मौनभंग केल्याने इरादा असत्यभासाचा आहे असं वाटेल.
आज प्रो.देसाई जरा गंभीर दिसले.
"तळ्यावर फिरायला आल्यावर सर्व विवंचना घरी ठेवून यावं"
असं सांगणारे स्वतः भाऊसाहेब आज कसली विवंचना घेऊन आले आहेत ह्या विवंचनेत मी पडलो.मी भित भितच त्यांना विचारलं,
"घरी सर्व ठिक आहेना?"
"ठिक नसायला काय झालं?.जो तो आपली जबाबदारी संभाळत आहे.नातवंड शाळा कॉलेजात दंग आहेत.मुलं आपल्या काम धंद्यात बिझी आहेत.कामावर तरी निदान बिझी असल्यासारखं दाखवावं लागतं.सध्या जॉब टिकण्याची काही खात्री नाही.राहाता राहिलो आम्ही म्हातारी कोतारी माणसं.सकाळी उठल्यावर गुडघे दुखत नाही हे समजल्यावर समजावं आपण ठिक आहो.ह्यावरून कळलं ना तुम्हाला की सर्व ठिक आहे ते.?"
प्रो.देसायानी एव्हडं सविस्तर
मिसळपाव