Skip to main content

बन्धन भावनेचं!!

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 24/08/2010 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
(मागच्या वेळी केलेल नमन आता या वेळी सुद्धा आहे, पण गणपा भाउ, जागुताई अन केशवजीं बरोबर फोटो अन व्हिडिओ साठी आदरणीय बहुगुणी अन आपले सर्वांचे लाडके धमाल मुलगा यांचे जाहिर रित्या आभार!! तुम्ही मदत केली नसती तर, कुठली अपर्णा, अन, कुठला हा लेख!!) अरे हो राहिल प्रिय डॉन रावांनी मला अक्षर रंग अन इतर सुविधा देण्याच आश्वासन दिल्या मुळे इथुन पुढे मीही थाटात रंग बदल बदल के लिहिणार आहे!! ठ्यांक्यु ह डॉन साहेब!!

विश्वनाथ आनंद "भारतीय नसल्यामुळे"...सॉरी सॉरी सॉरी...

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 24/08/2010 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6425945.cms मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ग्रॅंड मास्टर बुद्धीबळपटू विश्वनाथ आनंद हा भारतीय नाही असा शोध लावला आहे. त्याला हैद्राबाद विद्यापीठ सन्माननीय डॉक्टरेट देणार आहे. त्याकरता ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अर्थात मनुष्यबळ विकास मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते. त्यावेळेस त्या मंत्रालयाने हा शोध लावला.

बिजापूर ते सोलपूर बस प्रवास....

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 24/08/2010 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वीकेंडला "दार-उल्-सल्तनत" बिजापूर ला जायचा योग आला. त्याचे फोटोज टाकीन तेव्हा टाकीन पण परतीच्या प्रवासात काही छान (माझ्या मते) फ्रेम्स मिळाल्या. परतीचा प्रवास तसा कण्टाळवाणाच पण या ट्रिप मधे देव माझ्यावर निहायत खूश होता. समोर हिरवा-निळा पट होता.

नारळी भात

लेखक प्राजक्ताचि फुले यांनी मंगळवार, 24/08/2010 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
नारळी भात साहित्य : १ वाटी बासमती तांदुळ, १ ओल्या नारळाचा चव,पाउण वाटी साख्रर, मनुका,काजु,बदाम, वेलदोडे पुड, लवंग, केशर, खाण्याचा रंग,लिंबु, साजुक तुप,चिमुटभर मीठ पाकक्रुती: प्रथम थोड्या तुपावर लवंगा टाकुन त्यावर तांदुळ भाजुन घेणे. त्यानंतर त्यावर आधणाचे पाणी टाकुन भात मऊ मोकळा शिजवुन घ्यावा. त्यात चिमुटभर मीठ टाकावे. १ चमचा तुप घालावे.भात शिजला की परातीत काढुन घ्यावा. नंतर १ वाटी पाणी घेउन त्यात पाउण वाटी साखर घालुन पक्का पाक करावा. नंतर त्यात नारळाचा चव घालावा. त्यात लिंबु पिळावे व १ चिमुटभर रंग घालावा. त्यानंतर शिजवलेला भात घालावा.

झोळीचा खांब

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 24/08/2010 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
टिंग टिंग बेल मारुन बस निघाली. बसच्या आवाजात आणि धुराळ्यात परत डोळे मिटुन घेतले. पुढला स्टॉप बुरुडगाव. तिथे उतरुन परत पुढे सहा सात किलोमीटर जायचे. मी विचार करत असतो. गाडी चालत असते. तेवढ्यात वेग हळु हळु कमी होतो. गावात गाडी शिरल्याची जाणीव होते. डोळे उघडतो. बाहेर पहातो. गाडी स्टँडला लागते. पानी बोटल, समोसे, शेंगा गरम आवाज यायला लागतात. सॅक उचलतो. खाली उतरतो. जवळपास दहा वर्षांपुर्वी आलो होतो. फारसा काही बदल नाही. तीच गर्दी तोच गोंगाट. माणसं अजुन वाढलेली. स्टँड तेवढाच. कॅन्टीनकडे गेलो. चहा डोनट पोटात टाकला, बाहेर येउन पानपट्टीवरुन सिगारेट पाकीट घेतलं. धुर सोडत पुढे काय करायचं विचार करु लागलो.

फ़ुलझडी..........!!!!

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 24/08/2010 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ुलझडी..........!!!! तो.... चार शिष्य,चार चेले, चार चमचे मागेपुढे चालायला, उदोउदो करायला कायम आपल्या दावणीला बांधून स्वत:च स्वत:विषयी लिहिलेले पोवाडे गाऊन घेतो त्यांचेकडून आणि एवढ्या शिदोरीच्या बळावर वाढवू पाहतो.... आपल्या श्रेष्ठत्वाच्या कक्षा......!! ते.... ते भक्तही तल्लीन होतात लोळवून घेत स्वत:ला त्याच्या चरणावर वारंवार त्याच्या पायाच्या धुळीचा मस्तकाच्या मध्यभागी टिळा लावत... होतात बेभान जणुकाही त्या चरणाखेरीज अन्य सर्वकाही निस्तेज,निष्प्रभ अशी स्वत:चीच मनसमजावणी करत... सदासर्वकाळ....!! क्षणिक का होईना पण चित्तवेधक ठरत असतेच फ़ुलझडी..........!!!! . .

ई स्टाप मराठी साहित्य

लेखक आप्पा यांनी मंगळवार, 24/08/2010 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
इ_स्टाप एक ई साहित्य प्रकाशन हे अंक मराठी साहित्याला वाहीलेले असुन त्यांचा प्रयत्न नविन लेखकांचे साहित्य जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. सदर अंक रेणुका रेपाळ-खटावकर, सुप्रीया जोशी-जाधव व सुनिल सामंत (esahity@gmail.com) चालवतात. सदर प्रयत्नात एक खारीचा वाटा म्हणुन हे साहीत्य www.vishwasanchar.com येथे हि प्रसीध्द केले जाईल. सदर प्रयत्नांना आपले ही सहकार्य असावे.

कोथिंबीरीच्या वड्या

लेखक श्रद्धा. यांनी मंगळवार, 24/08/2010 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- चिरलेली कोथिंबीर एक मोठी वाटी, हरबर्‍याच्या डाळीचे पीठ १ मोठी वाटी, धने जिरे पुड १/१ मोठा चमचा,चवीप्रमाणे मीठ, फ़ोडणीचे साहित्य, आले मिरची पेस्ट १ चमचा, तेल.
From