Skip to main content

आरती भ्रष्टाचाराची -

लेखक विदेश यांनी रविवार, 21/11/2010 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
शालेय पोषण आहार घोटाळा रोहयो-अनुदान-चारा घोटाळा वृद्धापकाळी पेन्शन घोटाळा ‘आदर्श ’ घोटाळा-आला कंटाळा...।१। जयदेव जयदेव जय भ्रष्टाचारा गल्ली ते दिल्लीत तुमचा दरारा ।धृ। प्लॉटपासून फ्लॅटपर्यंत मिळकतीला नाही राहिला अंत लाचखोरीची कोणा ना खंत कालचा रंक तो आज श्रीमंत ।२। जयदेव जयदेव .. प्रामाणिक माणूस निर्भय ना बनला लबाड मात्र तो धाडसी बनला शेतकरी कष्ट करीत मेला पुढारी तो भ्रष्ट होऊन जगला ।३। जयदेव जयदेव .. मंत्र्यांना शिस्त ना पोलीसा शिस्त सनदीही गब्बर होण्यात व्यस्त न्यायमूर्ती काही घोटाळेग्रस्त ‘ विदेश ‘ मनांत होतसे त्रस्त ।४। जयदेव

उपवासाचे खमंग थालीपीठ...

लेखक डावखुरा यांनी रविवार, 21/11/2010 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
उपवासाचे खमंग थालीपीठ... पुर्वतयारी : राजगिरा,भगर,साबुदाणा समप्रमाणात घेउन भाजुन घ्या.. त्यात धणे,जिरे घालुन दळुन घ्या.. कृती : भाजणीचे पीठ, तिखट, मीठ, दाण्याचे कुट, दही/लिंबु, कोथिंबिर मिसळुन गोळा बनवुन घ्या.. गरम झालेल्या तव्यावर थापुन खरपुस भाजेपर्यंत वाट पहा... तयार थालीपीठ...सोबत खोबर्‍याची चटणी किंवा दही... खाद्यलालसा..

शी वॉक्स इन ब्युटी (बायरन)

लेखक शुचि यांनी रविवार, 21/11/2010 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
बायरन या महान कवीची "She walks in Beauty" ही कविता जेव्हा मी कॉलेजमध्ये वाचली तेव्हा अगदी प्रेमात पडले होते. मला त्या वेळेस नक्की कळलं नव्हतं की मी इतकी मंत्रमुग्ध का झाले होते पण तेव्हा "The best" वाटली होती, अजूनही वाटते. विचार करता पहिल्यांदा वाटलं की एका स्त्रीच्या पदन्यासाचं, सौंदर्याचं अप्रतिम वर्णन आहे, लक्षवेधी उपमा आहेत म्हणून असेल कदाचित. पण मग मग जशी स्वतःची ओळख होत गेली लक्षात येऊ लागलं की कारण वाटतं तितकं उथळ नाही आहे.

फार पडझड झालीय ह्या शरीराची !!

लेखक प्रकाश१११ यांनी रविवार, 21/11/2010 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
कितीतरी उन्हाळे पावसाळे उलटून गेले शरीराने खूप भोग घेतले भोगून सुख दुख घेतले पचवून पण आता नाही सहन होत त्याला ह्या ऋतूंचे बहाणे नाही सहन होत ह्या शरीराला आता हे बदल थकून गेलेत त्याचे गात्र नि गात्र गंजून गेलेत ह्या सांध्याच्या बिजागर्या कुरकुरतोय सांधा नि सांधा नेत्र लागलेत पैलतिराला....!! आतला तो असतो अजूनही प्रचंड टवटवीत लाथेने हे जग ठोकरीत तेवढी वाटते प्रचंड हीमत तो आहे तितकाच उत्साही .ताजा टवटवीत मन किती ताजे आहे त्याच्यात अजूनही ताकद आहे हे शरीर सांभाळण्याची पण हे शरीरच गेलेय घाबरून त्यानेच दिलाय धीर सोडून हातपाय बसलाय गाळून संपून गेलीय सारी उमेद किती सांभाळून
काव्यरस

