अमरजीतसींग हा आर्थिक क्षेत्रात फार मागे, मात्र बौद्धिक क्षेत्रात नवनवी शिखरे पादाक्रांत केलेला आणि नव्या शिखरांची स्वप्ने रंगवणारा विद्यार्थी. ह्या वेळच्या बारावीच्या परीक्षेत ह्या विद्यार्थ्याने ६०० पैकी ५७८ गुण मिळवले. येवढेच करून न थांबता आज लागलेल्या CET च्या परीक्षेत त्याने २०० पैकी १९२ गुण पटकावून घवघवीत यश संपादन केले.
पण आता पुढील शैक्षणिक खर्चाचे काय? घरच्या आर्थिक अडचणीतून मार्ग काढून तो पुढे शिकू शकेल ? का हि बुद्धिमत्ता झाकोळून जाणार ? हे प्रश्न मनात उभे राहतं असतानाच तुमच्या आमच्यातूनच एक मदतीचा हात पुढे येतो आणि त्याच्या पुढील चार वर्षाच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलतो. हा हात असतो त्याच्या गुरुचा, आजवर ज्यांनी मार्गदर्शन केले, वेळोवेळी आधार दिला त्या गुरुचा... आपल्या प्रभूगुर्जी अर्थात विनायक प्रभू ह्यांचा.
ह्या अमरजीत प्रमाणेच तुमच्या आमच्या आजूबाजूला अनेक अमरजीत अशा हाताची वाट बघत असतील. हा हात त्यांच्यापर्यंत पोचवा. सध्या हा हात फक्त मुंबई पुरताच मर्यादित आहे, पण लवकरच तो सगळ्या भारतात उपलब्ध होईल हे निश्चित. प्रभू गुर्जींची तुमच्या आमच्या कडून ह्या कार्यासाठी एकाही पैशाची अपेक्षा नाही. अपेक्षा फक्त येवढीच आहे की असे एखादे बुद्धिवान रोपटे तुमच्या आजूबाजूला असेल तर ते सुकू देऊ नका.
ज्या विद्यार्थ्याने बारावीच्या यशा बरोबरच CET मध्ये १६५+ मार्क मिळवले असतील आणि ज्याच्या घरचे उत्पन्न वार्षिक २,४०,००० पेक्षा कमी असेल (आणि खरेच असेल, अन्यथा घरी मार्बल टाईल्स असताना देखील असे उत्पन्न कमी असल्याचे दाखले देणारे देखील काही महाभाग आहेतच) आणि ज्याला शासकीय महाविद्यालयात इंजिनीअरिंग अथवा मेडिकल, डेंटल साठी ऍडमिशन मिळत असेल त्या मुंबईच्या गरजू विद्यार्थ्यांची जबाबदारी उचलायला हा हात समर्थ आहे.
गुर्जींच्या कार्यात तुमचा देखील थोडाफार हातभार ह्या निमित्ताने लागावा येवढीच ह्या लेखनाची अपेक्षा. अजूनही काही माहिती हवी असल्यास प्रभू गुर्जी ह्या धाग्यावर ती देतीलच. तसेच लेखनात अजून काही कमी असल्यास ते गुर्जींच्या प्रतिक्रियेत वाचायला मिळेलच.
वाचने
6366
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा!!! प्रभुगुर्जी
खुप चांगले कार्य सुरुवात केले
+१
In reply to खुप चांगले कार्य सुरुवात केले by नरेशकुमार
अशी माणुसकी व असे लोक आहेत
प्रभू की माया अपरंपार है !
चांगला उपक्रम! जरुर सामील
केवळ
In reply to चांगला उपक्रम! जरुर सामील by आनंद
उत्तम उपक्रम.व पुढील
क्षेत्र
धोपट मार्ग
In reply to क्षेत्र by विनायक प्रभू
टार्यास अणुमोदण दिल्या गेले आहे!
In reply to धोपट मार्ग by टारझन
अगदी अगदी....
In reply to टार्यास अणुमोदण दिल्या गेले आहे! by चतुरंग
सहमत
In reply to धोपट मार्ग by टारझन
आम्हाला प्रिय भारतिय आर्मी !
In reply to धोपट मार्ग by टारझन
सहमत आहे. आर्मी इंजिनियरिंग
In reply to धोपट मार्ग by टारझन
पुण्यातल्या CME मधे याचा
In reply to सहमत आहे. आर्मी इंजिनियरिंग by llपुण्याचे पेशवेll
नक्कीच! पूर्वी गुर्जींचे लेख
सुचना
व्वा..!
आवड महत्वाची
येस , वी आर !
In reply to आवड महत्वाची by स्पा
जाऊ दया हो...
In reply to येस , वी आर ! by टारझन
कोण टारझन का? असो .
चांगले कार्य
खुप छान उपक्र्म....
चांगला उपक्रम