Skip to main content

नव्वदोत्तरीतले संग्राह्य, वाचनीय साहित्य

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 25/02/2010 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातून काही पुस्तकं घ्यायची आहेत. त्यासाठी संग्राह्य, वाचनीय पुस्तकांबाबत मिपाकरांकडून सूचना हव्या आहेत. विशेषत: नव्वद सालनंतरची, कारण तशी माझ्याकडे खूप थोडी आहेत. पण ती अगदी काटेकोर अट नाही. तेव्हा कृपया आपल्याला आवडलेल्या, गेल्या काही वर्षात वाचलेल्या कथा, कविता, कादंबरी, नाटक याविषयी कळवा. जर अशी चर्चा आधीच झालेली असेल तर दुवा द्या.

प्रेमबन

लेखक वर्षा म्हसकर-नायर यांनी गुरुवार, 25/02/2010 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
कळीचे उमलणे, बहरणे तीच्या हाती नव्हते प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते. भ्रमराने यावे, प्रेम बरसुन जावे, तीला उमलावे, तीने झंकारुन जावे भ्रमराचे हे येणे , तीला उमलवणे तीच्या हाती नव्हते, प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते. भ्रमराने मग तीला सोडुन जावे तीला दु:खात बुडवुन टाकावे भ्रमराचे हे सोडुन जाणे, तीला कोमेजवणे तीच्या हाती नव्हते. प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते. पुन्हा नविन भ्रमराचे येणे, पुन्हा प्रेमात डुंबणे पुन्हा खंगणे आणि पुन्हा कोमेजणे सारे कसे क्रमाने, नियमाने घडत होते जरी ते घडणे तीच्या हाती नव्हते प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती
काव्यरस

विक्रमादित्याचा पोवाडा

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 25/02/2010 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी म्हणती वाघ म्हातारा कीं हो झाला SSSSSSSSSSS कुणी म्हणे त्याचा दरारा कीं संपला.... हो ओ SSSSSSSS पण महाराजा... शेर आखीर शेर होता है...... त्यानं सोडला नाही ठाव..SSS, सोसले..., गुमा SSS न सारे घाव SSS.... लावला नेम, पकडली येळ ..... अन डाव कीं हो साधला ..... जी ई ई SSSSSSS सन २०१०, वार बुधवार, स्थळ ग्वाल्हेरनगरी बडी पाव SSS न ... राजानं यवनांशी दावा कीं हो मांडला..SSSSS रणभेरी वाजलेली आहे, गनिम माजलेला आहे.... पहिल्याच घावात राजाचा सेनापती कीं हो पाडला.... शत्रुसैन्यात आनंदी आनंद झालेला आहे.... राजाच्या सैन्यात हाहाकार...
काव्यरस

दिल्लीकरांचे प्रायवेट न्यूज चानल्स आणि आपला सचिन भाग- १..........

लेखक मंगेशपावसकर यांनी गुरुवार, 25/02/2010 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
सचिन तेंडूलकर म्हटलं तर त्याचा भोवती एक वलय आपसूकच निर्माण होत. त्याचा विषयी सांगावं तर एक लाजाळू, अंतर्मुख,साधा माणूस आहे. पण त्याचा संयम त्याची एकाग्रता अद्वितीय आहे . एक असा खेळाडू आहे कि क्रिकेट खेळावं तर ह्याने आणि पहाव ते उरलेल्या जगातल्या बाकी सर्व लोकाने आपला सचिन आहेच मुळी तसा पण एक गोष्ट आहे जी इकडे सांगावीशी वाटते ती म्हणजे हिंदी {दिल्ली } पत्रकारिता अर्थात दुरसंच पत्रकारिता (मिडिया) काल-परवा पर्यंत सेहवाग सेहवाग करणाऱ्या दिल्लीकरांच्या प्रायवेट न्यूज चानल्सने आज एकदम सचिन च्या नावाचा गजर सुरु केला तो संपूर्ण टी आर पी मिळवे पर्यंत.

चल उसात दंगा करू

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 25/02/2010 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
चल उसात दंगा करू मंडळी, आप्ला ह्यो हिरो आन हिरवीन मस्तपैकी श्येताव आल्याली हायेत. त्ये काय करूं र्‍ह्यायलेय त्ये पाहू चला: (पैकं नसल्यांनं एका डबड्यात ग्येल्येल्या पिच्चरमंधी ह्ये गानं टाकेल हाय.) हिरो:
पिक आलं वयात आता नको उशीर तू ग करू अग पारू... चल उसात दंगा करू
हिरो:

डोईवरी पदर घेवूनी आलीस मोठ्या नखर्‍याने सांग सजणी भ्यालीस का तू माझ्या असल्या वागण्याने?

काव्यरस

नोकिया E63 आणि वायफाय राउटर

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 25/02/2010 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
नोकीया E63 वायफाय राउटरशी कसा कॉनफिगर करायचा हे कुणाला ठाउक आहे का? माझ्याकडे नेटगिअरचा राउटर आहे.

३ चारोळ्या

लेखक sur_nair यांनी गुरुवार, 25/02/2010 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या हृदयाची स्पंदने तुझा हळुवार श्वास प्रणयी संगीताचा जणू एक नवा आभास ****** वाऱ्याचा वेगही कधी सहज मंदावतो तुझ्या गंधाने वेडा तोही छंदावतो ****** कधी तुझा स्पर्शही मला मोरपिसापरी भासे आताशा तुझे श्वासही वाटतात जणू उसासे
काव्यरस

खट्टा - मिठा

लेखक टारझन यांनी गुरुवार, 25/02/2010 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , जेन म्याडमनं आज ताकिद देऊन सुटी घ्यायला लावली होती. कालंच अ‍ॅप्रायझल मिटींग मधे बॉसनं तासभर डोकं तासलं होतं ! " ट्राय टू टेक मोर रिस्पाँसिबीलिटीस ... (म्हणजे आणखीन राबा रोज) " , " वी आर हॅविंग प्लान्स फॉर यू ( ढिश्क्यांऊऊऊ.. गोळ्या द्यायला सुरूवात " , " फिनिश अप द प्रॉजेक्ट अँड अल्सो लुक इन ऑदर्स प्रॉजेक्ट्स अल्सो ( घरचं झालं थोडं ... आता व्याही धाडतोय घोडं ) ... इत्यादी इत्यादी टिपीकल म्यानेजरियल गोष्टी सांगुन झाल्यावर सुट्टी सोडाच, पण एक्स्ट्रा कामाचा काँप ऑफ घेणं ही अवघडल्यासारखं वाटू लागतं ! पण आमच्या हायकमांड कडून आदेश आल्यावर काही उपयोग आहे का ?