दर्शने ४. अद्वैत दर्शन
अद्वैत (वेदांत, शांकर) दर्शन
वेदातील ज्ञानकांडावर निनिराळ्या ऋषीनी आपले विचार मांडले; ती झाली उपनिषदे.हे विचार वेगवेगळ्य़ा व्यक्तींचे असल्याने भिन्न भिन्न होते. इतकेच नव्हे तर काही वेळा विरोधीही होते. या गोंधळातून मार्ग काढून काही तरी सुसूत्र ठाम विचारप्रणाली समोर ठेवावी म्हणून बादरायण मुनींनी ५५० सूत्रांची "ब्रह्मसूत्रे" रचली.. ही झाली अद्वैताची गंगोत्री. अर्थात ही फार क्लिष्ट असल्याने त्यावर २४ आचार्यांनी टीका लिहल्या व त्यातून आपल्याला काय वाटले ते मांडले. शंकराचार्य आपल्या मताला म्हणतात अद्वैत, रामानुज विशिष्टाद्वैत व मध्वाचार्य शुद्धाद्वैत..जाऊ द्या. आपण फक्त अद्वैताची थोडी माहिती घेऊ.
तसे हे तत्त्वज्ञान सोपे असावे. कारण शंकराचार्य एका ओळीत सार सांगतात : "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर: " मराठीत " ब्रह्म हे एकच खरे आहे, (दिसणारे) जग खोटे आहे; जीव व ब्रह्म एकच आहे " काय कळले ? खरे म्हणजे काहीच कळत नाही. कारण जग, जीव ब्रह्म म्हणजे काय हे तर कळले पाहिजे ना. या काही कल्पनांची ओळख पहिल्यांदी करून घेऊ.
माझी गाडी, माझा हात असे आपण म्हणतो तेव्हा आपल्या लक्षात येते की मी म्हणजे गाडी नव्हे वा हात नव्हे.या मीला म्हणावयाचे आत्मा किंवा जीव. हा कोणी नाकारत नाही. मी नाही असे कोण म्हणणार हो ? हा जीव शरीरात असतो तो पर्यंत शरीर चेतनामय असते. तो शरीरात नसतो तेव्हा शरीर अचेतन किंवा जड होते. म्हणून जीव नसलेल्या वस्तूं उदा. दगड, घर, गाडी, कपडे हे जड पदार्थ.
कार्यकारण संबंध. : माती घेऊन कुंभार निरनिराळ्या आकाराची मडकी, घट, पणत्या बनवतो. आकार निरनिराळे असले तरी शेवटी सर्वात मातीच आहे व फक्त मातीच आहे. तेव्हा माती हे कारण व घट हे कार्य. तेच सोनाराचे. सोन्यापासून बनवलेल्या अलंकारात खरे तर फक्त सोनेच असते. सोने हे कारण व अलंकार हे कार्य. जेथे कार्य आहे तेथे कारण पाहिजेच. तेव्हा आता सगळ्या जगाचा विचार केला तर हे पटते की या सर्वाला कारण पाहिजेच. पण माती, सोने वगैरे काही जगाचे कारण होऊ शकत नाहीत. सर्व जगाचे कारण असलेल्याला म्हणावयाचे ब्रह्म.
आकार : आकाराला अस्तित्व नाही. असे बघा, वर्तुळ हा एक आकार झाला. तो कागदावर चित्ररुपाने दिसतो, सोन्याच्या कड्याच्या रुपाने दिसतो. पण कागद, सोने काढून टाका. वर्तुळ नाहिसे झाले. त्या वर्तुळाला अस्तित्वच नव्हते. आकाराला अस्तित्व नाही म्हटले की पुढची पायरी म्हणजे चेंडूला अस्तित्व नाही, झाडाला अस्तित्व नाही.... जगाला अस्तित्व नाही. पण मला तर चेंडू दिसतो, मी त्याने खेळतो. काय भानगड आहे ? पुढे बघू.
आत्मसत्ता : आत्मसत्ता स्वयंसिद्ध आहे. "विज्ञातारं अरे केन विज्ञानियात (ब्रुहदा.उप.) जो स्वत: ज्ञाता आहे त्याला दुस्र्या कोणत्या उपायाने जाणावे ? सूर्याच्या प्रकाशाने सगळे जग प्रकाशित होते पण सूर्याला कोण प्रकाशित करणार ? अग्नीचा " जाळणे" हा स्वभाव आहे. तो इतरांना जाळू शकतो. अग्नीला कोण जाळणार ? जीव आणि जगत यात सत्ता जीवालाच असणार, जगताला नाही.सोनार दागिने बनवत असेल तर सत्ता सोनाराला, दागिन्यांना नाही.
