Skip to main content

(एक बाई ठेवावी म्हणतोय!)

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 15/12/2010 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या विडंबनासाठी वापरलेला कच्चा माल :) एक बाई ठेवावी म्हणतोय.... एक बाई ठेवावी म्हणतोय, करायला गरमागरम भाकरी मटण्-मुर्गीच्या रश्श्याबरोबर, जोडी जुळत नाही हो दुसरी!! शुभ्र दळलेली जवार बनवी होऊनि तदाकार अस्सल मर्‍हाटी भाकर सुबक, पातळ, गोलाकार एक बाई ठेवावी म्हणतोय दिसायला असु द्या कशीतरी नसो अंगी बाकी काही गुण फक्त भाकरी मिळो ऊनऊन तर एक बाई ठेवावी म्हणतोय! (मित्रहो, तुमचा काय सल्ला?) :)
काव्यरस

एक बायको करावी म्हणतोय

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 14/12/2010 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक बायको करावी म्हणतोय सुंदर .. सालस .. सावरी .. तिचे शब्द असावे तिळगुळ अन ओठांवरी काळसर तिळ नाजुक नक्षीदार ... असावे डोळे पाणीदार नजर धारदार .. असावी मराठी बाणेदार एक बायको करावी म्हणतोय सुंदर .. सालस .. सावरी .. भोळ्या या राजाची बाकी इच्छा नाहि दूसरी ... ----- शब्दमेघ ( १४ डिसेंबर २०१०) नोट : ऑफिसटाईम संपला आहे ,हणुन एक-दोन कडवी राहिली आहेत .. तरी अपुर्ण का असेना द्यावी म्हंटले कविता .. तेव्हद्याच्या अपुर्ण असलेल्या इच्छेस अर्पण म्हणता येइल ( असेच लिहिले आहे .. मजेने ह.घ्या)

गच्च मिठी शहारलेली

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 14/12/2010 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
हळुवार कातरवेळी गच्च मिठी शहारलेली चंदेरी किणार ल्यालेली आकाशी ओढणी रंगबिरंगी तव गालावर रेशमी किरणांची केशरी लाली जांभुळनयनात हरवली गच्च मिठी शहारलेली सोहळा रजनीगंधाचा स्पर्श रेशमी आनंदी .. लाजुनी दडला सूर्य ओठांची निशब्द बोली.. ---- शब्दमेघ (१४ डिसेंबर २०१०) * अवांतर : १. जांभुळनयन हा शब्दप्रयोग मी पहिल्यांदाच केला आहे, कदाचीत आश्चर्य वाटु शकते, पण माझ्या एका मैत्रीणेचे मोठे काळे पाणीदार डोळे पाहुन मला नेहमी जांभळाचीच आठवण यायची .. ही कविता त्या जांभुळनयनांना अर्पण ....
काव्यरस

कवितेचे झाड !!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 14/12/2010 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचं झाड लावलेय त्याने अंगणात पारिजातकाचे झाड आहेना.. ? त्याच्याच बाजूला...!
काव्यरस

फिटे अंधाराचे जाळे (छायाचित्रे)

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 14/12/2010 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश या ओळी मी दोन वर्षांपुर्वी काढ्लेल्या छायाचित्रांच्या माध्यमातुन सादर करीत आहे.

हळूच द्या मज झोका कान्हा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 14/12/2010 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
हळूच द्या मज झोका कान्हा
हळूच द्या मज झोका कान्हा चित्त नाही माझे थारा हळूच द्या मज झोका कान्हा ||धृ|| मन विचलीत झाले वासनांनी भरले घुसळोनी लोणी काढूनी घेती तयाप्रमाणे वासना काढाना ||१|| संसारी राहून पाही जगजेठी पापपुण्या लावी गाठी कितीक करावी तुमची आरती जन्ममरणाचा पाळणा हलवा ना ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/११/२०१०
काव्यरस

एक आठवण

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी मंगळवार, 14/12/2010 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक आठवण तुझी येता कातरवेळी . काहुर जागवणारी मनातलं अवेळी. साजंकाळी येता तुझी एक आठवण . मन सुन्न होऊन जळणारी आठवण. मनातल्या मनातं रडणारी एक आठवण. मनातल्या मनात अस्वस्थ होणारी आठवण. जीव भेदून जाते आठवण तुझी जीवघेणी, देते मज असंख्य वेदना मनी. अशी तुझी ती एक आठवण !! @ संजय गडगे
काव्यरस

मटार पॅटीस

लेखक जागु यांनी मंगळवार, 14/12/2010 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
भाजीचे साहित्य मटार दाणे अर्धा किलो कांदे २ छोटे चिरुन आल लसुण पेस्ट टोमॅटो १ बारीक चिरुन राई, जिर, हिंग, हळद, मसाला १/२ चमचा गरम मसाला मिठ तेल ओल खोबर कव्हरसाठीचे साहित्य: १ किलो बटाटे चांगले उकडून मिठ रवा किंवा बटरचा मिक्सरमधुन काढलेला चुरा. तळण्यासाठी तेल पाककृती: प्रथम वरील भाजीचे साहित्य घेउन तेलावर राई, जिर, हिंग ची फोडणी देउन कांदा गुलाबी रंगावर परतवायचा. नंतर त्यावर आल लसुण पेस्ट, हळद व मसाला घालून मटार टाकायचा. आता वरती झा़कण ठेउन त्यावर पाणी ठेउन मटार वाफेवर शिजुन घ्यायचा.

ओप्रा विन्फ्रे : एक प्रभावशाली व्यक्तिमत्व !

लेखक स्वैर परी यांनी मंगळवार, 14/12/2010 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
नाव : ओप्रा विन्फ्रे जन्म : २९ जानेवारी, १९५४ व्यवसाय : जनसामान्यांशी गप्पा! वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी गरोदर, अत्यंत गरीब परिस्थिती, हलाखीचे जगणे या सर्वांवर मात करुन वयाच्या २० व्या वर्षी सौन्दर्य स्पर्धा विजेती, उत्तरोत्तर एक यशस्वी टॉक शो होस्ट, आणि पहिली कृष्णवर्णीय महिला अब्जोपती! जिद्द आणि मेहनत यांच्या बळावर तिने आयुष्यात संपादन केलेले यशाचे शिखर भल्याभल्यांना गाठता नाही आलेले!

प्रेम

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी मंगळवार, 14/12/2010 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
मागितलेल्या सगळ्या गोष्ठी मिळतातच असं थोडी असतं, माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढी ती दूर जातात. फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळ्याही गळून पडतात, ज्याला मनापासून आपलं मानलं तिच आपल्याला विसरुन जातात, फुले वाळू लागली की फुलपाखरं देखील सोडून जातात..
काव्यरस