Skip to main content

तात्या चा ले़ख लोकप्रभात

लेखक जानम यांनी शनिवार, 19/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या अभिन्दन .. http://loksatta.com/lokprabha/20110325/shimga.htm

वाचने 5486
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

तो मी हा नव्हेच?? विसोबा खेचर हे फारच कॉमन नाव आहे बॉ!

In reply to by प्रियाली

हाहाहाहा... मागं एकदा याच विसोबा खेचरांच्या ब्लॉगवरून झालेले कोडकौतूक आठवले. ;)

लेखाचा रंग अप्रतिम जमला आहे. तात्या जिओ.

लेख एकदम छान जमलाय तात्यासाहेब.....! मजा आली.

तात्या चा असे दोन वेगळे शब्द नसून तात्याचा असा एक शब्द आहे. प्रथम नेटके लिहा मग लेख वाचायचा विचार करता येईल.

In reply to by सुनील

लेखनाला कुठेतरी> मारावे असे खुद्द तात्याश्रीच म्हणून गेले आहेत, तेव्हा, शांत, शांत व्हा, सुनील. आता इथेच कुणीतरी 'बधाई' दिली आहे, माणसे आजकाल दुपारची 'लेटतात' (पहुडत नाहीत), 'आतंकवादी' हल्ले करतात, कुणीतरी दुसर्‍या कुणाची मदत करतो, कुणीतरी कुणालातरी 'कोसतो', 'ताने देतो'........ जाउं दे... ई महारास्ट्र मां काहे को इतना झंझट करना, बाबूजी?

In reply to by प्रदीप

वा! काय 'ढासू' प्रतिसाद आहे. हा शुद्धलेखनाचा 'ढकोसला' फार दिवस चालणार नव्हताच. 'ग्लोबली' त्याचा 'भांडा फोड' झालेला आहे. कृपाशंकर यांची मावशी आहे मराठी हे ऐकल्यापासून हिंदी आपली मावशी आहे हे सगळ्यांना कळलं आहे. आणि तुमच्याच त्या शुद्ध का फिद्ध मराठीत 'कहावत' आहे ना, 'माय मरो मावशी उरो' का काय?

In reply to by प्रदीप

प्रतिसाद आवडला. शुद्धलेखनाला फाट्यावर मारल्याने त्रास होणारेही काही आहेत हे जाणून बरे वाटले. जालावर हल्ली fashion आहे म्हणे शुद्धलेखनाला फाट्यावर मारण्याची. कित्येकदा तर मला वाटते की इतर काहीजण शुद्धलेखनाचा आग्रह धरतात म्हणून आपण त्याला फाट्यावर मारायचे असे धोरण काहीजण राबवतात. >>लेखनाला कुठेतरी> मारावे असे खुद्द तात्याश्रीच म्हणून गेले आहेत खुद्द म्हणायला त्यात्या भाषा या विषयातील तज्ञ (Authority) नाहीत. म्हणून त्यांच्या मताला किंमत नाही असे म्हटले नाही. मागे एकदा असाच उल्लेख झाल्याने काही मिपाकर सावरकरांवर संशोधन करत होते असे स्मरते. ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

खुद्द म्हणायला त्यात्या भाषा या विषयातील तज्ञ (Authority) नाहीत.
तुम्हाला तात्या म्हणायचे (लिहायचे) आहे का ? अर्थात कोणी शुद्ध लिहावे, कोणी अशुद्ध लिहावे हे किंवा कसे लिहावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही. मी आपले एक निरिक्षण नोंदवले. आणि हो काल आमचे परम मैतर श्री. टारझन ह्यांचा लेख देखील दैनिक सामना मध्ये छापुन आला आहे :) इच्छुकांनी जरुर वाचावा :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>तुम्हाला तात्या म्हणायचे (लिहायचे) आहे का ? होय. टायपो झाला. >>अर्थात कोणी शुद्ध लिहावे, कोणी अशुद्ध लिहावे हे किंवा कसे लिहावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही. अशुद्ध लिहिणे आणि टायपो यातील फरक कोणा जाणकाराकडून जाणून घ्या. >>मी आपले एक निरिक्षण नोंदवले. चांगले केलेत. "बालादपि सुभाषितं ग्राह्यम्" असे आमचे तत्व आहे. >>आणि हो काल आमचे परम मैतर श्री. टारझन ह्यांचा लेख देखील दैनिक सामना मध्ये छापुन आला आहे इच्छुकांनी जरुर वाचावा चांगली गोष्ट आहे. लेख वाचला. माहितीपूर्ण आहे. श्री टारझन यांचे अभिनंदन.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अशुद्ध लिहिणे आणि टायपो यातील फरक कोणा जाणकाराकडून जाणून घ्या.
अहो आजोबा मी काय लिहिलय निट वाचले का ? अर्थात कोणी शुद्ध लिहावे, कोणी अशुद्ध लिहावे हे किंवा कसे लिहावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही. शुद्ध / अशुद्ध/ कसेही (अर्थात टायपो / मुद्दामुन जसे न चा न किंवा ल चा ळ वैग्रे) असे मी म्हणालो. तुम्ही अशुद्ध लिहिलय का शुद्ध ह्यावर मी कुठे काय भाष्य केलय ?
चांगले केलेत. "बालादपि सुभाषितं ग्राह्यम्" असे आमचे तत्व आहे.
छान आहे. अर्थात कोणी तत्व ठेवावे कोणी जडत्व ठेवावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

च्यायला .. लेखाची लिंक कशी रे काढली ह्या ? :) मी काल पासुन शोधत होतो :) गॉडफादर परिकथेतील राजकुमारांचे आभार :)

In reply to by टारझन

अरे दाद्या तिथे लेखाखाली प्रिंट / फॉरवर्ड/ प्रतिक्रीया असे ऑप्शन आहेत बघ. त्यातल्या फॉरवर्डवर क्लिक करायचे.

तर ही हातात पाण्याचा तांब्या घेऊन करदावत होती, ‘मेलं सोसत नाही तर घेता कशाला म्हणते मी?’ तात्या नक्कीच 'तो मी नव्हेच' म्हणेल. लेखात 'आमची ही' असा उल्लेख आहे. लग्न वगैरे झाले का काय?