Skip to main content

टु पेंट ऑर मेक लव्ह

लेखक निनाद यांनी गुरुवार, 11/11/2010 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक दिवसांनी चित्रपट ओळख सादर करतो आहे. जमेल तसे अजून वेगवेगळ्या भाषांमधल्या चित्रपटांच्या ओळखी टाकण्याचा मानस आहे. -निनाद फ्रेंच चित्रपट टु पेंट ऑर मेक लव्ह मॅडेलीन (सबीन अझेमा) ही एक मध्यमवयीन हौशी चित्रकार आहे. शिवाय ती स्वतःचा व्यवसायही चालवते. तीच नवरा विलियम (डॅनियल अत्वाल) हा हवामान खात्यात नोकरी करतो. पण त्याने आता मुदतपूर्व निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दांपत्याला एक मुलगी आहे. ती ला आता शिष्यवृत्ती मिळाल्याने ती इटलीमध्ये रोमला जाते आहे. आता हे दोघेच आहेत.

ओम जय जगदीश

लेखक फारएन्ड यांनी गुरुवार, 11/11/2010 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
सुरूवातीलाच अटलांटामधे रस्त्याच्या डावीकडून गाड्या जाताना दाखवल्याने हा चित्रपट वास्तववादी नाही याची आपल्याला खात्री होते. वास्तववादी, आर्ट फिल्म वगैरे समजून लोक लगेच पळून जाउ नयेत म्हणून अनुपम खेर ने (दिग्द.) हे प्रीएम्प्टिव्ह टेक्निक वापरले असावे. पण तरीही मी खात्री केली की मी मैदानात उलट्या बाजूला बसून हे पाहात नाहीये. पूर्वी मैदानात पिक्चर्स दाखवत तेव्हा गर्दी असेल तर आम्ही उलटीकडून पाहायचो तसे. तर ही तीन भावांची कथा. थोरला अनिल कपूर म्यूजिक संबंधी एका कंपनीत कामाला असतो. मधला फ़रदीन हा तो अमेरिकेत शिकायला असतो, तर धाकटा अभिषेक जबरी हुषार असतो व कॉम्प्युटर मधे काहीतरी करत असतो.

विड्या एक फुंकणे

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 11/11/2010 05:12 या दिवशी प्रकाशित केले.
( विनायक पाचलग यांचा स्मृतीरंजनात्मक लेख वाचून आमच्याही काही बालपणीच्या स्मृती जागृत झाल्या) आमच्या बारावीच्या पुस्तकात एक प्रश्न होता, ''जुन्या खेळांएवजी नवीन प्रकारचे खेळ आल्याने आपली मानसिक वाढ खुंटली आहे का?'' दर परीक्षेला हा प्रश्न हमखास असायचा आणि सगळेच काही ना काही पुस्तकी उत्तरे द्यायचे याप्रश्नातुन आणि आजच्या जमान्यात दिवाळीची वा उन्हाळी सुट्टी लागली की, काय करावे, करू नये वगैरे याच प्रश्नांची उत्तरे शोधणारे अनेक लेखातुन आधुनिकता कशी वाईटच हेच सत्य शेवटी फिरून फिरून सांगितले जाते.

(पडुन आहे गात्र कुजुनि)

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 11/11/2010 04:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियालीतैंच्या "भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य" या धाग्यावर केलेलं विडंबन आहे. तेव्हा दोनच कडवी लिहिली होती. आता पूर्ण काव्याचं विडंबन देतो आहे. सुरेश भट साहेबांच्या या अजरामर कलाकृतीचं हे बीभत्स विडंबन केल्याबद्दल त्यांची माफी मागतो. सिच्युएशन अशी आहे : प्रेयसीला सोडून प्रियकर एकटाच जळाला आहे.

भारतीय लोकशाही आणि नेता निवड

लेखक विकास यांनी बुधवार, 10/11/2010 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
हा विषय माझ्या डोक्यात बरेच दिवस होता फक्त लिहायचे रहात होते... महाराष्ट्रातील आत्ताचा मुख्यमंत्रीबदल हे तात्कालीक कारण आहे. आपण नागरीकशास्त्रात शिकतो की सज्ञान नागरीकाला मतदानाचा हक्क असतो. तो हक्क बजावत कायद्याने सज्ञान असलेली तमाम जनता मतदान करते. मग बहुमतवाला पक्ष राज्य करण्यासाठी हक्क सांगतो. तो हक्क, राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रपती, राज्यपातळीवर राज्यपाल आणि स्थानिक पातळीवर (मला नक्की माहीत नाही पण) कदाचीत भारतीय नागरी सेवेतील अधिकारी अर्थात आयएएस अधिकारी जो राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली काम करतो, अशांच्या समोर बजावला जातो.

महाराष्ट्र आणि मंत्री बदल (आपले मत काय?)

लेखक इंटरनेटस्नेही यांनी बुधवार, 10/11/2010 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
पृथ्वीराज चव्हाण यांची निवड पृथ्वीराज चव्हाण यांची निवड महाराष्ट्र या आपल्या पुरोगामी आणि विकसित राज्याच्या मुख्यमंत्री पदी झालेली आहे. आणि श्री अजितदादा पवार यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागलेली आहे. दोन्ही नेते हे चांगल्या प्रतिमेचे आणि काराक्षम म्हणून ओळखले जातात. पण या निवडीने काही प्रश आपल्यासमोर निशितच उभे राहतात, किंवा त्यांचे महत्त्व नव्याने अधोरेखित होते आपले राज्य विकसित जरी असले तरी आपल्या समोरील प्रश्न देखील तितकेच बिकट आहेत.: शिक्षण क्षेत्राचा झालेला बट्याबोळ रोजगारी, दळणवळण, वाढती महागाई, वाढती गुन्हेगारी, मराठीचा प्रश्न, अन्य.

'आलेख'

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 10/11/2010 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी हा 'आलेख' आहे तुमच्या माझ्या मोठ्ठे होण्याचा! बाल पावलांनी धावता धावता उंबरा ओलांडण्याचा ! एका छोटुल्याला मोठ होताना पहाण्याचा. प्रत्येक आलेखाला एक परिमाण असते. इथ ते परिमाण आहे कागद. आजच्या जगात मोठ होण्याचं मोज माप मला कागदानच मोजावस वाटल.
काव्यरस