रज्जु - सर्प न्याय : अंधारात दोरी पडली असेल तर तो साप आहे असे वाटते. दिवा आणून पाहिले की कळते "ही दोरी, साप नाही ".वाळवंटात शिपीवर ऊन पडले की चांदीचा भास होतो,हातात शिंपी घेतली की कळते "ही शिंपी, चांदी नाही". दोरीच्या या काल्पनिक भासाला, परिवर्तनाला म्हणतात विवर्त.
मायावाद : ब्रह्म, सर्व जगाचे आदिकारण, हे सत ,चित, व आनंदमय आहे. मग हे खोटे जग दिसते तरी का ? याला कारण माया किंवा अविद्या. माया ही ब्रह्माची शक्ती. या मायेच्या ठिकाणी दोन शक्ती आहेत. आवरणशक्ती व विक्षेपणशक्ती.पहिल्या शक्तीने ती ब्रह्माचे शुद्ध स्वरूप झाकून टाकते.(एखाद्या छोट्या ढगाने सूर्याला झाकून टाकावे तसे.) व दुसरीने हा ब्रह्मांडाचा खेळ उभारते
ईश्वरविचार : ब्रह्म हे निर्विशेषच पण मायेने झाकाळल्यावर ते सविशेष किंवा सगुण रूप धारण करते. त्याला म्हणावयाचे ईश्वर. हा सर्वज्ञ, सर्वेश्वर, सर्वकाम,सर्वनियंता,सर्वांतरयामी जगत्कारण इ. आहे. सर्व जीवांना तोच प्रेरणा देत असतो.जगत्निर्माण त्याची लीला आहे. तो जगताचे निमित्तकारण व उपादानकरण आहे. म्हणजे या घटाच्या संदर्भात तो मातीही आहे व कुंभारही.
जगद विचार : सत्य कोणाला म्हणावयाचे ? जे परिवर्तित होत नाही ते. जग तर सारखे बदलत असते. तेव्हा, या अर्थाने, जग सत्य नाही
वेदांतात सत्ता तीन प्रकारची मानली आहे. (१) प्रातिभासिक.: रज्जुसर्प न्यायात सर्पाची सत्ता भासते पण नंतर नष्ट होते. (२) व्यावहारिक :
नामरूपात्मक जगात ही आवश्यक आहे. (३)पारमार्थिक : ही खरी सत्ता. ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने जगाकडे पाहिले असता ते असत्य दिसते. पण व्यावहारिक दृष्टीने पाहिले तर जग मिथ्या नव्हे.
जीवविचार : एक घडा आहे. त्यात आकाश आहे. घड्याबाहेरही आकाश आहे.दोन वेगळीवेगळी आहेत का ? नाही. दोनही एकच. घडा फुटला तर आतले आकाश कुठे बाहेर निघून जात नाही ते बाहेरच्या आकाशात मिसळत नाही. ते आहे तेथेच असते, फक्त आपणास ती एकरूप झालेली दिसतात. तसे जीव (आत्मा) व ब्रह्म यांचे आहे. घटाच्या आतल्या आकाशाला जीव म्हणा बाहेरच्याला ब्रह्म. दोन्ही एकच. उपनिषदातल्या "तत्त्वमसि" या महावाक्याचा अर्थ हाच. ते (ब्रह्म) तू (जीव) आहेस.
मायेचा परिणाम : जर ब्रह्म व जीव एकच आहेत तर मी-तू हा भाव रहाताच कामा नये. कारण मी व तू हे दोघेही एका ब्रह्माचेच भाग आहेत. पण माया जीवावर आवरण घालून ह्या एकात्मतेचा त्याला विसर पाडते. जगातील सर्व सुखदु:खे,लोभ, भांडणे,मोह इत्यादींचे कारण हा पडदा. विवर्त पहा. तुम्हाला दोरीच्या ठिकाणी सर्प दिसू लागतो.
ज्ञान : सुखादु:खाबद्दल वैराग्य, मनाची एकाग्रता, इंद्रियनिग्रह, उपरती, गुरूकृपा अशा कारणांनी माणसाच्या मनात ज्ञानाचा उगम होतो व मग तो हा पडदा दूर करू शकतो. वेदांतात ज्ञानाला फार महत्व आहे. भक्तीला नाही.
मोक्ष : साधकाने श्रवण, मनन व निजिध्यास या गोष्टी साध्य करून परोक्षज्ञान अपरोक्षज्ञानात रुपांतरित केले की त्याला "अहं ब्रह्मास्मि"
मीच ब्रह्म आहे, याचा अनुभव येतो. त्याला म्हणावयाचे मोक्ष.
