Skip to main content

मुंबईतले उंदीर !!

लेखक बामनाचं पोर यांनी सोमवार, 03/08/2009 07:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल मुंबईत उंदीर फार झालेत भौ.. म्हाडा व मुंमप्रविप्रा चे कार्यालय ह्यांचे मुख्यालय झाले आहे म्हणे . बर हे साधेसुधे नाही खास प्रशिक्षण घेतलेले उंदीर आहेत. ते वर्सोवा, जुहू , बॅन्डस्टॅन्ड , मलबार हिल्स इथं राहण्यारया बड्या धेंड्याच्या अजीबात वाटेला जात नाहीत.. त्यांचे सगळे लक्ष हे मुंबईत नेट लावून अजुन तरी टिकुन राहीलेल्या मराठी माणसावर आहे... ह्या उंदीरांचा त्रास फार वाढल्यावर वांद्रेकर जाम रागवले.. त्यांनी शेवटी २५-३० हजार सैनिकांना बरोबर हातात पिंजरे घेउन एक जोरदार मोर्चा काढला अन " शेपट्या खेचुन बाहेर काढू " असा दम दिला.

देशांच्या राजकारणांतील स्त्रीयांचे योगदान

लेखक प्रदीप यांनी रविवार, 02/08/2009 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
कोरी अ‍ॅक्विनो ह्या फिलिपिन्सच्या एकेकाळच्या राष्ट्राध्यक्ष असलेल्या स्त्रीचे काल निधन झाले. फर्दिनांद मार्कोस ह्या हुकुमशहाची राजवट उलथून टाकून लोकशाही सरकार प्रस्थापित करण्याचे श्रेय (१९८६) ह्या स्त्रीकडे जाते. मार्कोस ह्या जुलुमशहाने १९७२ सालापासून फिलिपीन्समधे अनिर्बंध सत्ता उपभोगली. 'निनो' अ‍ॅक्विनो ह्या तरूणाने त्याचा सामना करण्याचा प्रयत्न केला तो निष्फळ ठरला व अ‍ॅक्विनोस त्याच्या कुटुंबासह परागंदा व्हावे लागले. १९८३ साली निनो लष्कराच्या देखरेखीखाली देशात परतताच मनिला विमानतळावरच त्याची हत्या करण्यात आली. ह्यामुळे तेथे जनक्षोभ उसळला.

एकाच चालीची बंगाली आणि हिंदी गाणी

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 02/08/2009 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
तात्यांनी पुरवलेल्या मुखपृष्ठावरच्या सलील चौधरींच्या आणि लतादीदींच्या गाण्यावरून आठवलं की बंगाली आणि हिंदी या भाषाभगिनींमध्ये अशी देवाणघेवाण बरेचदा झालीय, इथे मी फक्त बंगाली ते हिंदी असा प्रवास केलेली (आणि प्रामुख्याने सलीलदांची) काही गाणी देतोय, त्यांत लताखेरीज इतरही गायक आहेत (इथे रफीचं आणि मुकेशचं एक-एक उदाहरण दिलंय, किशोरकुमारनेही अर्थात् बरीच गाणी गायलीत). ही गाणी गोळा करतांना हे जाणवलं की बरेचदा मूळ बंगाली गाण्यांतील शब्दांशी त्यांच्या हिंदी-करणातही ईमान राखलं गेलंय, तर काही वेळा (चित्रपटातील प्रसंगाशी अनुरूप म्हणून असतील, पण) वेगळीच भावना घेऊन हिंदी गाणी समोर येतात.

सुधारणा कशा कराव्या?

लेखक अजय भागवत यांनी रविवार, 02/08/2009 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आधी ज्यात सुधारणा करायची आहे त्या परिस्तितीतील परस्पर व अपरस्परसंबंध तपासावे लागतात. जसे, जगामध्ये कोट्यवधी माणसं व घटक आहेत आणि ह्यामुळे ह्या दोघांतील परस्पर संबंधसुद्धा अनंत असतील. ढोबळतेने ह्या संबंधांचे दोन विभाग करता येतील- परस्परसंबंधीत व असंबंधीत. परस्परसंबंधीत घट्कांमध्ये एखादा उद्देश असु शकतो व त्याचा तर्क लावता येऊ शकतो- उदा- १. कारण आणि परिणाम: आगीचे कारण सिगारेटचे थोटूक होते २. विरोध: आग आणि पाणी ३. साधर्म्य: लाकडी आणि लोखंडी फडताळ ४. घनिष्टता: टेबल आणि खूर्ची चटकन आठवण्यासाठी ह्याचा संबंध लावून बघा: (क्रम मुद्दाम बदलला आहे) १. भावंडं २. पति आणि पत्नी ३. मित्र ४.

ड्यूक्‍स नोजचा धडा

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 02/08/2009 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
dukes2 खंडाळ्याच्या रेल्वे स्टेशनपासून सुरू होणारी वाट --- dukes3 वाटेतला छोटा, पण निसरडा ओहोळ ---

तिने केली एक कविता

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 01/08/2009 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
तिने एक कविता केली अन् विचारले "कशी वाटली"? मी म्हणालो "नदी, झरे, चांदण्यांची पान भरुन दाटी झाली" कविता कशी हवी वास्तवदर्शी अन् आरस्पानी काळजाला भिडणारी मनाला जरा पिडणारी विचार करायला लावणारी अन् काळाबरोबर धावणारी (म्हणजे नको नॉस्टेलजिक ) ती म्हणाली " अरे ,आपण वास्तवतर जगतोच आहोत मग कविता हवी कशाला तू वास्तवाच्या ऐदीसाठी स्वप्ने घेतोसच कि उश्याला. कवितासुध्दा एक स्वप्न - मुक्त विचारांना पडलेलं त्यामध्ये मग काहिही येईल पानं, फुलं, टोपड, झबलं कवितेतलं वास्तव म्हणजे नक्की रे असतं काय ? -वास्तवतेच्या भावनांना कल्पनेचेच ना असतात पाय ? नको कविता नॉस्टेलजिक नको आठवणींचे रान पण, प्

खरवस

लेखक मितालि यांनी शनिवार, 01/08/2009 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
गाय/ म्हैशीच्या चीकापासुन ख्ररे तर हा खरवस बनवला जातो. पण हा त्याला पर्यायी म्हणा किंवा त्यासारखा पदार्थ.. कोकणी पद्धतीची पाककृती देत आहे. पाव लीटर साध्या थंड दुधात एक अंडं फेटुन घाला. १/२ चमचा जीरे , १/२ वाटी ओले खोबरे रवाळ वाटुन घ्या. थोडा गुळ किसुन घ्या. हे सगळ दुधात नीट मिसळुन घ्या. गुळाचे खडे रहाता नये, चवीला अतिगोड असता नये. हे मिश्रण कुकर मधे / ढोकळ्या प्रमाणे वाफवुन घ्या.

ध्येय!

लेखक राघव यांनी शनिवार, 01/08/2009 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाकडे बघतांना मनांत आलेले विचार मांडण्याचा हा प्रयत्न. :) आषाढ-श्रावणाची ती गाज सांगते मज, भूमीत वेदनेच्या पेरीत सुख निघावे! अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही.. मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे! कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही..(पण) कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे! प्रत्येक दिस नसावा मृत्यूस याचणारा.. क्षणैक मेघनेसम दिपवून सर्व जावे! कित्येक जन्म सरले काट्यांत रोधलेले..(पण आता) आभाळ न्हायलेली धरती मला खुणावे!! राघव
काव्यरस