आहे का कोणी ?
अमरजीतसींग हा आर्थिक क्षेत्रात फार मागे, मात्र बौद्धिक क्षेत्रात नवनवी शिखरे पादाक्रांत केलेला आणि नव्या शिखरांची स्वप्ने रंगवणारा विद्यार्थी. ह्या वेळच्या बारावीच्या परीक्षेत ह्या विद्यार्थ्याने ६०० पैकी ५७८ गुण मिळवले. येवढेच करून न थांबता आज लागलेल्या CET च्या परीक्षेत त्याने २०० पैकी १९२ गुण पटकावून घवघवीत यश संपादन केले.
पण आता पुढील शैक्षणिक खर्चाचे काय? घरच्या आर्थिक अडचणीतून मार्ग काढून तो पुढे शिकू शकेल ? का हि बुद्धिमत्ता झाकोळून जाणार ? हे प्रश्न मनात उभे राहतं असतानाच तुमच्या आमच्यातूनच एक मदतीचा हात पुढे येतो आणि त्याच्या पुढील चार वर्षाच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलतो.
मिसळपाव