नमस्कार मंडळी!
किल्ले जंजिरा इथला एक अनुभव 'शेअर' करतो...
काही दिवसांपूर्वी जंजिरा किल्ला बघायला गेलो होतो. बरोबर कंपनीमधले मराठी/अमराठी, किल्ला पुर्वी बघितलेले / न बघितलेले असे लोक होते. मी हा किल्ला तिसरयांदा बघत होतो. पण यावेळी बरेच जण होतो आणि होडीवाल्याने 'गाइड' बनायची तयारी दाखवली म्हणून पहिल्यांदाच 'गाइड' घेतला.
आणि आमची 'गाइडेड टुर' सुरु झाली. गाइड बर्यापैकी माहिती देत होता. किल्ल्याचा उल्लेख वारंवार 'अजिंक्य' असा करत होता. मला ते थोडं खटकलं, पण म्हटलं ऐकू तर काय काय सांगतोय....
नंतर त्याने शिवाजी, संभाजी यांनी किल्ला जिंकायचे केलेले अनेक अयशस्वी प्रयत्न इ. सांगितले...बोलता बोलता त्याने 'चिमाजी' (अप्पा, पहिल्या बाजीरावाचा शूर भाऊ)चे पण नाव घेतले आणि चक्क ठोकून दिले की त्याला पण हा किल्ला जिंकता आला नाही!!
आता मात्र गप्प राहणे अशक्य झालं. मी त्याला थांबवून म्हटलं की आम्ही तर असे शिकलो आहे की चिमाजी अप्पा ने हा किल्ला मराठ्यांतर्फे पहिल्यांदा जिंकला! (माझ्या आठवणी प्रमाणे: इ. सहावी चा इतिहास).
पण तो काही ऐकायला तयार नव्हता! मी म्हटलं तुझं खरं की पुस्तकातलं? त्याच्याशी पैज मारली की पुस्तक आणून दाखवीन!
नंतर त्याच्याच होडीतून परत आलो, त्याने किंवा मी तो विषय पुढे नेला नाही :)
पण तुम्हाला काय वाटतं? आपण आपल्या इतिहासाबद्द्ल जागरूक राहायला नको??
वाचन संख्या
4510
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
वसई
जंजिरा की वसई? (माझा च गोंधळ
In reply to वसई by निकित
हेच ते चिमाजी
इतिहास
जंजिर्याचा किला मूळचा कोळी
In reply to इतिहास by प्रचेतस
हॅ हॅ हॅ . इतिहासाबद्दलचे
होय