Skip to main content

चेरी टोमॅटोची पिशवी.

लेखक लतिका धुमाळे यांनी सोमवार, 01/11/2010 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
चेरी टोमॅटोची पिशवी ५- ६ वर्षांपूर्वी आम्ही जर्मनीत एक छोट्या गावात रहात होतो. आमच्या घरा समोरच एक छोटेसे सुपर मार्केट होते, तेथे रोज लागणारया गोष्टी, भाजी व फळे मिळत. त्या दुकानासमोरच एक १२- १३ वर्षांचा मुलगा चेरी टोमॅटोच्या अर्ध्या किलोच्या पिशव्या विकत होता. जरासा गबदुलच होता.जर्मन नव्हता, अतिपूर्वेकडिल कोणत्यातरी देशातील होता. उन्हाळा खूपच असल्याने घामाने थबथबत होता. हातातील बास्केटवर "चेरी टोमॅटो २ युरो पिशवी" असा बोर्ड लावून त्या विकायचा प्रयत्न करत होता. निदान ७-८ बायकांना तरी विचारून झाले, पण पदरी निराशाच येत होती. भाजीच्या दुकानासमोर टोमॅटो विकणारया त्या मुलाचे मला कौतुक वाटले.

फराळ फटाके: जीवनाच्या दिवाळीतले!!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 01/11/2010 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्या सणांमध्ये दिवाळीचा वेगाळाच थाट सर्वांना अंधारामध्ये दाखवी प्रकाशाची वाट ... ... प्रकाश पसरवते पणतीची पेटलेली वात या दिवा़ळसणामध्ये करा दु:खावर मात ... ... निराशेच्या "भुईचक्राला" लावून टाका आग गोल गोल फिरत स्वतःमध्ये निराशा होईल खाक ... ... "फुलबाजीच्या" झगमगत्या आनंदी तुषारांद्वारे फुलवा मनामनांत आनंदाचे "झाड"... ... सद्वीचारांची ठीणगी लावा रॉकेटच्या मुखात महत्त्वाकांक्षेचे "रॉकेट" उडू द्या उंचच उंच आकाशात ... ... सुतळी "बॉम्बसारखे" छिन्नविछिन्न होवू द्या मनातले नकारात्मक कीडलेले भाग ... ... "शंकरपाळ्यांसारखी" चौकट तोडा बघा मोकळ्या मनाने
काव्यरस

(बॉडी डबल)

लेखक सुनील यांनी सोमवार, 01/11/2010 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
चित्र जालवरून साभार.

त्रिशंकुच ...

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 01/11/2010 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या १०७ पैकी १०६ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. शिवसेना-३१, भाजप-९ राष्ट्रवादी-१५ काँग्रेस-१५, मनसे-२६, अपक्ष-११ चित्र जवळपास स्पष्ट आहे. महापालिकेत शेवटी "त्रिशुंक" परिस्थीती निर्माण झाली आहे. आता शक्य सोल्युशन्स असे आहेत. राष्ट्रवादी + काँग्रेस = ३० / ३१ सेना-भाजपा = ४० / ४१ मनसे = २६ / २७ इतर = ११ सरकार बनवण्यासाठी हवे आहेत किमान ५४ नगरसेवक. मग उपलब्ध शक्यता अशा बनतात किंवा ह्यातले काहीच शक्य नाही असे वाटते. १. काँग्रेस + राष्ट्रवादी + मनसे ( बाहेरुन पाठिंबा ) = ५६ / ५७ २.

एक होती म्हातारी .............

लेखक पियुशा यांनी सोमवार, 01/11/2010 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
हाय मि पियुशा पहिलच प्रयत्न आहे माझा ,लिखनतिल चुका बद्दल साम्भालुन घ्या, एक होती म्हातारी ............. खूप खूप वर्षापूर्वी आट-पाट नगर होते , त्यात एक खावून पिवून सुखी असे कुटुंब राहत होते ,नवरा बायको आणि ४ मुले ,थोडीशीच शेती त्यावर संसार अवलंबून होता , मुले मोठी होऊ लागली तशा-तशा गरजा वाढू लागल्या ,त्यांची शाळा वही पुस्तके ,यांचा खर्चामुळे घरच्या माऊलीला शेतात मजुरी करावी लागायची ,आईबापाने जणू चंगच बांधला होता कि आपण अडाणी राहिलो पण मुलांना शिकवून मोठे साहेब करायचे , म्हणून मायबाप रात्रीचा दिवस करू लागली मुलांच्या गरजा

'किल्ले जंजिरा': तिथले तथाकथित गाइड आणि त्यांचं ज्ञान!

लेखक बाबय यांनी सोमवार, 01/11/2010 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! किल्ले जंजिरा इथला एक अनुभव 'शेअर' करतो... काही दिवसांपूर्वी जंजिरा किल्ला बघायला गेलो होतो. बरोबर कंपनीमधले मराठी/अमराठी, किल्ला पुर्वी बघितलेले / न बघितलेले असे लोक होते. मी हा किल्ला तिसरयांदा बघत होतो. पण यावेळी बरेच जण होतो आणि होडीवाल्याने 'गाइड' बनायची तयारी दाखवली म्हणून पहिल्यांदाच 'गाइड' घेतला. आणि आमची 'गाइडेड टुर' सुरु झाली. गाइड बर्यापैकी माहिती देत होता. किल्ल्याचा उल्लेख वारंवार 'अजिंक्य' असा करत होता. मला ते थोडं खटकलं, पण म्हटलं ऐकू तर काय काय सांगतोय.... नंतर त्याने शिवाजी, संभाजी यांनी किल्ला जिंकायचे केलेले अनेक अयशस्वी प्रयत्न इ.

मानवनिर्मित वातावारणबदल (climate change)

लेखक निकित यांनी सोमवार, 01/11/2010 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
सोयीस्कर असत्ये लोकसत्तेमध्ये काही महिन्यांपूर्वी मुग्धा कर्णिक यांचा “गैरसोयीची असत्ये” हा लेख प्रकाशित झाला. त्यामध्ये त्यांनी जागतिक तापमानवाढ आणि वातावरण बदल हे नैसर्गिकच असून त्याला कार्बन डाय ऑक्साईड व इतर हरितगृह वायू जबाबदार नाहीत अशा प्रकारचा दावा केला आहे. त्याकरिता त्यांनी काही शास्त्रज्ञांचे दाखलेसुद्धा दिले आहेत. तथापि, त्यांच्या लेखातील अनेक मुद्दे हे सोयीस्कररित्या अपुऱ्या व अवैज्ञानिक माहितीवर आधारित आणि हास्यास्पद आहेत.

अपेक्षित

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी सोमवार, 01/11/2010 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
गेले २ दिवस ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या बद्दल काही तरी लिहिला जाण्याची वाटच बघत होतो पण तशी काही चिह्ने दिसत नाहीयेत;हे तुम्हा सगळ्या लोकांना इतके अपेक्षित होते का? असो बरीच मिपा कर मंडळी फोरेनर आहेत त्यांना सांगण्यासाठी हि लींक http://72.78.249.107/esakal/20101101/5442208261395513630.htm http://72.78.249.107/esakal/20101031/4989233220531104330.htm आता मत-प्रदर्शनाला सुरुवात होऊ द्यात. मा मु अशोक रोजी चावण यांनी राव नावात जोडल्या मुळे असा