Skip to main content

स्त्री सूक्त

लेखक योगप्रभू यांनी मंगळवार, 08/03/2011 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
राणीच्या राज्यात ब्रिटिशांसारखी आमच्याकडेही एक गोष्ट अगदी सेम असते प्रत्येक घरात एक राणी असते आणि कुटूंबाचे तिच्यावर प्रेम असते *** फुलांसाठी अहंकारांचे भेदक बाण सुटण्यापूर्वीच खुडून टाका नाजूक, सुंदर फुलांसाठी धनुष्य फेकून खाली वाका *** सक्षमीकरण शब्द अवघड वाटला तरी सक्षमीकरणाचा सोपा आहे अर्थ पुरुषातील कोमल स्त्री जागवा आणि स्त्रीमधला पुरुषार्थ ***
काव्यरस

स्त्री

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 08/03/2011 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी गीत मी प्रीत मी साद मी हाक मी शब्द मी व्यक्त अखंडीत !! मी राधा मी मीरा मी शक्ती मी भक्ती मी अणु मी रेणू समाजात!! मी सल मी बळ मी खोल मी पंख मी धरा मी नभ संभ्रमात !! मी धुंद मी गंध मी नशा मी फ़ुल मी सुध मी शेज जन्मजात !! --- शब्दमेघ (स्त्री...भावनांचा प्रवास मधुन)

स्त्री सूक्त

लेखक योगप्रभू यांनी मंगळवार, 08/03/2011 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
राणीचे राज्य ब्रिटीश आणि आमच्यात एक गोष्ट अगदी सेम आहे प्रत्येक घरात एक राणी आहे आणि कुटूंबाचे तिच्यावर प्रेम आहे *** चिमुकल्या फुलांसाठी अहंकाराची बोचक कुसळे बाण होण्याआधी छाटून टाका नाजूक चिमुकल्या फुलांसाठी धनुष्य टाकून खाली वाका *** सक्षमीकरण शब्द अवघड वाटला तरी सक्षमीकरणाचा सोपा आहे अर्थ पुरूषातील कोमल स्त्री जागवा आणि प्रत्येक स्त्रीमधील पुरुषार्थ ***

गण: देव गौरीनंदन आधी वंदुया

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 08/03/2011 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
गण: देव गौरीनंदन आधी वंदुया (चाल पारंपरीक)
देव गौरीनंदन आधी वंदुया शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ|| रसीक जमले आम्हांसमोरी तुझेच रूप जणू शेंदरी उशीर नका लावू देवा झडकरी या या शुभ कार्याची सुरूवात करूया ||१|| रिद्धी सिद्धीचा तु रे स्वामी तुज पुजीतो कलावंत आम्ही मंगल कार्याआधी गणाला गावूया शुभ कार्याची सुरूवात करूया ||२|| देव गौरीनंदन आधी वंदुया शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०८/०३/२०११
काव्यरस

आदर्श महिला

लेखक मुलूखावेगळी यांनी मंगळवार, 08/03/2011 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!!!! हा धागा एवढ्यासाठी आहे कि आपण आज इथे आपल्याला आदरणीय आणि स्फुर्तीदायक वाटणार्‍या महिलांची नावे इथे शेअर करुया आणि त्या तुम्हाला आदरणीय आणि स्फुर्तीदायक का वाटतात त्याची कारणं पण. माझ्या आयुष्यातील- १. माझी आई - माझी खुप्प्प प्रिय ,माझ्या आयुष्यातील पहिले मानाचे स्थान असलेली . हिने मला खुप काही शिकवलंय.अडचणींवर मात करुन गोष्टी पुर्णत्वाला नेणे,सगळ्यांना वेळ देउन स्वतःसाठी ही वेळ काढणे. २. झाशीची राणी- शौर्याचे प्रतिक आहे म्हणुन ३.जिजामाता- आदर्श माता म्हणुन. तुम्ही पण सांगा .

डॉ. जयंत नारळीकर - महाराष्ट्र भूषण

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 08/03/2011 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र शासनाचा ' महाराष्ट्र भूषण ' हा पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन खगोलशास्त्रातील संशोधनात त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा अमोल केळकर ---------------------- मला इथे भेटा

महिला दिनाच्या शुभेच्छा !

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 08/03/2011 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्व मिपाकर महिला, तरुणी, बालिका आणि आज्ज्या, पणज्ज्या, खापरपणज्ज्या यांना शुभेच्छा !!! लवकरात लवकर लिंगभेदानुसार होणारा अन्याय दूर व्हावा आणि मानवजात अधिक प्रगल्भ व्हावी ही मनोकामना !! सर्वांचे कल्याण होवो !!

फ्री ऑनलाईन चित्रपट दाखवणार्‍या लिगल वेबसाईटस

लेखक नेत्रेश यांनी मंगळवार, 08/03/2011 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
ईंटरनेटवर नवे-जुने चित्रपट पहाण्यासाठी बर्‍याच वेबसाईटस उपलब्द्ध अहेत. पण बहुतेक वेबसाईटवर पायरेटेड चित्रपट, वाईट क्वालिटी, व्हायरस आणी मालवेअर्स असे बरेच प्रोब्लेम असतात. पण राजश्री, सोनी सारख्या काही मोठ्या चित्रपट निर्मीती करणार्‍या संस्थांच्या उत्तम वेबसाईटसही आहेत. मला माहीत असलेल्या काही चांगल्या आणी लिगल वेबसाईटस ईथे देत आहे. बर्‍याचजणांना यातील बहुतेक वेब्साईटस माहीत असतील.