Skip to main content

तक्रार

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 13/04/2009 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
सखे मी शोधीतो तुझाच चंद्र कधीचा पाणावले नयन दर्शना तरसले का चांदणे सदा बरसले तुजवरी बरसताना कसे मलाच विसरले मोहरला देह ओलावली काया तुझी वाटेवरुन माझ्या मेघही परतले सावरले तुज पाहता मुग्ध दंवबिंदु क्षितीजावरले माझ्या धृवही सरकले थांबली पुनव, सखे तुज स्वागता स्वप्नातले बघ माझ्या चंद्रही फिकुटले विशाल

शेतीविषयक सल्ला :- कपाशीवरील बोंड अळी -लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 13/04/2009 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी बंधूंनो पाषाणभेद चा नमस्कार. आज आपण 'आपली माणसं व त्यांची माती ' या कार्यक्रमात "कपाशीवरील बोंड अळी -लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय" याविषयावर तांबडवाडीचे प्रगतीशील शेतकरी श्री. भाऊराव गव्हाणे यांचे विचार एकणार आहोत. पाषाणभेद: नमस्कार भाऊराव. भाऊराव: रामराम. पाषाणभेद: भाऊराव, आपण उस ह्या पिकाबरोबरच कपाशी हे मुख्य नगदी पिक घेतात. आपल्या भागात कपाशीवरील रोगांमध्ये 'कपाशीवरील बोंड अळी' ह्या रोगाची समस्या फार मोठ्या प्रमाणात उद्धभवते. याविषयी आपण काय सांगाल? भाऊराव: कपाशीवर पाने खाणारी अळी, मर रोग, मावा, तुडतूडे, खोड पोखरणारे भुंगे तसेच बोंड अळी या रोगांचा प्रार्दुभाव होतो.

चाहूल वसंतऋतूची!!

लेखक शाल्मली यांनी सोमवार, 13/04/2009 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
गेले ४-५ महिने घराच्या बाहेर झाडांचे खराटे, थंड वारे, एकतर बर्फ तरी नाहीतर नुसतीच भयानक थंडी, सगळे पक्षी उष्ण देशात पळून गेलेले असं चित्र बघून नुसता कंटाळा आला होता. अशातच एक दिवस म्हणजे साधारण २०-२२ मार्चच्या आसपास एक पक्षी चोचीत काडी घेऊन उडत चाललेला दिसला. आम्हाला चाहूल लागायच्या आधी पक्ष्यांना चाहूल लागली होती वसंतऋतूच्या आगमनाची! आता ३-४ दिवसातच अजून काही पक्ष्यांची घरटं बांधण्यासाठीची लगबग दिसू लागली.

नाशिक जवळची पांडवलेणी

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 13/04/2009 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिक जवळ असलेली पांडवलेण्यांचे छायाचित्रण. छा.१ लेण्याच्या पायथ्याशी असणारी पाटी छा. २ पांडवलेण्यांची माहिती असणारी पाटी छा. ३ मुख्य लेणी. या लेण्यात खुप मोठी सपाट लादी आहे. याचा वापर प्रार्थनेसाठी होत असावा. छा. ४ लेणी क्र. ४.

मराठी ब्लॉगकारांचं जागतिक अभिवाचन !!

लेखक जयवी यांनी सोमवार, 13/04/2009 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार. "शब्दबंध" ही मराठी ब्लॉगकारांची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी आयोजित करण्याचा विचार आहे. मराठी ब्लॉगांमध्ये लघुनिबंध, कथा, प्रवासवर्णने, कविता, विडंबन, व्यक्तिचित्र, पाककृती, इत्यादि वैविध्यपूर्ण लेखनाद्वारे ब्लॉगकार अनेक वर्षांपासून मनोरंजन, ज्ञानदान तसेच समाजप्रबोधन करत आलेले आहेत. आपल्या ब्लॉगांमधल्या निवडक पोस्टांचं अभिवाचन करणे व ब्लॉगजगतातल्या आपल्या बांधवांशी मनमोकळ्या गप्पा मारणे हा या ई-सभेचा उद्देश आहे. मराठीमध्ये १००% स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल.

डॅम इट !

