Skip to main content

धम्मक लाडू आणे चापट पोळी

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी शनिवार, 18/04/2009 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, साहित्य : १ लहान ( वय वर्षे ५ ते १५ मधील कोणत्याही गटातील ) भेदरलेला / ली मुलगा किंवा मुलगी. संतप्त आई किंवा बाबा ; तोंडी लावण्याकरीता आत्या , आजोबा , आजी , मावशी इ. कृती: ही अशी कृती आपल्या घरात नेहमी घडत असेलच. अभ्यास न केल्यामुळे किंवा त्याचे नुसते सोंग आणल्यामुळे ; मस्ती केल्यामुळे (जास्त की कमी हा प्रश्न इथे येत नाही ) ; सांगितलेले न ऐकल्यामुळे अनेकवेळा चापट पोळी खायचा प्रसंग येतो. ही गालावर ; चुकवण्याचा प्रयत्न केल्यास हातावर आणि त्यानंतर मग अजून जोमाने परत गालावर पाठीवर कुठेही खाऊ शकतो. अर्थात कधी कधी लाडात सुद्धा खाण्यात मजा येते. आता धम्मक लाडू : हा प्रकार वरचेवर बनत

पौर्णिमा

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 17/04/2009 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
काव्य विभागातल्या पौर्णिमा पाहून {वाचून} मला माझी पौर्णिमा खुणावू लागली. थोडी वेगळी पौर्णिमा. हाकारले फुलांनी अंगार शोधताना मज पौर्णिमा गवसली अंधार शोधताना एकेक पाकळीचा एकेक सूर झाला हरपून भान गेले गंधार शोधताना माझ्यापुढे खुली ही झाली कुबेरनगरी, माझ्याच अंतरीचे भांडार शोधताना डोळ्यांत दाटलेले ते भाव मूर्त झाले नाकारण्यात दडला स्वीकार शोधताना खुलली अजाणता ती विश्वातली रहस्ये, सगुणात निर्गुणाचा आकार शोधताना मी, सावळ्या अरूपाची ब्रम्हलीन छाया झाले तपस्विनी का संसार शोधताना?

<कंडक्टर...>

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 17/04/2009 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा मिपाकर.. "एक होता मिपाकर" "दररोज करी लिखाण" "काही नसे प्रॉब्लेम" "प्रतिसाद रोज येती छान" "मात्र एक दिवस" "मिपावर आला फाजीलराव" "लिखाण दिसताच,म्हणला" "सोसा आता आमच्या टीकेचा घाव" "आम्ही कधीच चांगला प्रतिसाद देत नाही" "पुसा हव तर सारा गाव" "मिपाकर पडला नवखा सभासद" "फाजीलराव पडले अंतर्जाल रेक्टर" "मिपाकराचे लिखाण प्रामाणिक पण" "फाजीलराव खेचे प्रतिसाद शंभर" "दररोजच फाजीलराव टीकास्त्र सोडे" "मिपाकराचे मित्रच थोडे" "मिपाकर मग ईरेला पेटला" "त्वरीत जाऊन जालिंदर बाबाला भेटला" "लेख,काव्य- प्रतिसादा मध्ये झाला मास्टर" "फाजीलरावाना म्हणे,ए मिस्
Taxonomy upgrade extras

आईन्स्टाईनचा विशेष सापेक्षतावाद आणि व्यापक सापेक्षतावाद (Special & General Theory of Relativity)

लेखक टायबेरीअस यांनी शुक्रवार, 17/04/2009 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस या विषयावर वाचन चालू आहे. सर्वाना पटकन समजेल असा गणितात फारसे न शिरता लेख लिहावा असे मनात आहे. कोणी आधीच हे कार्य केले असेल तर प्लीज मला दुवा (लिंक, आशिर्वाद नव्हेत) द्या. तसेच मिपावरील (वि)ज्ञानी मंडळी (वि. अदिती वगरे) मदत करू शकली तर ग्रेट्च! -टायबेरीअस

माझाही उखाणा

लेखक निशिगंध यांनी शुक्रवार, 17/04/2009 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
माझाही उखाणा, आम्ही सर्व वर्गबंधू नी ठरविले आहे की, स्वतःहाच्या लग्नात हा उखाणा घ्यायचा. फोल्डरात फोल्डर, फोल्डरात फोल्डर ___ चे नाव घेतो, मी M.Tech होल्डर.... _निशिगंध

पाप येवढे आहेत डोक्यावर...

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 17/04/2009 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
कर्म, आराध्य व मी ह्यात सध्या गुरफटलो आहे मी काय शेवटचे लिहू तुझ्यासाठी काही असेच शब्द, जे माझ्या मनातून उमटत आहेत. काय नाही दिलेस तु मला जिवनामध्ये ? जेवढे जगलो सुखाने जगलो, काही क्षण दुखाचे तर काही क्षण सुखाचे ! माझे कर्मभोग तरी ही तु साथ होतीस, दुखात ही तु सुखी होतीस...

सख्खे शेजारी

लेखक जागु यांनी शुक्रवार, 17/04/2009 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्यातली दोन मनं अगदी सख्खे शेजारी एक वेडं , तर एक शहाणं ! वेड्याच्या हाती तलवार तर शहाण्याच्या ढाल ! वेडं वाट चुकत असतं नको तिथं धावत सुटतं शहाणं वाट शोधून काढतं योग्य जागी नेऊन सोडतं ! वेडं सतत घाईतच असतं संयमाशी पटतच नसतं शहणं मात्र शांत असतं धिराच फळ त्याला हवं असतं ! वेडं मन हट्टाला पेटतं धगधगत्या श्वासांनी काळीज पेटवतं शहाणं त्याला जवळ घेतं समजूतीच्या ओलाव्याने त्याला शांत करतं !
Taxonomy upgrade extras

माझे उखाणे

लेखक Sona यांनी शुक्रवार, 17/04/2009 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लाल फुल गणपतिला वाहते वाकुन .......आणि......आणि...... चे नाव घेते तुम्च्या सर्वान्चा मान राखुन

सर्वाधिक वेळा पाहिलेले चित्रपट

लेखक मिसळभोक्ता यांनी शुक्रवार, 17/04/2009 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
लोक्स, आपण चित्रपट पहात असालच. काही चित्रपट आवडतात, काही नाही आवडत, खरे की नाय ? पण एखादा चित्रपट आवडला, तर कधी तो पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो !