Skip to main content

कटाची आमटी ---

लेखक निवेदिता-ताई यांनी शनिवार, 19/03/2011 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
चार वाट्या पुरणावरील कट--आपण आज जे पुरण केले त्यावरील जेवढा कट आधीच बाजूला काढून ठेवला असेल तो घ्या.व थोडेसे तयार पुरण पण घ्या, गुळ पाव वाटी, एक लींबाएवढी चिंच भिजत घालून ठेवा व त्याचा कोळ काढा, सुक्या खोबर्याचा एक छोटा तुकडा गॆसवर भाजून घ्या म्हणजे तो तुकडा गॆसवर धरा तो पेट घेइल तो खाली काढून ठेवा व तो पुर्ण काळा झाला की फ़ुंकर घाला...करपु देउ नका, आता त्याचे बारीक तुकडे करुन ते वे जिरे चमचाभर घेउन मिक्सरवर वाटून घ्या, गोडा मसाला एक चमचा (टे.

(आता करितो भरपाई...)

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 19/03/2011 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
या विडंबनासाठी वापरलेला कच्चा माल... सोडले जुने रागलोभ...राहिलो मिपानगरीचे ठायी... आता करितो भरपाई...आता करितो भरपाई... हा तो विसोबाचा गाव.... अवघे चंट, थोडके राव... पिचकारीच्या रंगामध्ये.. अवघा आसमंत न्हाही... आता करितो भरपाई...आता करितो भरपाई... स्वसंपादनाचा घोळ... हा तर बालिश पोरखेळ... उठली बंदी जर काही.....ती तो नीलकांताची पुण्याई... आता करितो भरपाई...आता करितो भरपाई... ते बंधन सुटता वेगे... पहा झाली नवीन पहाट.... विसरूनी शून्य चर्‍हाट...

भोग

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 19/03/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
या जन्माची पापं या जन्मातच फेडायला लागतात म्हणे. आयुष्याचे भोग प्रत्येकाने भोगायलाच पाहिजेत असाही एक प्रवाद आहे. पण मी आयुष्यात अशी कुठली पापं केली आहेत की माझे भोग संपता संपत नाहीत हे कळेना झालय. नाही मी काही 'तसला' विचार मांडत नाही आहे किंवा माझी गार्‍हाणी गाण्याचा पण माझा विचार नाही. पण माझी दु:खभरी दास्तां ऐकुन तुमच्या डोळ्यात पण पाणी येइल. अजुन काही नाही तुमच्या कडुन फक्त थोड्या सहानुभुतीची अपेक्षा आहे. मी सुरुवातीलाच मोकळेपणाने कबूल करु इच्छितो की माझ्या आयुष्यात हे जे काय घडले आहे न पेक्षा जे काही नेहेमीच घडते त्यात अंशतः चुक माझीच आहे. पण पुर्णपणे मी स्वत:ला दोष देउ इच्छित नाही.

रोज कौतुकात दंग बायको जरी ,

लेखक विदेश यांनी शनिवार, 19/03/2011 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल: आज गोकुळात रंग खेळतो हरी - ) रोज कौतुकात दंग बायको जरी , लाटणे जरा जपून आज बघ करी |धृ | तोच मित्र रोज सिगारेट ओढतो थेट खिशातून तुझ्या नोट काढतो , गुंतवुनी बोलण्यात चहा उकळतो - सावध केले मी तुला कितीदा तरी |१| सांग मित्रमंडळास काय जाहले ? कुणी गंडविल्याविना कुणा न सोडले ! ज्यास त्यास लुटण्याचे चंग बांधले - एकटाच वाचशील काय तू तरी |२| तू कधीच रंगढंग नाही उधळला ! मित्रमंडळात तरी कसा गुंगला ? तो पहा - चंडिकेस पत्ता लागला ... हाय, धावली धरून लाटणे करी |३|
काव्यरस

रंगताना रंगामध्ये

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 18/03/2011 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
रंगताना रंगामध्ये यमुनेच्या तिरावर, आवळीच्या झाडावरी दडुनिया बसला गं, नटवर गिरिधारी पाहुनिया राधिकेला, गुपचिप कान्हा आला घेऊनिया पिचकारी, नेम धरितो मुरारी सोडीयेली धार कशी? सररररर रंगताना राधा बोले अररररर बावरता राधा पळे, असे कान्हुला तो छळे तरी चुकेचिना लळे, सावळ्याच्या चाळ्यामुळे मग राधा करुणेने, बोलू पाहे केविलवाणे रंगलेले रूप म्हणे, आहे मला घरी जाणे आतातरी थांब ना रे.....! कान्हा, आतातरी थांब ना रे.....! अरे थांब गिरिधारी नको मारू पिचकारी, रंगामध्ये भिजविशी किती रे मुरारी ...IIधृ०II माळ तुटली कशी?