Skip to main content

कशी कोण जाणे

लेखक कौतुक शिरोडकर यांनी शनिवार, 21/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कशी कोण जाणे, तुझी याद आली मुक्या पापणीतून ओलावलेली आवर्जून मी एकेका सयीला कुलुपबंद केले मनाच्या तळाला वरी विस्मॄतीचा दगड रोवलेला तरीही...... ......तरीही पुन्हा आज डोकावलेली कशी कोण जाणे...... आवरून अवघे वेदनांचे भारे किती निग्रहाने लिंपलेले सारे तडे, चरे अन दुभंगलेले तारे तरीही...... ......तरीही पुन्हा भेग रुंदावलेली कशी कोण जाणे...... ना जाणे कुठे तू, कुणाच्या कुशीत जुनी कात टाकून, निराळ्या मुशीत अता गाठभेट, आहे स्वप्नातीत तरीही...... ......तरीही पुन्हा प्रीत आसावलेली कशी कोण जाणे......
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1084
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया