Skip to main content

शाब्द ज्ञान

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 22/06/2010 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
शाब्द ज्ञान (कल्पनारम्य कथा) - - - असिद्धवदत्रा! भाति सर्वं शब्देन विना । येथे सर्व काही असिद्ध असल्यासारखे भासतंय हो! शब्दांविना बुद्धी काही समजूच शकत नाही, असे तर नाही ना? नासदासीन्न सदासीत् । "असणे" आणि "नसणे" हेच शब्द नसले तर ज्ञान कुठले? तसे नव्हे. काहीतरी आहे. शब्द नसले तरी संवेदनांमधून काही कळते. नावे नाहीत म्हणजे ज्ञानच नाही, हा भ्रम आहे. "नाव" हे कसले नाव? नाव म्हणजे संकेत-शब्द. "शब्द" हे कसले नाव? शब्दच माहीत नसता, शब्दांतच शब्दांची व्याख्या शक्य नाही. मग व्याख्यांबद्दल कुतूहल तरी शब्दांविना कसे शक्य आहे? कुतूहल म्हणजे ज्ञानासाठी तहान. तहान ही संवेदना आहे.

ब्राझील फुटबॉल जत्रा

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 22/06/2010 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात ब्राझील मधल्या फुटबॉल वेडा बद्दल मी दिलेला प्रतिसाद .. काल झालेला ब्राझील विरुद्ध आयव्हरीकोस्ट सामना, ब्राझीलीयन जनते बरोबर बघण्याचा योग आला त्याची ही क्षणचित्रे.. आयुष्यभर लक्षात राहिल असा हा अनुभव होता...

घुबडाचे पेलेट्स

लेखक शुचि यांनी सोमवार, 21/06/2010 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
काल आम्ही फिरायला बाहेर पडलो होतो. फ्रीवेवर नेहेमीप्रमणे लहान स्कंक, रकून सारखे प्राणी मधे मधे दिसत होते चिरडले गेलेले. यावेळेला मुलगी बरोबर असल्याने माझ्यातल्या "आई"ने ज्ञान द्यायची संधी दवडली नाही. मी मुलीकरता एक पुस्तक आणलय जे की तिने अजून वाचायचय पण मी वाचून संपवलय. त्या पुस्तकात- एका कुटुंबानी एक सोनेरी गरुडाचं पिल्लू पाळलेलं होतं आणि त्यांच्यापुढे समस्या ही होती की या पिल्लाला खायला काय घालायचं? कारण शिजवलेली कोंबडी, सॉसेज, मटण वगैरे खाऊन आठवड्या दोन आठवड्यात हे शिकारी पक्षी मरतात. या पक्षांकरता आख्खा उंदीर, रकून, स्कंक, खार, कोंबडी वगैरे असं खाद्य लागतं.

मदवल माया थोली ले..

लेखक राघव यांनी सोमवार, 21/06/2010 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: ही कविता माझी नाही. कुणाची ते माहित नाही. कुणास माहित असल्यास सांगावे. तसेच काही शब्द चुकले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण लहान असतांना केव्हातरी पाठ झालेली आहे. मला वाटतं याचे कमीत कमी एक आणखी कडवे आहे.. पण काही केल्या आठवत नाहीये. *** संदर्भः ही कविता म्हणजे कृष्णाच्या एका गोकुळातल्या बोबड्या बोलणार्‍या मित्रानं मांडलेली भोळी पण प्रेमळ तक्रार आहे. त्यामुळे अगोदर बोबड्या बोलीतच लिहितो. खाली समजण्यासाठी साध्या भाषेत लिहिलेले आहेच! जमले तर माझ्या (भयानक) आवाजात इस्निप्स वर टाकून इथे लिंकेनच!
काव्यरस

आपली व्यक्तिपूजा

लेखक अभिरत भिरभि-या यांनी सोमवार, 21/06/2010 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
एका आवडलेल्या कवितेचा भावानुवाद .. आपली व्यक्तिपूजा तुम्ही आम्ही, या देशातील व्यक्ति-पुजारी आम जनता केवळ व्यक्तीरूप मूर्ति शोधतो .. घडवतो. .. वंदण्याकरता पूजेकरता .. हार घालण्याकरता .. आरत्या करण्याकरता .. मैदानातल्या मांडवात स्थापना करण्याकरता ..
काव्यरस

मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 21/06/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
डीसक्लेमर :- खालील लेखन हे मौजमजा, विरंगुळा म्हणुन केले आहे. ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. खालील युक्त्या ह्या गंमत म्हणुन दिल्या आहेत, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करु नये, तोंडावर पडल्यास लेखक अथवा मिपा जबाबदार नाही. "पर्‍या , यार मिपावर कोण विचारत नाही बे आपल्याला. इतके लेखन केले, प्रतिक्रीया दिल्या पण चार सदस्य पण धड ओळखत नाहीत." आमचे मित्रवर्य उद्वेगाने म्हणत होते.

तुम्हाला कोण व्ह्यायचय,मिपाकर की..............?

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 21/06/2010 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
आपण फक्त मराठी संस्थळांबद्दल बोलत आहोत.मिपावरचे मिपाकर तसेच इतर संस्थळांवरचे इतर 'कर आहेत.तुम्हाला कुठला 'कर व्हावस वाटत व ज्यांना 'मी आहेच .....कर पहील्यापासुन' अस वाटत,अस त्यांना का वाटत्?कींवा का म्हणावस वाटत? मला मिपाकरच रहावस वाटत्,कारण......... १.मला इथली रंगसंगत(साईटसाठी वापरलेले रंग) आवडते. २.इथल्या प्रतिक्रीया आवडतात. ३.इथले सभासद व त्यांचे विचार आवडतात(फारच थोडे लोक आहेत त्यात) व त्यामुळे आपल्या माणसांमधे आल्यासारख वाटत इथे आल्यावर!(खुप काही पानावल्,जड झाल!) ४.विशेषता: 'स्वाक्षरी' ही कल्पना आवडते व एखाद्याला प्रतिक्रीयेत दीलेला reply लगेच वाचता येतो ते आवडते. ५.एकु

(किमया)

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 21/06/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम गझल किमया

एक पेग आता भर माझा  उदकाने!
मजा न आली  पिल्यावरती"खडका़"ने!

आज पहाटे स्वप्न तरी काय पडावे...
चिकन सूप मागावे एका बदकाने!

लगेच "केश्या"लाग बघू  विडंबनाला...
बदल जरा वेलांट्या, मात्रा अन काने!!

लयीत एका शांतपणे घोरत असता...
का उठवले, फेकून मज तू तबकाने?

बघा कशी ही येते चव विडंबनाला...
बाप, बाटली अन बाई या  घटकाने!

दोघींमधला फरक मला तर कळला ना...
फरक मला ना पडतो पण त्या  फरकाने!

मात्रा

लेखक गणपा यांनी सोमवार, 21/06/2010 05:56 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा सुरु होउन आता आठवडा उलटलाय. महिन्या-दिड महिन्याच्या सुट्टी नंतर पालाक आणि त्यांचे पाल्य परत त्यांच्या रहाटाला जुंपलेत. पाउसही अधुन मधुन हजेरी लावुन जातोय. या वर्षापासुन लेकीच्या शाळेच्या वेळापत्रकात बदल झालाय. गेल्या वर्षी ८ ते १२:३० पर्यंत असणारी शाळा आता ९ ते ३ पर्यंत केली आहे. त्यामुळे बर्‍याच मुलांच वेळापत्रक साफ बिघडलय. पुर्वी १ वाजता घरी पोहोचल की १ तास खाउन पिउन आणि थोडावेळ खेळुन २ च्या आसपास मस्त ताणुन द्यायची. मग संध्याकाळी फ्रेश झाल्यावर थोडावेळ सवंगड्यां सोबत बाहेर खेळणं, १/२ तास टिव्हीवर टॉम अँड जेरी, मग थोडा वेळ हसत खेळत अभ्यास. सगळ कसं सुरळीत चाललेल.