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 13/04/2009 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
"डॅम इट !" "अरे नगमा, दिपीका सारख्यांपासुन तो कोण तो बिहारी नट, त्यांच्या नावाचा तिकिटासाठी विचार होतो आणी मराठीतील एका कलाकरालाच्या नावाची अफवा सुद्धा उठत नाही म्हणजे काय ? महेश कोठारे तावातावाने बोलत होता. काहि वेळाने धाप लागल्यावर परत एकदा 'डॅम इट' म्हणुन तो खाली बसला. "अरे बाबा त्यांच्या नावाला ग्लॅमर असत रे ! कळतय का तुला ?" स्मिता तळवळकर महेशला समजावत्या झाल्या. "का ? माझ्या श्वास चित्रपटाला ग्लॅमर न्हवते ? ऑस्कर पर्यंत वारु दौडला की त्याचा !" संदिप सावंतानी हिरिरिने आपला मुद्दा मांडला. "डॅम इट ! घरघर लागायची वेळ आलीये आता. काहितरी केलेच पाहिजे.

काय मंडळी कसं काय? :)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 13/04/2009 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
काय मंडळी, कसं काय? :) आमच्या गैरहजेरीत मिपा चाल्लंय ना रे बाबांनो बरोबर? काळजी घ्या रे मिपाची आणि सांभाळा व्यवस्थित. एकमेकांशी सारखे भांडू नका, अवांतर प्रतिसाद देऊ नका. सारे सलोख्याने वागा. मिपाधर्म वाढवा, मिपाधर्म जागवा! अजून काही काळ तरी मिपावर यायला आम्हाला टाईम भेटेल असं वाटत नाही. तोवर मिपाच्या संसाराची जिम्मेदारी मिपाच्या माननीय संपादकांवर आणि तुम्हा सर्व मिपाकरांवर! :) जगभर मिसळपाव धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आम्ही हे इवलेसे रोप द्वारी लाविले आहे, आपल्या सर्वांच्या सहकार्याने तयाचा वेलू असाच गगनावेरी जाऊ द्या! :) आपलाच, श्री संत तात्याबा महाराज मिसळपावकर.

पौर्णिमा..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 13/04/2009 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
हृदयांत रंगलेल्या खेळात येशील का? हा डाव प्रीतिचा गं तू पूर्ण करशील का? बघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे मज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का? पाऊस घेत हाती मल्हार छेडतो मी, होऊन धार मजला, तू चिंब करशील का? दिवसांत कैकवेळा घेतो मिठीत तुजला होऊन रातराणी श्वासात उरशील का? भिजल्या अनेक रात्री बघ आठवांत तुझिया ओलावल्या मनाने मज तू स्मरशील का? दिधले मला सखे तू उद्दिष्ट जीवनाचे ते ध्येय पूर्ण करण्या तू हात धरशील का? हे पाहिले तुझ्या मी, डोळ्यांत स्वप्न माझे घेऊन ते उराशी साकार करशील का? - प्राजु
Taxonomy upgrade extras

भीमाशंकर : खांडस मार्गे.

लेखक हर्षद आनंदी यांनी सोमवार, 13/04/2009 05:24 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण तीन वर्षांपुर्वीची गोष्ट. पुण्यातील स्.प. महाविद्यालयाजवळ मास्टेक कंपनीचा बीपीओ होता, तिथे मी संगणक अभियंता म्हणुन कार्यरत असताना, तेथील काही हौशी तरुणांनी एकत्र येउन गिरीभ्रमण कंपू स्थापन केला. त्यांच्या पहिल्या गिरीभ्रमणाचे यश बघुन, मी सुध्दा त्यांच्या कंपुत सामील झालो. काही नवखे, काही अनुभवी असे आम्ही सह्याद्रीत भटकंती करायला सिध्द झालो. लोहगड, राजमाची असे सोपे किल्ले सुरवातीला केल्यावर जरा अवघड म्हणुन "भीमाशंकर" करायचे ठरले. आमच्या पैकी बरेच जण आधी गाडीनी जाउन आल्यामुळे तसे फार काही अवघड नसल्याच्या भ्रमात होते.

सागर किनारी...

लेखक उमेश कोठीकर यांनी सोमवार, 13/04/2009 05:22 या दिवशी प्रकाशित केले.
सागर किनारी दोघेच असावे बोलता बोलता मिठीत शिरावे मिठीत शिरून लटके रुसावे प्रेमाच्या आर्जवी खुदकन हसावे खुदकन हसूनी भुलावे झुलावे रुपेरी वाळूत पाउल नाचावे नाचत हळूच हात हे गुंफावे स्पंदन प्रेमाचे हृदयी ऐकावे हृदयी ऐकावे डोळ्यांत बघावे निळुल्या पाण्यात डुंबुनी यावे डुंबता डुंबता श्वास हे दुणावे ओठांचे अमृत ओठांत शिरावे ओठांत शिरूनी गुलाबी जगावे स्वप्नांच्या गर्भाचे बीज तू व्हावे!
Taxonomy upgrade extras