Skip to main content

आता कोण ?

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 30/11/2008 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
एकंदरीत विलासराव व आबा यांना जावे लागेल असे दिसते. मग आता कोण? माझा अंदाज मुख्यमंत्री - सुशिलकुमार शिंदे उपमुख्यमंत्री/ गृहमंत्री - छगन भुजबळ आपला अंदाज काय?

गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन होऊ शकते काय? -२.

लेखक कलंत्री यांनी रविवार, 30/11/2008 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
काल मी लिहिलेल्या लेखात अतिरेकी कसा बनतो याची प्रक्रिया सांगण्याचा प्रयत्न केला होता. माणसाच्या विचारसरणीत द्वेष, तिरस्कार, भिती आणि क्रौर्य भरले की अतिरेकी बनविणे सोपे असते. धर्माच्या नावावर ते सहज आणि सोपे असतेच. त्यात संधीसाधू लोक अश्या तरुणांचा पद्धतशीर वापर करून घेत असतात. या माझ्या विधानाला कोणताही समाज, धर्म, वंश अपवाद राहू शकत नाही. यात मुस्लिम अतिरेकी, हिंदू यात तमिळ, पंजाबी, सध्याच्या बॉम्ब स्फोटात सहभागी असलेले सर्वच अतिरेकी येतात. मला या लोकाबद्दल तिरस्कार वाटण्यापे़क्षा यांच्याबद्दल सहानुभुतीच वाटते.

एक योजना

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 30/11/2008 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी गेल्या आठवड्यात काय झालं हे आपल्याला माहित आहे.. यातूनच एक भयंकर सत्य समोर आलं की सध्याच्या नेत्यांना देशापेक्षा त्यांच्या राजकारणातच जास्त रस आहे. एकूणच सगळ्यावर मी आणि अदिती इतरांप्रमाणेच दु:खी होतो.. हे सारं करताना काहितरी करायला हवं हे जाणवत होतंच.. नक्की काय करावं हे मात्र समजत नव्हतं...यातूनच खरडा खरडी चालु झाली... हे सगळं बदलायचं तर आहेच.. पण कसं? अनेक उपाय आहेत.. उपाय असु शकतील....पण कुठून तरी सुरूवात झाली पाहिजेच.. सुदैवाने लोकशाहिचा "बदल "हा पाया आहे. यासाठी कोणत्याहि यादवीची गरज नाहि.. गरज आहे एका मताची..

मटण सुप (अर्थातच आकर्षक छायाचित्रांसह)

लेखक पांथस्थ यांनी रविवार, 30/11/2008 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
मटण खायचे तर आहे पण मसालेदार नकोय (फोटूंमुळे जळजळ होते मसाल्याने वाढायची ;) ), मग मटण सुप हा छान पर्याय आहे. आम्ही याला मोळं मटण पण म्हणतो.

विलासराव अडचणीत

लेखक कवटी यांनी रविवार, 30/11/2008 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
अतिरेकी हल्ल्यानंतर अडचणीत आलेले मुख्यमंत्री विलासराव आज राजिनामासत्रात पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. हल्ल्यानंतर ताजची पहाणी करायला गेलेल्या मुख्यमंत्र्यानी बरोबर सिनेस्रुष्टीतील त्यांचे चिरंजीव रितेश आणि निर्माता राम गोपाल वर्माला बरोबर नेल्याने आय.बी.एन्.लोकमत ने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. जाड कातडीचा, निष्क्रीय्,बेजबाबदार,गुलछब्बू अश्या विशेषणे त्याना लावण्यात येत आहेत. विलासरावांची ही क्रुती नक्कीच निंदनीय आहे. यानंतर विलासरावानी पदावर रहावे काय? आणि लोकानी पुढच्या टर्मसाठी त्याना निवडून द्यावे काय?

एक जुनी कविता: सहज आठवली म्हणून

लेखक अविनाश ओगले यांनी रविवार, 30/11/2008 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा जेव्हा वारे युद्धाचे वाहती जवान नाहती कौतुकात शत्रूच्या भयाने होतो थरकाप मुखी आपोआप राष्ट्रगीत थंडी नि वार्‍यात झुंजती जवान शब्दांचेच दान त्यांना द्यावे आणि कोणी वेडे हुतात्मेही होती त्यांची देशभक्ती गौरवावी संपताची युद्ध त्यांना विस्मरावे आपण रमावे आपल्यात रात्रंदिन त्यांना युद्धाचा प्रसंग नेते सारे दंग स्वार्थामाजी
Taxonomy upgrade extras

थोडे डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर... प्रतिसाद आणि माझे मत

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 30/11/2008 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
दोन भागांतील या लेखावर आलेल्या प्रतिसादांनंतर तो धागा बराच खालवर लांबत गेल्याने हा स्वतंत्र धागा केला आहे. मूळ लेख आणि २ व चर्चा लेखावर प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार. प्रतिसादांचे स्वरूप साधारणपणे मुद्देसूद लेखन येथून सुरू होणारे आहे.

इथे सुद्धा मराठी द्वेष

लेखक योगी९०० यांनी रविवार, 30/11/2008 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
हि बातमी वाचा.. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3774786.cms आज दहशतवादा विरुद्ध एकत्र येण्याची गरज असताना आपले चतूर(?) राजकारणी आणि मिडिया "राज" कारण करत आहेत. अर्थात जखमी लोकांना मदत करायला मनसे आणि शिवसेनाच पुढे होती हि गोष्ट विसरलीच गेली आहे. हा एस एम एस वाचा.. दहशतवादी हल्ला होत असताना राज ठाकरे व त्यांची शूर सेना कुठे होती?... भूमिपुत्रांना, मनसेच्या गुंडांना बरोबर घेऊन जा आणि आमची मुंबई वाचवा... आर्मी किंवा कमांडो मराठी नव्हते, मग त्यांनी मुंबईसाठी का प्राण गमावले?