नमस्कार,
साहित्य :
१ लहान ( वय वर्षे ५ ते १५ मधील कोणत्याही गटातील ) भेदरलेला / ली मुलगा किंवा मुलगी.
संतप्त आई किंवा बाबा ; तोंडी लावण्याकरीता आत्या , आजोबा , आजी , मावशी इ.
कृती:
ही अशी कृती आपल्या घरात नेहमी घडत असेलच.
अभ्यास न केल्यामुळे किंवा त्याचे नुसते सोंग आणल्यामुळे ; मस्ती केल्यामुळे (जास्त की कमी हा प्रश्न इथे येत नाही ) ; सांगितलेले न ऐकल्यामुळे अनेकवेळा चापट पोळी खायचा प्रसंग येतो.
ही गालावर ; चुकवण्याचा प्रयत्न केल्यास हातावर आणि त्यानंतर मग अजून जोमाने परत गालावर पाठीवर कुठेही खाऊ शकतो.
अर्थात कधी कधी लाडात सुद्धा खाण्यात मजा येते.
आता धम्मक लाडू : हा प्रकार वरचेवर बनत नाही . त्यासाठी कारणही तेव्हढंच सबळ असावं लागतं.
उदा. बाबांनी सिगरेट ओढताना पकडणे पण दुसर्याने चहाडी करून सांगितल्यास जास्त मजा येते.
किंवा नापास झाल्यास अथवा ते बरेच दिवस लपवून ठेवल्यावर उघडकीस आल्यावर वगैरे.
हे काही मासलेवाईक दाखले आहेत . आपण आपली भर घालण्यास हरकत नाही.
वरील दोन्ही प्रकारात खाण्यार्यापेक्षा देणार्यास जास्त मजा येते.
वाचने
4026
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला
चांगला
In reply to चांगला by विनायक प्रभू
फोटु
मस्त!
माझ्या
धम्मक लाडू आणे चापट पोळी दिल्यावर फुगणारे लाल गाल कुठे आहेत
हा हा...