Skip to main content

अनंत शुभेच्छा !!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 22/11/2010 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा वाढदिवस नि माझा हात फक्त आशीर्वादासाठी अगदी मनापासून . आतून मनाच्या गाभार्यातून कारण तुझ्या आठवणीने माझ्या झाडना फुटतो मोहर नि फुले फुलतात सुवासाची तुझ्या आठवणींचा गंध पसारतो दूरवर त्याने धुंदावून जाते माझेच मन मी नसलो जरी जवळ तरी असतो सतत जवळ आठवणीच्या मोह्ळाला झोंबून असतात मधमाश्या तसाच मी देखील तुमच्या आठवणीत असतो हरवलेला तुझे बालपण ....!, तुझे तरुणपण ...!! तुझा तो विमान प्रवास तू निघताना माझे भरून आलेले डोळे .. तू आल्यावर आपण एकमेकाला मारलेली मिठी अमेरिकेहून तू आल्यावर केवढा वाटलास मला गोरा तुझा वाढदिवस नि माझा हात फक्त आशीर्वादासाठी मनापासून आतून ....!!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1183
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

अतिशय उत्कृष्ट कविता ... वडिलांच्या भुमीकेतुन मुलासाठी म्हणुन ही कविता वाचली .. खुप खोल .. साध्या सरळ शब्दात मनाचे ठाव घेण्यारे शब्द