भारतीय समाज आणि कुटुंब
साप्तहिक लोकप्रभा मधिल हा लेख काही दिवसांपूर्वी वाचनात आला, जाणकार मंडळी कडून या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यात यावा अशी विनंती
कुटुंबसंस्था आम्ही पवित्र असल्याचे धरून चालतो. तिचे गोडवे गातो. पण प्रत्यक्षात तो काय आहे हे लक्षात घेत नाही. कारण येथे विचारांवर संस्कार मात करतात. कुटुंब संस्था ही मुळात शेती संस्कृतीची निर्मिती आहे. कुटुंब हे मालमत्तेचे एकक म्हणजे युनिट ऑफ प्रॉपर्टी असते. त्यात कुटुंबप्रमुखाची एकाधिकारशाही व इतरांचे दुय्यम स्थान अटळ असते. कुटुंब सत्ताकारणापासून कधीच मुक्त नसते. त्यामुळेच पिता-पुत्र संघर्ष उद्भवतात. शेतीचे संरक्षण स्वत:च करावे लागते.
मिसळपाव