काल मी लिहिलेल्या लेखात अतिरेकी कसा बनतो याची प्रक्रिया सांगण्याचा प्रयत्न केला होता. माणसाच्या विचारसरणीत द्वेष, तिरस्कार, भिती आणि क्रौर्य भरले की अतिरेकी बनविणे सोपे असते. धर्माच्या नावावर ते सहज आणि सोपे असतेच. त्यात संधीसाधू लोक अश्या तरुणांचा पद्धतशीर वापर करून घेत असतात. या माझ्या विधानाला कोणताही समाज, धर्म, वंश अपवाद राहू शकत नाही. यात मुस्लिम अतिरेकी, हिंदू यात तमिळ, पंजाबी, सध्याच्या बॉम्ब स्फोटात सहभागी असलेले सर्वच अतिरेकी येतात. मला या लोकाबद्दल तिरस्कार वाटण्यापे़क्षा यांच्याबद्दल सहानुभुतीच वाटते. अर्थातच वेळप्रसंग पाहून त्यांना हवे तसे शासनही करावयाला हवे याबद्दल दुमत नाही / नसावे. माझा मुख्य मुद्दा अतिरेकी ही जर प्रक्रिया असेल तर, प्रक्रियेला गांधीवादाने शह देता येईल का असा आहे. यात या लेखात मला समजलेली गांधीवाद यावर लिहिण्याचे धाटत आहे.
बर्याच वेळी लोकांचे आकलन, माहिती आणि सारासार विचार करण्याची एकसाची अशी पद्धत असते. याला छेद देण्याचे कार्य या लेखमालेने व्हावे असे मला वाटते. अजून एका मुद्याचा विचार करायला हवा की अतिरेक्यांवर कायमस्वरुपी हिंसेने विजय मिळेल का? खरेतर हिंसा असो अथवा अहिंसा यांना नियम आणि आवश्यकता मात्र एकाच प्रकाराचीच असते. कधी ती पूर्ण विरुद्ध असते इतकाच तो फरक.हिंसक अथवा अहिंसक लढ्याला दिर्घकालीनची पूर्वतयारी करावी लागते, या लढ्यासाठी चांगल्या नेत्याची गरज दोन्ही बाजूला असते, दोन्हीकडे तत्त्वासाठी प्राणाचे बलिदान करणारे कार्यकर्ते लागतात, नेत्याला सर्वसाधारण माणसाच्या वर्तन आणि विचाराच्या पद्धतीचे योग्य अथवा पराकोटीच्या क्षमतेचे ज्ञान असावेच लागते.
यात दोघातील मुख्य फरक म्हणजे, हिंसक लढ्याला एक विशिष्ठ असा समयबिंदु निर्माण करावा लागतो, विरुद्ध प़क्षाचे मनोबल हताहत करावे लागते, द्वेष, हिंसा आणि तिरस्कार कायमच फुलवावा लागतो, त्याला दिव्य अशा स्वप्नांची भुरळ घालावी लागते, तर अहिंसक लढ्यात नेत्याला आपल्या वर्तनावरच ल़क्ष ठेवावे लागते, आदर्शावर कायम राहावे लागते इत्यादी इत्यादी. ( याचा उहापोह पुढे येईलच. ),
या दोन्ही प्रक्रियेला काही बलस्थाने आहेत तर काही अंगभूत मर्यादाही आहेत.
आपल्या सर्वाच्या सुदैवाने आपल्यात गांधी नावाचा हाडामासाचा माणुस झाला आणि कदाचित आपल्या भावी पिढ्या यावर विश्वासही ठेवणार नाही. ( आईनस्टाईनेचे असे वक्तव्य आहे.)
तर मला समजलेला गांधीवाद खालीलप्रमाणे आहे.
1.साध्य साधन शुचिता : आपल्याला जे काही साध्य करावयाचे आहे त्यात कोणतेही साधन वापरायला गांधीवादात अनुमती नाही. साध्य आणि साधन या दोन्हीवर गांधीवाद कमालीचा काटेकोर असतो. ( स्वातंत्र्य चळवळीत गांधीनी ते वेळोवेळी सिद्ध केले आहेच).
2.प्रचार आणि प्रसाराचे पूर्ण वापर करणे, कोणतीही गुप्तता न पाळणे: गांधी अफ्रिकेतून भारतात १९१७ च्या सूमारास येण्यापूर्वीच त्यांनी १०००० पत्रिका छापून त्याकाळच्या भारतातील सर्व वर्तमानपत्रांच्या संपादकाना, सामाजिक कार्यकर्त्यांना पाठविल्या होत्या. त्यामूळे गांधी येण्यापूर्वीच त्यांच्या बर्यापैकी कामाची प्रसिद्धी केली होती.( वर्तमानपत्राचा, पुस्तकाचा प्रचंड उपयोग आपल्या लढ्यासाठी गांधीनी केला होता.)
3.कोणत्याही चळवळीत सर्वांचा सक्रिय सहभाग घेणे. कोणतेही आंदोलन हे जन आंदोलन ठेवणे आणि यात सर्व म्हणजे स्त्री, पूरुष, मुले, गरिब, श्रीमंत, सर्व धर्माचे लोक यांचा सहभाग मिळविणे.
4.समोरच्या व्यक्तिच्या मताबद्दल आदर ठेवणे आणि आपले मतही योग्य ती कारणमिमांसा देत व्यक्त करत जाणे. ( अपवाद सुभाषचंद्रबोसाच्या बाबतीत).
