठी जगतात दाखविला आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवरही एखादा कट्टा मुंबई अथवा पुण्यात भरवला गेला तर बरे होईल. त्याचबरोबर पोलिस अथवा सैन्यदलातील कोणा तज्ज्ञांना अनौप्चारिक चर्चेसाठीही पाचारण करण्यात येता येईल.

कोई दुष्मन ठेस लगाये....

लेखक विकास यांनी रविवार, 30/11/2008 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
किशोर कुमारने म्हणलेले खालील गाणे आज मला या अस्वस्थते आठवत आहे: चिंगारी कोई भडके, तो सावन उसे बुझाये, सावन जो अगन लगाये, उसे कौन बुझाये? ... मजहार मे नैय्या डुबे तो माजी पार लगाये, माजी जो नाव डुबोये उसे कौन बचाये? ... कोई दुष्मन ठेस लगाये, तो मीत जिया बेहेलाये, मनमीत जो घांव लगाये उसे कौन मिटाये? वर दिलेल्या सर्वच पण विशेष करून शेवटच्या ओळी मला सारख्या डाचत आहेत.

सलाम!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 30/11/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर्गात अतिमहत्त्वाची सभा भरली होती. विषय होता, वाढती गुन्हेगारी आणि दहशतवाद. विष्णूचे दशावतार पूर्ण झाल्यानंतर राक्षसांचा दहशतवाद पुन्हा वाढला होता. अतिमहत्त्वाच्या ठिकाणांसाठी, सर्वसामान्य ठिकाणांसाठी, असे वेगवेगळे दहशतवादी गट राक्षसांनी स्थापन केले होते. त्यांनी सगळीकडे उच्छाद मांडला होता. स्वर्गातल्या कुणालाच पहिल्यासारखे सुरक्षित वातावरण जाणवत नव्हते. अप्सरांचे अपहरण, देव-देवतांचा छळ, शुभकार्यात बाधा, काय वाटेल तसा धुमाकूळ राक्षस घालत होते. राजाधिराज इंद्रानं आणीबाणीची स्थिती ओळखून सर्वांशी सल्लामसलत करण्यासाठी आजची बैठक बोलावली होती.

कडव्या हिंदूंनी ते "पुण्यकर्म' करावेच

लेखक अन्वय यांनी शनिवार, 29/11/2008 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी पाडल्यानंतर मुंबईत जे बॉंबस्फोट झाले, तेव्हापासून देशविघातक कारवायांत स्थानिक मुस्लिमांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू झाली. पुढे ज्या ज्या कारवाया करण्यात आल्या त्यात प्रामुख्याने मुस्लिम नावेच समोर येत होती. वृत्तपत्रांमधून रकानेच्या रकाने भरून त्यावर चर्चा, टीका होत होती. मुस्लिमांमधील निरक्षरता, गरिबी यामुळे ते गुन्हेगारीकडे वळतात. त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी बहुसंख्याकांनी प्रयत्न करावेत, असे मतही अनेक विचारवंतांनी प्रकट केले होते. त्यासाठी कुणी किती प्रयत्न केले, हा चर्चेचा मुद्दा आहे.

गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मुलन करता येईल का? -१

लेखक कलंत्री यांनी शनिवार, 29/11/2008 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या काळात हिंसेचे उत्तर हिंसेने किंवा त्यापेक्षा जास्त हिंसेने देण्यात यावे असा सर्वसाधारण लोकप्रिय समज आहे. कालच्या अतिरेकी कारवाईने प्रत्येक भारतीयाच्या मनात अथवा जगातील शांतताप्रेमींच्या मनात नकळतच एक काळजीची भावना निर्माण झाली आहे. सगळ्याच्याच मनात भडक विचार येत आहेत. एकदा सोक्षमोक्षच लावू या असाही विचार नकळतच सगळ्याच्या मनात येत असेलच. आरपाराची लढाईतर करून घ्याच. अशा पार्श्वभूमींवर या समस्येच्या मुळातच जाता येईल का?