Skip to main content

म्हातारा

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 22/11/2010 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
अरुंधती ची म्हातारपणाची प्रार्थना वाचली आणि दै. सकाळ ४/४/२०१० मधे आलेली कविता देशोदेशीच्या सदरात कॉन्स्टंटाईन पी कवाफी या ग्रीक कवि ची म्हातारा ही कविता आठवली.
काव्यरस

एलओएलझेड!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 22/11/2010 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
मला पहिल्यांदा कळायचंच नाही. "एलओएल' आणि "एलओएलझेड' म्हणजे काय ते! मला वाटायचं, सॉफिस्टिकेटेड भाषेत शिवी देण्यासाठी "वायझेड' म्हणतात, तशीच काहितरी शिवी असावी.

खाजकविता २ - दाढी , झुरळ आणि कविता...

लेखक कानडाऊ योगेशु यांनी सोमवार, 22/11/2010 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
झुरळाने मिशा फेंदारुन एकदा कविता करायचे ठरवले.. बिळात बिळात मिशा टाकुन. नुसते विषय हुडकले.. त्याला विषय मिळाले खुप पण सुचली नाही कविता.. अहो,कविता फक्त करता येते.. दाढी खाजवता खाजवता.. एकदा झुरळाला कशीबशी एक कविता सुचली.. मिशामिशा फेंदारुन त्याने झुरळीसमोर वाचली.. झुरळी म्हणाली त्याला.. काय पण हुरळलाय गडी.. अहो...जरा सबुरीने... कविता केलीये..आता तुम्हाला फुटेल दाढी.. दाढीवालं झुरळ..म्हणताच.. झुरळ दचकलं जाम .. आपल्या मिशाच बर्या बुवा.. कविता करणे आपले नाही काम..
काव्यरस

महाराष्ट्र दर्शन - भाग ३/ "वेरूळ "

लेखक स्पा यांनी सोमवार, 22/11/2010 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - http://www.misalpav.com/node/15474 भाग २ - http://www.misalpav.com/node/15500 अर्ध्या तासात वेरूळ आले सुद्धा ...... मला नुकतीच झोप लागली होती.... परत बस मधून उतरा.... तेसुद्धा १ च्या रणरणत्या उन्हात...... जीवावर आलं होत.... "पण" वेरूळ ला जाण्याचीच एवढी ओढ होती, कि बाकीचे त्रास त्यापुढे नगण्य वाटत होते..... एका मोठ्या "उद्यानासमोर" बस थांबली .......समोरच वेरुळच्या जगप्रसिद्ध लेण्या दिसत होत्या.... बघूनच मन "प्रसन्न" झालं.... आमच्या गाईड ची पीर पीर सुरु झाली . इथे एकूण ३४ लेण्या आहेत .

पर्वती वरुन काढलेले पुण्याचे छायाचित्र

लेखक पांथस्थ यांनी सोमवार, 22/11/2010 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्यामधे पर्वती टेकडीवरुन सायंकाळी ४/५ च्या सुमारास काढलेले पुण्याचे (पॅनोरमिक) छायाचित्र. Panoramic View Of Pune मुळ छायाचित्र बरेच मोठे आहे (9413 x 418), ते येथे पहा .

आई ... मिटलेला श्वास.. ८ (मनपक्षी माखले सारे)

लेखक गणेशा यांनी सोमवार, 22/11/2010 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ७ : http://www.misalpav.com/node/15457 पार्श्वभुमी : लहानपणी आई बरोबर शेता मध्ये येणारा नायक, बांधावर बसुन हरबरा खाताना समोरच्या पाखरांना आवाज देवुन उडवुन लावतानाचा नायक आणि नंतर आई नसताना पुन्हा शेतात आल्यावर व्याकुळणारा नायक .. बस्स शेतात बसलो असता बांधावर भासांची टोळी आठवणींच्या दाण्यांची फाटकी माझी झोळी मन होउन पाखरु मायेचा शोधते घास नभी थकलेला चांद केविलवाणा विराण प्रवास आठवांच्या धुळसर वाटेवर मनपक्षी माखले सारे शेतात बसता आठवे मायेचे तुटलेले धागेदोरे -------- शब्दमेघ
काव्यरस

"आठवणीतली ढासू दिवाळी "

लेखक पियुशा यांनी सोमवार, 22/11/2010 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
हाय पियुशा सदर लेख आमची दिवाळीतली आठवण नुकतीच दिवाळी झाली आहे म्हटले चला दिवाळीबद्दलच खरडू या थोडेसे ................ "आठवणीतली ढासू दिवाळी " दिवाळीसण,रंगीबिरेंगी रांगोळ्या ,चांदण्यासारख्या टीम-टीमनारया पणत्या, आकाशदिवे ,फुलांची तोरणे , नवीन कपडे गोड - चमचमीत फराळ, सुवासिक फुले ,अत्तरे आणि अजून काय काय काय .......

What the hell is this!!! गांधीजी व गोडसेंचा फोटो?

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 22/11/2010 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
सॉरी पण पाहील्यावर धक्का बसला म्हणुन असे उद्गार निघाले.कृपया ह्या फोटो व त्याच्या सत्यतेबाबत माहीती असल्यास ती पुरवावी. सौजन्य : :-) http://duniyadari.tumblr.com/Marathi%20section

अनंत शुभेच्छा !!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 22/11/2010 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा वाढदिवस नि माझा हात फक्त आशीर्वादासाठी अगदी मनापासून . आतून मनाच्या गाभार्यातून कारण तुझ्या आठवणीने माझ्या झाडना फुटतो मोहर नि फुले फुलतात सुवासाची तुझ्या आठवणींचा गंध पसारतो दूरवर त्याने धुंदावून जाते माझेच मन मी नसलो जरी जवळ तरी असतो सतत जवळ आठवणीच्या मोह्ळाला झोंबून असतात मधमाश्या तसाच मी देखील तुमच्या आठवणीत असतो हरवलेला तुझे बालपण ....!, तुझे तरुणपण ...!! तुझा तो विमान प्रवास तू निघताना माझे भरून आलेले डोळे .. तू आल्यावर आपण एकमेकाला मारलेली मिठी अमेरिकेहून तू आल्यावर केवढा वाटलास मला गोरा तुझा वाढदिवस नि माझा हात फक्त आशीर्वादासाठी मनापासून आतून ....!
काव्यरस

महा भारत

लेखक तिमा यांनी सोमवार, 22/11/2010 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
सन २०५१. नोव्हेंबरचा महिना. भारताची अभूतपूर्व प्रगती करुन दाखवणार्‍या महानेत्याचा सत्कार व प्रगट मुलाखत होती. वार्ताहरांचे थवे व्यासपीठाभोवती जमले होते. त्यांच्यामागे अफाट जनसागर पसरला होता. तो ट्रकने आणला नव्हता, तर उस्फूर्तपणे आला होता. प्रारंभी दोन चार नेत्यांची भाषणे झाली. त्यानंतर प्रमुख विरोधी नेत्यातर्फे महानेत्याला नोटांचा हार घालण्यात आला. महानेत्याने सत्काराचा स्वीकार केला आणि तो भाषण द्यायला उभा राहिला. मित्रहो, तुमच्या प्रेमाने मला भरुन आले आहे. अल्पवर्षात या देशाची झालेली प्रगती पाहून मला देखील आश्चर्य वाटत आहे. पण या सर्वाचे श्रेय आमच्या गुरुंचे आहे.