(पारावरचं आत्मचरित्र)
ही प्रेरणा.
पारावरचं आत्मचरित्र
वाचताना टोचलेले खडे
काही उगाच गमजा मारताना टाकलेले
तर काही असेच
निष्कारण अजाणतेपणी सुटलेले
चुकार फ्रेंड्स मधूनच
लाईक करत हवेत चढवत
आणि
चेहेर्याची पुस्तकं टाकताना,
लिहीताना वेळेचे भान नसे
चुचकारताना डबके झालेल्या,
जाहीर लिहीताना
हवेत मारलेल्या उड्या अन्
अंगावर उडवलेला
चिखल भिंतभर पसरवत बसे.
आता काम साधल्यावर
दारं बंद करून घेताना
उगाचच जीव कसानुसा होतो
काहीतरी टोचतं
आणि
अडगळीत पडल्याचा भास
जाता जात नाही.
माझ्यासकट सर्व attention hogs ना समर्पित.
काव्यरस
मिसळपाव