माझ्या शेजार्याचा शाळकरी चिरंजीव भारीच हुशार, तल्लख बुद्धीमत्तेचा, उत्साही आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, चित्रकला, हस्तकला, वैज्ञानिक प्रयोग यावरील नाना प्रश्न विचारून मला हैराण करतो नुसता. विमान कसं काय हवेत उडतं? या प्रश्नाचं उत्तर देताना त्याला राईट बंधूंची कथा सांगितली तर पठ्ठ्या भारावला. आपण सुद्धा विमान बनवू म्हणून मागे लागला. चर्चा रिमोट कंट्रोल्ड विमाना पर्यंत चालत आली. रिमोट कंट्रोल्ड विमानाचं फक्त इंजिन कसं बनवायचं सांगा बाकीचं विमान मी स्वतः बनवतो म्हणून माझं डोकं खाऊ लागला. कुठून दुर्बुद्धी झाली आणि राईट बंधुंची कथा त्याला सांगितली असं होऊन गेलं. त्याची समजूत काढता काढता नाकीनऊ आले.