रांगोळ्या

लेखक शैलेश हिंदळेकर यांनी गुरुवार, 18/11/2010 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सोसायटीतील एक अनामिक व्यक्तीने काढलेल्या सुंदर रांगोळ्या मोबाईलमध्ये टीपून येथे प्रसिद्ध करीत आहे. सध्याच्या ब्लॉक संस्कृतीमुळे बंद दाराआडच्या त्या व्यक्तीला मी अद्याप पाहिलेले नाही.

शिल्लक रव्याच्या लाडुचा शिरा

लेखक कुक यांनी गुरुवार, 18/11/2010 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
रव्याच्या लाडुनचा शिरा. साहीत्य > रव्याच्या लाडु , साखर, तुप, दुध क्रुती > लाडुनचा चुरा २ वाटी घ्या. (लाडु कुसकरा) हा चुरा तुपावर परतवा. (हयात कमी तुप घाला लाडु बनवताना तुप घातलेले असेल त्या नुसार घाला. जर लाडुन मधे खोबरे असेल तर ते चुरा भाजताना जळणार नाही ह्याची काळजी घ्या.) दुध गरम करुन चुरा भाजलेल्या पातेल्यात घाला. साखर घाला. कमीच घाला कारण लाडुत असणार . काजु बदाम हवे असतिल घाला. गरम गरम खायाला द्या.

महाराष्ट्र दर्शन - भाग २/ "दौलताबाद"

लेखक स्पा यांनी गुरुवार, 18/11/2010 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ दुवा, अंबाजोगैहून २ वाजता निघालो खरे, पण मोठा प्रॉब्लेम झाला , त्यादिवशी private गाड्या दिसतंच नव्हत्या,जादा गाडी ४ ची होती,म्हणजे जर ती गाडी पकडली असती तर पोहोचे पर्यंत ११-१२ वाजले असते. मग काय २.१५ च्या "लाल डब्यात" कसे बसे चढलो ( तिथेच माती खाल्ली). ती बस already खच्चून भरलेली होती.... सुरु झाल्यावर कळलं , कि आपल्याला औरंगाबादच्या तिकिटात , Essel world ची सफर सुद्धा फुकटात लाभणार आहे.....खिळखिळेपणाचा कळस होती ती बस.... एवढ्या टिनपाट डब्यात पहिल्यांदाच बसलो होतो. पहिल्या १० मिनटातच सगळी हाडं ढिली झाली... त्यात बसायला जागा नवती...

कलर्स थीम हवी आहे.

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 18/11/2010 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
"कलर्स" या वाहिनीची थीम असलली (बासरी ) ओरिजिनल एम. पी. थ्री. स्वरुपात कुणाला नेटवर / अन्यत्र सापडली असल्यास त्याचा यु. आर. एल. येथे द्यावा अथवा ती थीम माझ्या ईमेल आयडीवर पाठवा. आभारी आहे. इमेल : sonar.nimish@gmail.com .... माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या : http://thinknimish.blogspot.com

मी आणि नवा पाऊस

लेखक नीधप यांनी गुरुवार, 18/11/2010 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
२००७ च्या साप्ताहिक सकाळ कथास्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकात असलेली माझी कथा. --------------------------------------------------------------------------------- ‘‘कधी येणार तुझा मित्र?’’ प्रश्न आला आणि माझी तंद्री मोडली. पावसाळा सुरू व्हायच्या आधीची वेळ. उन्हाची तलखी, मळभ, मधूनच सुटणारा वारा.... सगळं एकाकी, एकटं वाटायला लावणारं. अश्यात मी विद्यापीठात दुपारच्या वेळेला बसस्टॉपवर उभी होते आणि येणारी प्रत्येक बस सोडत होते. प्रश्नकर्त्या आवाजाचा मालक बहुतेक विद्यार्थी असावा डॉक्टरेटचा.