अक्षय तृतियेचा आणी आंबे खाणे याचा काय संबंध आहे??
अक्षय तृतियेचा आणी आंबे खाणे याचा काय संबंध आहे.
आमच्या घरी अक्षय तृतिया नंतरच आंबे खाण्याची परवानगी आहे. व का खायचे हे विचारायची पण सोय नाही X( . एक दोनदा विचारले पण उत्तर मिळाले " आम्ही आमच्या तीर्थरुपांना असले प्रश्न नाही विचारले, विचारले असते तर तुम्हाल उत्तर दिले असते" :W :W
मला आंबे खुप आवडतात व मी चोरुन (घरच्यांपासून) ती खुप खातो. अगदी पहील्या दिवसापासुन ( जेव्हा प्रथम दिसतील) पाउस पडेपर्यंत जवळपास रोजच आंबा पोटात जातोच. :D :D :D
पण राजरोस घरी आणून खाण्यासाठी अक्षय तृतीयेची वाट पहावीच लागते. आणी तोपर्यंत रोज मनात भिती की, आंबे संपतील.
पण असे काय?
याला काय धार्मिक आधार आहे काय?
मिसळपाव
अशा या जांबाजला भावपुर्ण आदरांजली