तोतयांचे बंड!!!!
मंडळी, गेल्या दोन दिवसांत मिपावर एक महत्वपूर्ण घटना घडली......
तुमच्या लक्षांत आलीये का?
या दोन दिवसांत मिपावर एकंदर सहा (चूभूद्याघ्या) विडंबनं सादर झाली....
धनंजयने "धुकट सकाळ" लिहिली त्यावर बेसनलाडवाचं "फुकट सकाळ" हे विडंबन आलं.
आमची प्रेरणा जयंतरावांची सुंदर गझल सोबतीचा आव आहे आणि आमच्या गुरुजींचे दर्जेदार विडंबन (सोबतीचा आव आहे)
वाढला सांबार आहे, ब्रॉथ नाही
सोबतीला पाव आहे, भात नाही
भोवती अंधार आहे, रात नाही
चुंबिला तो पाय आहे, हात नाही
वाटतो हा खेळ पण ना फार सोपा
राहिले तोंडात बाकी दात नाही
घासतो मी स्वखुषीने रोज भांडी
सांगतो, पण मी तुझ्या धाकात नाही
