Skip to main content

एक suggestion : "मदत हवी आहे" नावाची लिन्क

लेखक Pearl यांनी गुरुवार, 30/12/2010 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
संपादक मंडळाला एक suggestion द्यावेसे वाटत आहे. १ कल्पना सुचवावी असे वाटत आहे. पहा बर कशी वाटते कल्पना. स्वगृहावर खालील लिन्क्स आहेत. त्यामध्ये "मदत हवी आहे" किंवा "मदत" नावाची लिन्क add करावी असं मला वाटतं. स्वगृह चर्चा काव्य साहित्य छंदशास्त्र पाककृती कलादालन कौल संपादकीय नवे लेखन कारण बरेच जणांना मदत लागते किंवा माहितीची देवाण-घेवाण करायची असते, त्यावर काथ्याकूटच झाल्या पाहिजेत असे काही धागाकर्त्याचे प्रयोजन नसते. पण अशा वेळी तो विषय वरीलपैकी कोणत्या विभागामध्ये टाकावा असा प्रश्न पडतो. तेव्हा धागाकर्ता 'काथ्याकूट' किंवा 'खरडायचा फळा' विभागाची निवड करतो.

जोएल कटलर..

लेखक गवि यांनी गुरुवार, 30/12/2010 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
कुठूनतरी मरणाशी संबंध असलेली पोस्ट वाटली तरी त्यातली आशा सर्वांना दिसेल अशी आशा आहे. ............
त्याचं नाव जोएल कटलर.
तिचं नाव क्रिस्टीन कटलर. जोएलची बायको.
त्यांना चार मुलं आहेत. सर्वजण चांगल्या स्थितीत आहेत. वेळ सेटल्ड.
जोएलनं आयुष्यभर कष्टाची कामं केली.

उपवासाचे पदार्थ १) सुरणाचे काप

लेखक जागु यांनी गुरुवार, 30/12/2010 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य: सुरण मिठ तुप चिंच कोळ पाककृती: सुरणाच्या चकत्या पाडून साल काढा म्हणजे साल काढायला सोप्पे जाते. सुरणाची पातळ चकती काढून घ्या. चकतीचे कापुन त्रिकोण करा. तुम्हाला डिझाईन येत असतील दुसर्‍या त्या काढल्यात तरी चव एकच राहणार आहे. ह्या त्रिकोणांना चिंचेचा कोळ करुन त्यात पाणी घालुन सुरण उकडून घ्या.

स्वागत २०११ !!!

लेखक पर्नल नेने मराठे यांनी गुरुवार, 30/12/2010 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ चे स्वागत करुयात !!! २०१० ह्याही वर्शी अनेक मित्र्-मैत्रीणी मिळालेत. बरेचदा आपली मैत्री होते, २-४दा फोनही होतात, मात्र मग कामकाजाच्या व्यापात संपर्कात रहाणे राहुन जाते . ऑनलाइन मित्र्-मैत्रीणींच्या बाबतितही तसेच हेच नातेवाईकांनाही लागु. मावस बहिण शेजारच्या एमिरेट्समधे रहात असुनही माझ्याकडुन फोन केला जात नाही. म्हणुन ही मैत्री /नाते टिकवण्यासाठी मात्र मी २०११ मधे प्रयत्नशिल रहाणार आहे. हाच माझा नविन वर्शाचा संकल्प म्हणायला हरकत नाही. आता तुमचे संकल्प शेअर करा की !!!

गॉन इन ६० सेकंद्स- लो फॅट पाऊंड केक

लेखक खादाड अमिता यांनी गुरुवार, 30/12/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
हा केक ,माझ्या माहेरी आणि सासरी, एकदम सुपर हिट! हा केक कधीच उरला तर काय असा प्रश्न पडत नाही - कारण केल्या केल्या लगेच त्याचा चट्टा मट्टा होतो. हि रेसिपी 'Cooking from peasants and their wives' नावाच्या एका खूप जुन्या पुस्तकातली आहे. ह्या पुस्तकाची डिस्कवरी मला एका रद्दी च्या दुकानात झाली होती. करून बघू म्हणून अगदी पौंड चे ग्राम चे कप असे हिशोब करून मग, पहिल्यांदा हा केक करून बघितला होता. ह्या केक ची ब्युटी त्याच्या versatility मध्ये आहे.

क्षण तो क्षणात गेला सखि हातचा सुटोनी...

लेखक मितान यांनी गुरुवार, 30/12/2010 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
"खजिना" चा अनुवाद करताना माझ्याजवळच्या खजिन्याचे विचार मनात येत होते. खरोखर प्रत्येकाजवळ फक्त त्याच्यासाठीचा अमूल्य खजिना असतोच असतो. खरंय हे. विशेषतः आपण निसर्गासोबत एकट्याने अनुभवलेले क्षण.... ते पुन्हा फिरून कधीच येणार नसतात. आणि ते तसे येणार नाहीत याची खूप वेळा आपल्याला जाणीवही नसते. नंतर उरते ती त्या अनुभवाची मनावर उमटलेली नक्षी. असे 'एकट्याचे क्षण' खरंच किती मूल्यवान ! त्या क्षणी त्या अनुभवाच्या संदर्भात झालेला आत्मसाक्षात्कारच असतो तो ! आणि एक साक्षात्कार त्याच क्षणी झालेला असतो " हे पुन्हा कधीच अनुभवणे नाही !" खूप अवघड होतंय हे सगळं. काही अनुभव सांगते.

क्रेपे (युरोपीयन डोसा)

लेखक गणपा यांनी बुधवार, 29/12/2010 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एका मॉल मध्ये फिरताना फुड्कोर्ट्मध्ये एक माणुस डोसा बनवताना दिसला. मुळातच इकडे भारतीय हॉटेलस मोजुन ३-४. एकजात सगळी सारखीच उत्तरेकडची चव असलेली. त्यामुळे तो डोसे काढणारा पाहुन बर वाटलं. पण वर नाव वाचल तर 'ईटालियन क्रेपे'. म्हटलं हा काय प्रकार आहे. त्याच्या काउंटरवर गेलो. एक क्रेपे ऑर्डर केला. थोडास गोडुस लागला. दिसायला तर एकदम डोश्या सारखा होता. मग घरी आल्यावर नेट वर धुंडाळलं. तेव्हा क्रेपे हा न्यहारीसाठी किंवा मधल्या वेळच्या खाण्यासाठी चालुन जाणारा , एक युरोपियन डोश्याचा प्रकार आहे अस कळलं. आणि थोडे फेर फार करत हा प्रयोग कराण्यासाठी हात शीवशीऊ लागले.

नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा

लेखक गणेशा यांनी बुधवार, 29/12/2010 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
-------------------नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा--------------------------- महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा सह्याद्रीच्या रांगामधूनी तेजसूर्य उगवतो मराठीचा नजरेच्या तीराने ही घायाळ होतो दुश्मन येथे शिवबाची ज्योत ठेवतो तेवत, बाणा मराठीचा कीतीही डोंगर फोडले परक्यांनी तरीही सह्याद्री सांधतो मनात, हा मान मराठीचा गरजले सारे जरी घरात आपापल्या नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये घुमतो आहे आवाज मराठीचा तेजोमय तलवार तळपते येथे ललकार मराठीचा विवेधतेतला नाद साज मराठीचा एक चिंगार मराठीचा गणेशा
काव्यरस