!!!!!!! पहिला नंबर असा हि , तसा ही !!!!!!!
काही दिवसांपूर्वीच बातमी वाचली कि कॅट च्या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थी अव्वल ठरले , वाचून खूप आनंद झाला . पिढ्यानपिढ्या नोकरी हेच सर्वस्व मानणारा मराठी समाज आता कात टाकतोय असं वाटू लागलं . पण या बातमीचा आनंद व्यक्त करतो तेवढ्यात आणखी एक बातमी आली कि सलग दहाव्या वर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्यात महाराष्ट्र अव्वल ........ !
नकळत जाणवले कि उंच भरारी मारताना आपण आपली जमीन विसरतोय !
क्षणात मन विषण्ण झालं . ज्या राज्याचा कृषिमंत्री केंद्रात आहे त्याच राज्यावर ही वेळ यावी यापेक्षा दुर्दैव ते काय .
मिसळपाव