न्याय
काय हो सर, ह्याला न्याय म्हणायचा का?
माझ्याच एक विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न. मी उत्तर देउ शकलो नाही. बघा तुमच्याकडे असेल तर.
अजुनही संपर्कात असलेला माझा विद्यार्थी. लग्न होउन १० वर्ष झालेली. दोन मुले. मोठी मुलगी आठ वर्षाची. लहान मुलगा ४ वर्षाचा.
बायको सहकारी बॅकेत काम करते. हा मेंटेनन्स इंजिनियर असल्यामुळे सतत टुरवर. एवढा एक त्रास सोडला तर सुखाचा संसार.
४ महिन्यापुर्वी बायको आजारी पडली. युरीन इनेफक्शन्चे निदान झाले. ४ दिवस हॉस्पिटल मधे राहुन बरी झाली. परत एका महिन्यानंतर तोच त्रास. सर्व प्रकारच्या तपासण्या झाल्या. सर्वायकल बायॉप्सी पण झाली. अँटीबायॉटीक्सचे कोर्स पुर्ण झाले.
मिसळपाव