(१) ब्रह्म सत्य, (२) जग मिथ्या, (३) ब्रह्म व जीव एकच या तीन गोष्टी अद्वैत तत्त्वज्ञान या प्रकारे मांडते.
मीमांसा व अद्वैत ही आस्तिक दर्शने आहेत. चार्वाकदर्शन हे नास्तिक. उपक्रमच्या दिवाळी अंकात ते दिले आहे. आपण ते तेथे पाहू शकता.
दर्शने हा तसा किचकट विषय. पण सांख्यविचार हे जगातले पहिले तत्त्वज्ञान आहे. भारतातल्या या उज्वल परंपरेची ओळख (आमचे पूर्वज महान होते !), निदान तोंडओळख करून देण्याचा हा तोकडा प्रयत्न.
शरद
याद्या
18269
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
ह्म्म्म्म्म !!!
वेदा॑त
>>ज्ञानोत्तर भक्ती आहेच
In reply to वेदा॑त by kamalakant samant
एक जोक
In reply to वेदा॑त by kamalakant samant
ब्रम्ह नव्हे, ब्रह्म. बाकी
In reply to एक जोक by यकु
ज्ञानोत्तर भक्ती
काही विचार
अद्वैत
In reply to काही विचार by शरद
सुंदर!
तुम्ही सुरेख पण अत्यंत त्रोटक
अद्वैत दर्शन एवढं मोठं द्वैत
नक्की? आपला द्वैत-अद्वैतावरचा
In reply to अद्वैत दर्शन एवढं मोठं द्वैत by यकु
मला आचार्य यशवंत होण्यात
In reply to नक्की? आपला द्वैत-अद्वैतावरचा by धमाल मुलगा
बरं तुमची ही "टिका" समजुयात
In reply to अद्वैत दर्शन एवढं मोठं द्वैत by यकु
बरं तुमची ही "टिका" समजुयात
In reply to बरं तुमची ही "टिका" समजुयात by राघव
एक दुरुस्ती
In reply to बरं तुमची ही "टिका" समजुयात by यकु
एखाद्यानं सांगितलेले पटले
In reply to बरं तुमची ही "टिका" समजुयात by यकु
येस्स! निखालस चूक! या संतांना
In reply to एखाद्यानं सांगितलेले पटले by राघव
या संतांना आधी गप्प बसवलं
In reply to येस्स! निखालस चूक! या संतांना by यकु
हा सन्त! सन्त! म्हणताय का??
In reply to या संतांना आधी गप्प बसवलं by राघव
कसे काय..
In reply to येस्स! निखालस चूक! या संतांना by यकु
समाधिस्थ झालेल्या
In reply to कसे काय.. by प्रशु
व्य नी कशाला
In reply to समाधिस्थ झालेल्या by यकु
लेख?? त्रिवार अशक्य! कशाला
In reply to व्य नी कशाला by प्रशु
उडू द्या की धुरळा
In reply to लेख?? त्रिवार अशक्य! कशाला by यकु
+१ सहमत, बाडिस. लिहाच. पण
In reply to उडू द्या की धुरळा by प्रियाली
आमच्या येथे जानवी ,
In reply to +१ सहमत, बाडिस. लिहाच. पण by बिपिन कार्यकर्ते
ऊडु द्या धुराळा
In reply to लेख?? त्रिवार अशक्य! कशाला by यकु
ठीक!
In reply to बरं तुमची ही "टिका" समजुयात by यकु
कृपया माझ्या शंका दूर कराल
In reply to ठीक! by धमाल मुलगा
नो !! नाय !! नेव्हर!! ते
In reply to कृपया माझ्या शंका दूर कराल by यकु
आपले अनुभवही शब्दबध्द न करता
In reply to नो !! नाय !! नेव्हर!! ते by धमाल मुलगा
कोठे मिळाले ?
In reply to कृपया माझ्या शंका दूर कराल by यकु
आपणाची वाद..
In reply to अद्वैत दर्शन एवढं मोठं द्वैत by यकु
सुरेख लेखमाला ! इतर दर्शनांची
नानबा, मांडुक्योपनिषदावरचा
In reply to सुरेख लेखमाला ! इतर दर्शनांची by अवलिया
थोडा तपशील
दुरुस्ती
In reply to थोडा तपशील by आळश्यांचा राजा
बाय द वे, तो चार्वाकावरचा लेख
In reply to दुरुस्ती by शरद
>>तो चार्वाकावरचा लेख टाका ना
In reply to दुरुस्ती by शरद
ब्रह्म सत्य, जग मिथ्या
सुंदर निरुपण..
व्याघ्रो मिथ्या! पलायनोपि
छान/त्रोटक