Skip to main content

आंधळ्याच नशीब

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 31/05/2010 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
अंधा-या रात्री चालत होता एक आंधळा भुकेले पोट व घेउन सुका गळा रात्र की दीवस त्याला न कळे,कसे कळणार होते डोळे आंधळे, रस्त्यावरच्या वाहनांची गती ना कळली, गतिमान गाडी त्याच्या देहावर वळली. "परमात्म्याने ही सजा का दीली?", कळायच्या आत हे,त्याची प्राणज्योत विझली. गेला मात्र स्वर्गात्,भेटला परमात्मा, दु:खी होउन 'त्याने',सोडला धरतीवर आत्मा. आंधळ्याची ती आत्मा होती तर डोळस, पाहुन धरतीवरील दु:ख झाला दु:खाचा कळस. असह्य झाल्या त्या वेदना,गेला तो वरती, म्हणे "काय पाहु ती दु:खी व लोभी धरती" परमात्मा म्हणे , "तु दु:खी खाली पण व वरती, काय कामाची तुझ्या ती सुंदर,रम्य धरती?" Note : हे अकलीचे तारे आम्ही ईयत्ता
काव्यरस

ट्वायलाईट : एक अजब प्रेमकहाणी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 31/05/2010 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस लिहिन लिहिन म्हणता म्हणता ह्या चित्रपटावर लिहायचा आज मुहुर्त उजाडला. शुक्रवारी काहीच काम धाम नसल्याने ट्वायालईट चौथ्यांदा बघितला, चित्रपटाचा फारच परिणाम पुन्हा एकदा मनावर झाल्याने शनिवारी देखील परत बघितला आणी काल चक्क रात्री जागुन पुन्हा एकदा स्टार मुव्हिजवर बघितला. येवढे आहे तरी काय ह्या चित्रपटात ? ह्यात आहे एक अनोखी प्रेम कहाणी.

बरे नाही

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 31/05/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
गझल सम्राट सुरेश भट ह्यांची एक अतिसुंदर गझल.
काव्यरस

आपल्या आवडत्या websites कोणत्या ते कळेल का? खरोखर नवीन

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 31/05/2010 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
हे ठळक अक्षरात लिहलेल नवीन आहे. पहील्यांदा पुण्याचे पेशवे ह्यांचे आभार.......त्यांच्या खवमधील प्रतिसादासाठी. आवडती website म्हणजे ज्यावर आपण कमीतकमी दीड तास आरामशीर टाईमपास करु शकतो अशी असावी. म्हणुन ह्या काही देतोय....... http://www.ugo.com/channels/comics/heromachine/classic.asp ह्यावर आपण आपल्या कल्पेनेतला हीरो आकारु शकतो,मी जेव्हा पहील्यांदा ह्याला भेट दीली तेव्हा २-३ तास रेखाटल एक पात्र आता format मारल्यावर नाहीये ते माझ्याकडे. Know yourself अस टाईप केल्यानंतर ज्या खुप साईट्स गूगल दाखवत त्यात ही अव्वल आहे.

नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तेच...

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 30/05/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला रोजच्या जीवनात असे अनेक व्यक्ती भेटतात जे "नको तेव्हा, नको तिथे, नेमका नको तोच" प्रश्न विचारून किंवा "नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तसेच" वागून आपल्याला अडचणीत आणतात. :-) ते एकतर हे अगदीच सवयीने किंवा अजाणतेपणे करत असावेत नाहीतर अतिशय जाणून बुजून करत असावेत. तशी ही प्रवॄत्ती जगभर थोड्याफार प्रमाणात असतेच.

पिकल्या आंब्याला

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 30/05/2010 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
पिकल्या आंब्याला सिच्यूऐशन: हिरवीन आंबे विकणारी आहे. आंबे विकतांना ती गिर्‍हाईकांशी काव्यातून संवाद साधते... गद्य: आंबे घ्या आंबे, गोड गोड रसाळ आंबे आंबे घ्या हो आंबे!
काव्यरस

(तीळ आणि त्याचा अर्थ)

लेखक सुनील यांनी रविवार, 30/05/2010 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
आता ह्या तीळाचा अर्थ काय तो आम्हास ठाऊक नाही. परंतु, जे काही आहे ते ह्या तीळामुळेच, अशी आमची खात्री आहे! ;)

प्रकाशकांचा आनंददायक वेगळा अनुभव

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 30/05/2010 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाशकांचा आनंददायक वेगळा अनुभव
वाचक व लेखक दोघांनाही लुटुन अशा प्रकाशन संस्था मोठ्या होतात. भाबड्या लेखक, वाचकांना हाताशी धरुन नवे नवे पुस्तकमाफिया प्रकाशन व वितरण व्यवसायात तयार होत आहेत.
विविध प्रकाशकांच्या कहाण्या व लेखकांची व्यथा वाचून मी खरोखर सुदैवी असे म्हणायला हवे.

सॉक्रेटीसचा मृत्यू : ३९९ बी.सी.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 30/05/2010 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
सॉक्रेटीसचा मृत्यू : ३९९ बी.सी. मग रक्तरंजित क्रांती झाली. मरणाला न घाबरता, आपापल्या विचारांशी ठाम रहात लोकांनी मृत्यूलाही कवटाळायला कमी केले नाही. या युध्दामधे लोकशाहीवाद्यांचा विजय झाला, तेव्हाच सॉक्रेटीसचे भवितव्य ठरले गेले. कारण स्पष्ट होते. तो एक बुध्दीवादी आणि तरुणांना बिघडवणारा तत्वज्ञानी होता ना ! तरूणांना वादविवादांची धुंदी त्याच्या शिकवणीमुळेच तर चढली होती. तरूणांची बुध्दी व मती भ्रष्ट करणार्‍या माणसाला जगण्याचा आधिकार द्यायचा प्रश्नच उद्‌भवत नव्हता.

गड्याऐवजी माझ्या श्रीमुखात!

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 30/05/2010 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
(सदर लेख माझ्या मातोश्रींनी लिहिला असून २४ मे २०१०च्या सकाळ मुक्तपीठात प्रकाशित झाला आहे. मिपाच्या नियमांत बसत नसल्यास काढून टाकायला हरकत नाही.) सुमारे पन्नास वर्षांपूर्वी घडलेली हकिगत मी सांगत आहे. त्यावेळी मी दहा वर्षांची असेन. अगदी बारीकशी, कुणाच्या अध्यात ना मध्यात. आई- वडील, आजोबा, दोन काका-काकू, चुलत भावंडे असे भरलेले घर. मोठ्या भावडांमध्ये खूप दंगामस्ती, भांडणे चालयची. कधी कधी त्यांना आजोबांच्या छड्या खाव्या लागत. माझ्या जन्मानंतर वडिलांचा व्यवसाय अधिक भरभराटीला लागला त्यामुळे मी त्यांची फार लाडकी मुलगी होते आणि असे सर्व असताना मला माझ्या वडिलांनी अगदी अचानक एक सणसणीत थोबाडीत दिली.