5.कोठे आपल्याकडून चुक होत असेल किंवा उत्साही कार्यकर्त्याकडुन चुक होत असेल तर ती मान्य करणे आणि वेळप्रसंगी आवश्यकता भासल्यास असे भरकटलेले आंदोलन विनाअट मागे घेणे. ( चौरीचौराचा लढा).
6.उदारमतवाद विकसित करणे, सर्वधर्म समभाव. (एकाने डोळे फोडले म्हणुन दुसऱ्याचे डोळे फोडले तर सारे जगच आंधळे होईल. धर्म अंतिम सत्याकडे जाण्याचा मार्ग आहे ते अंतिम सत्य नव्हे अश्या शिकवणीचे आचरण आणि सिद्ध करणे.)
7. समोरच्या व्यक्तिने चूक केली असेल आणि त्यात योग्य ते मतपरिवर्तन झाले असेल तर ते मान्य करणे आणि त्याला आपल्या विचारधारेत सहभागी करून घेणे.
मला समजलेला गांधीवाद मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
गांधीवादाचा गाभा हा माणसाला केंद्रबिंदू ठेवणारा आहे. जगाच्या आजच्या हिंसक, चिथावणीखोर कामावर या विचारसरणीने ताबा मिळवता येऊ शकतो अथवा शांतताप्रेमी लोकांना योग्य असे बल ही विचारसरणी देउ शकते असे माझे ठाम मत आहे. स्वातंत्याच्या वेळी स्वातंत्र्य, समता आणि बंधूता हे त्याचे ध्येय होते. आजच्या काळात त्याहीपे़क्षाही जास्त या वादाने / विचारसरणीने साध्य होऊ शकते असे मला वाटते. गांधीवाद हा आचरण्यास जरी कठिण असला तर त्याचे बक्षिस मात्र मोठे असते.
पूढच्या भागात ही तत्वे कशी कार्यान्वित आणावी, आणता येईल यावर विवेचन असेल. अतिरेक्यांच्या विचारसरणीतला द्वेष आणि क्रुरता कशी कमी करता येईल असा पूढच्या लेखाचा गाभा असेल.
याद्या
13084
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
नमस्कार, आप
धन्यवाद.
In reply to नमस्कार, आप by लिखाळ
आपले साधे
In reply to धन्यवाद. by कलंत्री
प्रचारकी थाटाचा लेख
+१
In reply to प्रचारकी थाटाचा लेख by सर्वसाक्षी
विषयाची व्याप्ती.
In reply to प्रचारकी थाटाचा लेख by सर्वसाक्षी
वाट पाहतोय
In reply to विषयाची व्याप्ती. by कलंत्री
मला लाजवु नका.
In reply to वाट पाहतोय by सर्वसाक्षी
जे काय लिहायचे ते इथे लिहा!
In reply to मला लाजवु नका. by कलंत्री
कृपया आपले प्रश्न संक्षिप्त स्वरुपातच विचारा.
In reply to जे काय लिहायचे ते इथे लिहा! by सर्वसाक्षी
माझ्या एका
In reply to प्रचारकी थाटाचा लेख by सर्वसाक्षी
कलंत्रीसा
तात्या..
In reply to कलंत्रीसा by विसोबा खेचर
करेक्ट
In reply to कलंत्रीसा by विसोबा खेचर
उहापोह.
In reply to कलंत्रीसा by विसोबा खेचर
एक नम्र विनंती
In reply to उहापोह. by कलंत्री
>>
आत्ताच्या संदर्भात...
स्पष्टीकरण.
In reply to आत्ताच्या संदर्भात... by विकास
>>२.
In reply to स्पष्टीकरण. by कलंत्री
बरोबर.
In reply to >>२. by लिखाळ
>>
In reply to बरोबर. by कलंत्री
गांधीवाद...
गांधीवाद
कलंत्रीसाहेब,
प्रकाटाआ
In reply to कलंत्रीसाहेब, by चतुरंग
+१ रंगाशेठ...
In reply to कलंत्रीसाहेब, by चतुरंग
सहमत.
In reply to कलंत्रीसाहेब, by चतुरंग
प्रसिद्धीसाठि केलेला अट्टाहास
श्री. द्वारकानाथजीं विषयी कृपया गैरसमज नको
In reply to प्रसिद्धीसाठि केलेला अट्टाहास by परिकथेतील राजकुमार
माफी असावी
In reply to श्री. द्वारकानाथजीं विषयी कृपया गैरसमज नको by सर्वसाक्षी
हा आपला मोठेपणा
In reply to माफी असावी by परिकथेतील राजकुमार
द्वारकाना
In reply to श्री. द्वारकानाथजीं विषयी कृपया गैरसमज नको by सर्वसाक्षी
माझ्यामनावरचे ओझे वाढले आहे.
In reply to द्वारकाना by विसोबा खेचर
खर आहे आजच्या काळात
माझे उत्तर
गांधीवादाचा अतिरेक
गांधीगिरी
मी सुद्धा सुन्नझालो होतो.
In reply to गांधीगिरी by अवलिया
मी
स्व-हिंसा
गांधींची
वेगळा विचार
गांधीनिती
माझे मत.
In reply to गांधीनिती by केदार
मान्लं
गोळी असेल तर गोळीच.
In reply to मान्लं by दवबिन्दु
तत्वज्ञान
हो.
In reply to तत्वज्ञान by केदार
ओह!
In reply to हो. by कलंत्री
लेखमाला
अतिरेक्यांना अतिरेकी बनण्यापासून परावृत्त
ध्येयवादी विचारसरणी आवडली
गांधीवादा
हात कशाला...
गांधीवादा