मुंबईत 26 नोव्हेंबरच्या रात्री बेछूट गोळीबार करून अनेकांचे जीव घेणारा दहशतवादी महंमद अझमल अमीर कसाब मरणाच्या भीतीने हादरला आहे. आता तो क्षमायाचना करीत असून, मला आणखी जगायचंय, माझ्या आईला मला पाहायचंय, अशी विनवणी त्याने पोलिसांनी केली आहे.
मुंबईतील हल्ल्यावेळी कसाबला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आहे. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याने काही महत्त्वपूर्ण खुलासेही पोलिसांसमोर केले आहेत. चौकशीदरम्यानच तो कधी रोजच्या जेवणात मटणाची मागणी करतो, तर कधी रोज अमिताभ बच्चनचा एक चित्रपट पाहण्याची इच्छा बोलून दाखवतो.