ढिसक्लेमर :- ही कविता बरेच वर्षांआधी लिहीली होती. थोडी बाळबोध, "त्रिफळाचुर्णी" (शब्दाभार : गवि) वाटली तर सांभाळून घ्यावे, ही विनंती....
**************************************************************
एकदा लैलाला घेऊन मजनु
स्वर्गातुन पृथ्वीवर आला.
अवचित एका शहरात उतरुन
तिथल्या 'फेमस' बागेत गेला.
बागेतल्या प्रत्येक झुडुपामागं
एक तरी जोडी होती.
शरीराची लगट जास्त आणि
प्रेमाची रंगत थोडी होती.
प्रेमाचं तसलं नागडं प्रदर्शन
मजनुला भलतंच खटकलं.
शेवटी त्याने धाडस करुन
एका धुंद जोडप्याला हटकलं.
"तुला नाही वाटत, मित्रा?
तुमचं प्रेम तकलादु आहे.
खरं तर हे प्रेम नव्हेच
नुस्ती आकर्षणाची जादु आहे."
प्रेमी चिडला, "तु कोण बे सांगणारा?
संस्कृतीरक्षक लागला जणु!"
मजनु बोलला शांतपणे
"ही माझी लैला अन् मी मजनु"
जोडी हसली, " तुम्हीच का ते मुर्ख,
ज्यांनी प्रेमासाठी जीव दिला.
सोबत जगणं शक्य नव्हतं
म्हणुन विषाचा प्याला पिला.
तुमचं प्रेम अशारीर होतं
आता शरीराला महत्व आहे
जितकं जास्त मिळेल तितकं
ओरबाडण्याचं आमचं तत्व आहे.
आम्ही आहोत मांजरासारखे
मिळेल तितकी मलई चाटा.
एकदा खेळणं जुनं झालं
की पुन्हा वेगळ्या आमच्या वाटा...."
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1041
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
:) हा हा हा
झकास ...