Skip to main content

सोनेरी पानं

लेखक निनाव यांनी शनिवार, 05/03/2011 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
सोनेरी पानं उगीच का होतात सोनेरी ? हिरवाईचे दिवस जपतात ते कितीतरी अखेर गळतात.. एक दिवस ते ही स्वागत पडुन नव्याचे करतात तरुणाई चे जल्लोषात आगमन मग करते फुटलेले नवे कोंब मुसमुसलेले वळते अखेर त्यांचे ही वय एक दिवस अटळ सत्यच ते सांगुन जातात सोनेरी झाले म्हणून नव्याची नाही अवहेलना अवमानात नाही कुठलीच प्रेरणा उन-पावसाचे वाचलेच संपुर्ण पुस्तक न बोलता बरेच काही सांगुन जातात ती सोनेरी पानं.

तत्काळ मदत हवी आहे. (कॅनडा मध्ये)

लेखक योगी९०० यांनी शनिवार, 05/03/2011 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझा भाचा नील (वय ३) मुंबईने शिकागो येथे त्याच्या आईबरोबर जात होता. आज त्याचे विमान शिकागो येथे पोचणार होते. त्याचे वडील (म्हणजे माझा मेव्हणा) त्यांना शिकागोला भेटणार होते. पण नीलला विमानातच अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याच्या विमानाने जवळच्या विमानतळावर emergency landing केले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे. तो आत्ता कॅनडातील Goose Bay येथे आहे. त्याची तब्येत आता स्थीर आहे आणि तो उपचार घेत आहे. त्याच्या बरोबर फक्त त्याची आई आहे. त्याचे वडील शिकागोला अडकले आहेत आणि त्यांच्याजवळ कॅनडाचा valid visa नसल्याने त्यांना सोमवारपर्यंत Goose bay येथे जाता येणार नाही आहे.

चिकन मसाला आणी बटर रोटी

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 05/03/2011 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
.साहित्य चिकन मसाला: ५०० ग्राम साफ करून ठेवलेले चिकनचे तुकडे २ मोठे कांदे चिरलेले २ टोमॅटो चिरलेले २ टेस्पून आलं+लसूण+कोथिंबीर वाटून २ चमचे खसखस भिजवून वाटणे ३ मोठे चमचे दही १ चमचा हळद २ चमचे लाल तिखट १ १/२ चमचे गरम मसाला मीठ चवीनुसार पाव वाटी तेल+ २ चमचे तुप २-३ तमालपत्र २-३ दालचिनी १ छोटा चमचा शहाजिरे चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी पाकृ: साफ करून ठेवलेले चिकनचे तुकड्याना दही , आलं+लसूण+को

वषाट

लेखक मुक्त यांनी शनिवार, 05/03/2011 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
परशा आपल्या शेळ्या घेवुन आज लौकरच आला होता. परश्याने शेळ्या वाडग्यात कोंडल्या. तान्ह्या-पार्‍हाट्या शेळ्या वेगवेगळ्या बांधल्या. वाडग्याचा झोपाटा पध्दतशीर लावुन झपाझप टांगा टाकीत म्हणजे जवळजवळ पळतच तो घराकडे निघाला. कधी घरी जाईन अशी अनावर घाई त्याला झाली होती. त्याला कारणही तसेच घडले होते. आज दुपारी ओढ्याला पाणवठ्यावर हिवर्‍याच्(एक गाव) एक शेळ्यांचं खांड आलं होतं. त्या शेळ्यांचा आणि परशाच्या खांडाचा मेळा झाला होता. त्या गडबडीत हिवर्‍याच्या खांडातलं एक बकरु चुकून परशाच्या खांडात आलं होतं. परशा घरी आला त्यावेळेस तात्या, परशाचा बाप ओट्यावर बिडी फुंकीत बसला होता.

तीचे डोळे

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 04/03/2011 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
" रोखूनी मजला पाहू नका डोळे हे जुल्मी गडे कशीदा मी काढु कशी " असे काहीसे गाणे कधीतरी रेडीओवर ऐकले होते. ते वय गाणी ऐकून मोहरायचे नव्हते. मग कुठल्यातरी वयात तसे डोळे पाहिले किंचीत पिंगट.... पाणीदार... आणि एखाद्या छान चित्राला फ्रेम असावी अन त्या फ्रेममुळे चित्राला आणखीनच शोभा यावी किंवा सुंदर खडा कोंदणामुळे आणखीनच तसे काजळाच्या फ्रेममध्ये दिसणारे ते डोळे मला अचानक काहीतरी वेगळीच जाणीव देवून गेले. ती पहिली नजर पुन्हा कधी अनुभवता येणे केवळ अशक्यच. ज्याने अनुभवली त्यालाच हे कळाते. देव भेटल्यापेक्षाही त्या क्षणात काहीतरी जादूभरे असते.

पाहून सयीला माझ्या....

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 04/03/2011 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
हळुवार पावलांनी श्रावण आला अंगणी... सयेची पैन्जने मन तारा झ्हन्कारती... ओशाळतो पारिजातही पाहुनी सयेला माझ्या... अन्थरुनी नक्षत्रांचे देणे लगडतो तिच्या पाया... चिंब कुंतले तिची घेती चुंबने गालाची घुटमळतो अल्लड वारा उडणार्या तिच्या पदराशी... ......छान पाऊस पडतोय, खिडकीत आपण उभे, आणि समोर पारिजात चिंब न्हाऊन निघतोय त्या पावसाच्या सरीत, हळुवार पाणी ओघळतय पानावरून,.....अगदी तसच जस न्हाऊन आल्यावर सयेच्या गालावरून ओघळत... पाहून सयीला माझ्या मनी तारा झ्हन्कारती.
काव्यरस

म्हटलं तर अनावश्यक..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 04/03/2011 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी आज इथे एक सर्वसाधारण काथ्याकुटाचा मजकूर लिहीतोय. पण त्या मजकुराचा उद्देश आज वेगळा आहे. म्हणजे पुरेसे काथ्याकूट करता येईल इतपत तो विषय चिवडण्याजोगा आहे. पण... इथे काही वेगळं करता आलं तर बघू म्हणून एक आचरट विनंती करु इच्छितो.