Skip to main content

(किमया)

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 21/06/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम गझल किमया

एक पेग आता भर माझा  उदकाने!
मजा न आली  पिल्यावरती"खडका़"ने!

आज पहाटे स्वप्न तरी काय पडावे...
चिकन सूप मागावे एका बदकाने!

लगेच "केश्या"लाग बघू  विडंबनाला...
बदल जरा वेलांट्या, मात्रा अन काने!!

लयीत एका शांतपणे घोरत असता...
का उठवले, फेकून मज तू तबकाने?

बघा कशी ही येते चव विडंबनाला...
बाप, बाटली अन बाई या  घटकाने!

दोघींमधला फरक मला तर कळला ना...
फरक मला ना पडतो पण त्या  फरकाने!

जरी म्हणालो पडल्याने सुजली टेरी
खरे 'हिने' केली किमया ही कळकाने!

- केशवसुमार

लेखनविषय:

वाचने 1246
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मस्त . मजा आली :) अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

केसुगुरुजींची किमया पहिल्यासारखी नाही वाटली :( --अवलिया

आज पहाटे स्वप्न तरी काय पडावे... चिकन सूप मागावे एका बदकाने! लगेच "केश्या"लाग बघू विडंबनाला... बदल जरा वेलांट्या, मात्रा अन काने!! लयीत एका शांतपणे घोरत असता... का उठवले, फेकून मज तू तबकाने? दोघींमधला फरक मला तर कळला ना... फरक मला ना पडतो पण त्या फरकाने! हे चार अगदी मस्त आहेत! :) राघव