Skip to main content

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-२)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 02/03/2011 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१) संगीतकार- दत्ताराम दत्ताराम म्हणजेच दत्ताराम वाडकर. यांनी स्वतंत्रपणे सुमारे १९ चित्रपटांना संगीत दिले. शंकर जयकीशन यांचे सहकारी म्हणून त्यांनी प्रामुख्याने काम केले. श्रीमान सत्यवादी, अब दिल्ली दूर नही, परवरीश इद्यादी प्रमुख चित्रपट त्यांच्या खाती जमा होते. हिंदी सिनेमातील संगीतात त्यांनी ठेक्यात (rhythms) नवनवीन प्रयोग केले.

बोलकढी

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 02/03/2011 05:44 या दिवशी प्रकाशित केले.
धक्के बसतच असतात आयुष्यात. या ना त्या कारणाने. शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक, सामाजिक - कसेही! कॅलिफोर्नियातल्या दुकानात चितळ्यांची बाकरवडी 'क्रिस्पी स्पायसी स्प्रिंग रोल्स' म्हणून आणि बेडेकरांची थालीपीठ भाजणी 'ठेपले का आटा' म्हणून ठेवलेली दिसली तेव्हा बसलेला सांस्कृतिक धक्का; मिसळ, साबुदाणा वडा, थालीपीठ यांचा जोडीला दादरच्या प्रकाशमध्ये डोसा किंवा तत्सम दाक्षिणात्य पदार्थ मेन्यूकार्डावर दिसले तेव्हा, साक्षात सिंहगडाच्या पायथ्याशी चाललेल्या नंग्यानाचाची बातमी वाचली तेव्हा, रायगडावरच्या दारूपार्टीची पेपरात छापून आलेली छायाचित्रे पाहिली तेव्हा बसलेला सामाजिक धक्का इत्यादी इत्यादी इत्यादी.
विशेष

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 02/03/2011 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
(काही वर्षांपुर्वी एका कम्युनिटीवर हा लेख मी इंग्रजीत लिहीला होता. त्याचेच रुपांतर थोडा संपादित करून येथे ठेवत आहे.) ३-४ वर्षांपुर्वी विविध भारतीला ५० वर्षे पुर्ण झाली. त्यानिमीत्ताने जे विविध कार्यक्रम प्रसारीत व्हायचे त्यात "सुहाना सफर" नावाचा एक कार्यक्रम वर्षभर प्रसारीत व्हायचा. त्यात एकाच संगीतकाराची/संगीतकार जोडीची वाटचाल गाण्यासहीत प्रसारीत व्हायची.

बहर गुलमोहराचा

लेखक जयवी यांनी मंगळवार, 01/03/2011 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
ती उठून बाहेर आली. लख्ख उजेडामुळे तिचे डोळे दिपले…….पण मग त्या प्रकाशाचं महत्व कळलं. कित्येक दिवसांपासून ती अंधाराच्या साम्राज्यात वावरत होती. अंधाराच्या लाटांमधे गुदमरत होती. तिने मनातले सगळे काळेकुट्ट विचार झटकले आणि तिला एकदम मोकळं मोकळं वाटलं. कित्येक दिवसांची मनावर जमलेली कानाकोपर्‍यातली जळमटं निघाल्यामुळे तिचं तिलाच उत्साही वाटायला लागलं. किती दिवस साठवून ठेवलं होतं आपण हे सगळं…..!! कोंदटलेल्या मनाला जरा ऊन दाखवल्याबरोबर पुन्हा एकदा सगळं टवटवीत झालं. आजूबाजूचा कचरा साफ केल्यावर परत तीच झळाळी दिसायला लागली आणि नव्याने सगळं सुंदर दिसायला लागलं. नकोच आता तो कोंडमारा…..

मोडीलिपीची ओळख

लेखक जिप्सी यांनी मंगळवार, 01/03/2011 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजी भाषेला ज्याप्रमाणे जलद लिहिण्याची स्वतंत्र लिपी आहे, ज्याला आपण 'कर्सिव्ह' म्हणतो त्या प्रमाणेच मराठीलादेखील देवनागरीशिवाय मोडी ही एक स्वतंत्र लिपी आहे. मोडी लिपीला सुमारे ८०० वर्षांचा इतिहास आहे. यादवांचा प्रधान हेमाडपंत ह्याच्या काळात या लिपीचा उगम झाला असा एक सर्वसाधारण ठोकताळा आहे, पण मोडीलिपी त्याहीपेक्षा जुनी असण्याचा संभव नाकारता येत नाही. परंतु हेमाडपंतांच्या काळापासून म्हणजेच यादवांच्या राजवटीत मोडीलिपीचा वापर सरकारी दप्तरात होऊ लागला. हळूहळू सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरातसुध्दा मोडी आली.देवनागरी म्हणजेच बाळबोध पेक्षा मोडीत भराभर लिहीता येते.
विशेष

येडा आप्पा सरकार चा अजब आदेश

लेखक अँग्री बर्ड यांनी मंगळवार, 01/03/2011 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
११ मार्च ते १४ मार्च पर्यंत लग्नकार्ये बेळगावमध्ये करू नयेत हो.हिंदी फिल्म मध्ये जसा मुलीचा बाप यायचा मध्ये तसे कर्नाटक सरकार येईल अडवायला ! .

मज काय भाळी उमगेना ...

लेखक विश्वेश यांनी मंगळवार, 01/03/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
रात काळी, झोप जाळी, काय भाळी उमगेना ... नभ दाटले, भर सकाळी, काय भाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... विरली वाणी, सरली गाणी, सुकली रातराणी उमगेना ... जाळत जाती, खोलवर मज, तुझ्या आठवणी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... जुनीच वाट, जुन्याच खुणा, का छळती पुन्हा उमगेना ... फिरवी पाठ, ओळखीची लाट, वागणूक निराळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... साठवले बळ, फाडले उर, पण का? न फुटले सूर उमगेना ... फिरोनी आलो, त्याच समेवर, का? न पडली टाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ...
काव्यरस