Skip to main content

(आता करितो भरपाई...)

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 19/03/2011 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
या विडंबनासाठी वापरलेला कच्चा माल... सोडले जुने रागलोभ...राहिलो मिपानगरीचे ठायी... आता करितो भरपाई...आता करितो भरपाई... हा तो विसोबाचा गाव.... अवघे चंट, थोडके राव... पिचकारीच्या रंगामध्ये.. अवघा आसमंत न्हाही... आता करितो भरपाई...आता करितो भरपाई... स्वसंपादनाचा घोळ... हा तर बालिश पोरखेळ... उठली बंदी जर काही.....ती तो नीलकांताची पुण्याई... आता करितो भरपाई...आता करितो भरपाई... ते बंधन सुटता वेगे... पहा झाली नवीन पहाट.... विसरूनी शून्य चर्‍हाट... पेनामध्ये भरतो शाई... आता करितो भरपाई...आता करितो भरपाई... पिडां देता एकचि हाक...उठे प्रतिसाद मिपाखोर्‍यात... आंद्या, धम्या, आणिक टार्‍या... गर्जती करूया जंगी कल्हई आता करितो भरपाई...आयच्यान, आता करितो भरपाई!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :) स्वसंपादनावरील बंदीच्या निषेधात आम्ही स्वत:वर लादून घेतलेले मिपावरच्या प्रकाशनबंदीचे धोरण स्वसंपादनावरची बंदी उठल्याने आम्ही आज मागे घेत आहोत! तेंव्हा, आता येळकोट, येळकोट, जय मल्हार!!! :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3957
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

चला पिडांजुर्नांचा अज्ञातवास संपला, होउन जाउ द्या!

शिमग्याच्या मुहुर्तावर लेखनसंन्यास मागे घेतल्याबद्दल पिडांचे आभार.

In reply to by चित्रा

सुप्रसिद्ध श्री. पिवळा डांबिस यांचे वाखाणले गेलेले कसदार लेखन वाचण्यास उत्सुक.

In reply to by नगरीनिरंजन

हा डांबिस पिवळ्यापेक्षा हिरवाच ज्यास्त आहे :P

In reply to by गणपा

अजातशत्रू पिडांकाका आपला त्रिदंडी लेखनसंन्यास मागे घेऊन पुन्हा गृहस्थाश्रमी झाल्यामुळे आता धुळवड कमी होईल नि अनेकरंगी रंगपंचमी दुप्पट जोमाने साजरी होईल अशी अपेक्षा आहे.

है जबरान :) चाल लावुन वाचले अगदी :) स्साला , कारण काहीही असो जुणे जाणते लिहीणे बंद झाल्यामुळे मज्जा येत नव्हती. आणि आजकाल नुसतेच बालिश क्रश लेख वाचायला लागत होते :) -(स्वसंपादन गेल्यामुळे खुश ) टारझन

In reply to by टारझन

@ टारर्याआआआआआअ तुला कोनि आग्रह नव्हता केला ना ,वाचन्याचा मग कशाला कश्ट घेतलेस वाचन्याचे :) पुध्च्या वेळी माझा धागा दिसला कि इग्नोर कर ;)

भरपाई अशी इतक्यात होणार नाही. सव्याज झाली पायजेल. सुलभ हप्त्यांवर, पण त्यातला एकपण चुकला तर तुमच्या ग्यारेंटरना धरू...

तुमचे जुने लिखाणही या धाग्याच्या निमित्ताने वाचले. श्री. रमताराम आणि श्री. घासकडवी यांच्याशी सहमत. सर्वांना होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा.

वेलकम ब्यॅक! 'न्यू ऑर्लिन्स'बद्दल वाचायला कधी मिळतंय त्याची वाट पाहतो ;)