Skip to main content

पोवाडा मराठी भाषेचा

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 27/02/2011 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
पोवाडा मराठी भाषेचा
मराठी भाषा असे धन्य धन्य बोलती जयांचे भाळी असे पुण्य कानी पडती असे हे बोल तो महाराष्ट्र प्रांत असे थोर जी जी जी जी जगामध्ये भारत देश महान अनेक भाषांची असे तो खाण कितीक बोलींना तेथे मान त्यात मराठी असे वरताण जी जी जी जी अशा या भारत देशातल्या महाराष्ट्र प्रांती मराठी भाषा बोलली जाते. अहो ही भाषा असे कुणाकुणाची? ही भाषा कुणाची म्हणून काय प्रश्न विचारता?
विशेष

मजनु आणि बाग...

लेखक चिगो यांनी रविवार, 27/02/2011 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
ढिसक्लेमर :- ही कविता बरेच वर्षांआधी लिहीली होती.

आयज जागतिक मराठी दिन

लेखक पैसा यांनी रविवार, 27/02/2011 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
आयज जागतिक मराठी दिन. या दिनाच्या निमित्तान मराठीची एक धाकटी भैण कोकणी भाषेबद्दल किदें तरी बरोयात अशे हांवे चितलें. म्हणून हो लेख. कोकणी म्हणजे गोंयाची भास असो एक समज आसा, पुण ते सामकें खरे न्हय. कोकणी गोयांन उलैतात, महाराष्ट्रान उलैतात, कर्नाटकान उलैतात, तशी केरळातय उलैतात. काय मंडळी, काही कळलं का? बरं आता मराठीत लिहिते. आज जागतिक मराठी दिन. या दिनाच्या निमित्ताने मराठीची एक धाकटी बहीण कोकणी भाषेबद्दल काहीतरी लिहूया असा मी विचार केला. म्हणून हा लेख. कोकणी म्हणजे गोव्याची भाषा असा एक समज आहे, पण तो पूर्ण खरा नाही.
विशेष

माय मराठीचे श्लोक...!!

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 27/02/2011 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
माय मराठीचे श्लोक...!!

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
विशेष
Taxonomy upgrade extras

माझी मराठी माऊली : ओवी

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 27/02/2011 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मराठी माऊली : ओवी माझी मराठी माऊली, जसा ओंकाराचा वाण शब्दशब्द मोहविते, हरपते देहभान ...॥१॥ माझी मराठी माऊली, शब्दामध्ये सरस्वती ओव्या, श्लोक वाचुनिया, सारे जन सुज्ञ होती ...॥२॥ माझी मराठी माऊली, जसा गंगेचा प्रवाह ओघवते उच्चारण, मन बोले वाह! वाह!!
विशेष

' मराठी भाषा दिना ' निमित्त-

लेखक विदेश यांनी रविवार, 27/02/2011 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीच वाचू मराठीत बोलू - मराठी लिहूनी आनंदात डोलू ! मराठी मराठी जी माझीच माय - कशी विसरू सांगा दुधावरची साय ! परीसामुळे होई लोखंड सोने - मराठी असे जीवनी साज-लेणे ! उतू नका आणि मातू नका हो - मराठी वसा तुम्ही टाकू नका हो ! मी मातृभाषाभिमानी रहावे - जगाने शहाणे मराठीत व्हावे ! मिरवणार झेंडा मराठी सदा मी फडकणार उंचावरी तोच नेहमी !!
विशेष

समिधाच सख्या या...

लेखक अवलिया यांनी रविवार, 27/02/2011 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी आज २७ फेब्रुवारी. वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष म्हणूनही साजरे होत आहे. त्यांचा जन्मदिवस आपण मराठी दिन म्हणुन साजरा करतो. या निमित्ताने अनेक दिग्गज कवी, लेखक आपल्या साहित्यकृती रसिकांसमोर सादर करतील. अनेक मान्यवर आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने त्या सर्व कलाकृतींचा आस्वाद घेतील. ह्या सर्व सरस्वती पूजनामधे माझे हे एक साधेसे फुल. सादर करत आहे कुसुमाग्रजांच्या काही कवितांबद्दल माझे विचार आणि मुळातल्या त्या कविता. त्यात बुद्धीनिष्ट निरुपण नसेल की रसास्वादाच्या सर्व पदरांना स्पर्श नसेल.
विशेष

फुलपाखरू

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 27/02/2011 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
नानाविध रंगांनी भरला पुष्पसुगंधे साज बहरला दवबिंदूंना लेऊनी सजला आसमंत अमृते नाहला फ़ूलपाखरे अहा नाचती कणाकणाने मधू प्राशती पराग प्रेमे वाटत सुटती पुष्पावरुनी पुष्पावरती मउ रेशमी झाल खुणावे नारींगी पंखात झुलावे घटकेसाठी शांत बसावे चंचल हे भ्रमण विसरावे बसुन मजेने पंख हलविले फ़ुलपाखरू तिथे थबकले लावण्याला फ़ुलही भुलले उराउरी भेटण्या विसरले जरा बागडून उडून जाई फ़ुल अचलसे भुलुनी राही भ्रमर अवचिते तेथे येई नारींगी पदरात विसावी फ़ूल येतसे भानावरती क्षुधा उफ़ाळे आतुन वरती आनंदे भ्रमरा अलिंगती शोषुन जीवन, भूक शमविती

स्वसंपादन सुविधा परत दिल्याबद्दल मिसळपाव व्यवस्थापनाला जाहीर धन्यवाद.

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 27/02/2011 04:38 या दिवशी प्रकाशित केले.
आजच मी माझा नवीन लेख पुन्हा वाचून बघायला म्हणून उघडला तर अहो आश्चर्यम! लेखावर दोन टॅब दिसले. दृश्य आणि संपादन. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. मी अधीरपणे संपादन टॅब उघडला. मला माझ्या लेखाची एचटीएमेल व्हर्जन दिसली. खात्री करून घेण्यासाठी मी एके ठिकाणी पूर्णविराम टाकला, व पुन्हा प्रकाशित केला. तर काय सांगू तो पूर्णविराम मला आपल्या बिंदूमय अस्तित्वाने संपादन यशस्वी झाल्याची हमी देत होता. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. मिसळपाव व्यवस्थापनाने सदस्यांची इच्छा विचारात घेऊन ही सुविधा परत बहाल केल्याबद्दल व्यवस्थापनातील सर्वांचेच मनापासून जाहीर आभार मानतो.

सुधारक सावरकर

लेखक विकास यांनी रविवार, 27/02/2011 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता माझ्याकडे २६ तर भारतात २७ फेब्रुवारी आहे. सावरकरांचा निर्वाणदिन आणि कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीची सुरवात... सर्वप्रथम, या दोन्ही विभुतींना प्रणाम! ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- “Leaders are visionaries with a poorly developed sense of fear and no concept of the odds against them.” असे रॉबर्ट जार्विक नामक शास्त्रज्ञाचे वाक्य आहे. या शास्त्रज्ञाने म्हणूनच का काय ते माहीत नाही पण कृत्रिम हृदयाचा शोध लावला असावा!
विशेष