मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रावण

विजुभाऊ · · काथ्याकूट
१) रामायणातील लढाई संपवायची रावणाला इच्छा होती . त्याला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप झाला होता. पण एक प्रश्न पडल्यामुले समेट होऊ शकला नाही. माफी कुठल्या तोंडाने मागायची? २) रावण शाळेत असताना त्याला नेहमी मागल्या बाकावर बसवायचे. कारण पुढच्या बाकावर रावण बसला की कोनालाच फळ्यावर लिहीलेले दिसायचे नाही ३)रावणाचे डोके दुखू लागले. त्याला डॉक्टरानी झेन्डू बाम दिला. थोड्यावेळाने रावण परत आला. डॉक्टर कोणते डोके दुखतेय तेच कळत नाहिय्ये . ४) कुठलीही गोष्ट रावणाला सांगितली की ती षटकर्णी आपोआपच व्हायची. ५) लहानपणी रावण कंटाळला की कान गोष्टी खेळायचा. ६) रावण आला की सलुनमधल्या सगळ्या खुर्च्या बीझी व्हायच्या. ७) रावन एकाच वेळेस टोटल बाल्ड , गझनी , लीओनार्दी काप्री , तेरेनाम ,अमिताभ बच्चन , रीवर्स स्विन्ग , क्र्यू कट , सोल्जर्स कट या सगळ्या हेअर स्टाईल्स वापरायचा. डिस्क्लेमर : हा धागा पूर्ण टाईमपास म्हणून काढलेला आहे. धाग्यात लिहीलेली मते ही लेखकाची असतील असेच नाही.

वाचने 21880 वाचनखूण प्रतिक्रिया 104

शेखर Tue, 06/14/2011 - 00:50
एकदम चान चान... डिस्क्लेमर: हा प्रतिसाद पूर्ण टाईमपास म्हणून दिलेला आहे. प्रतिसादात लिहीलेली मते ही प्रतिसादकाची असतील असेच नाही.

वाटाड्या... Tue, 06/14/2011 - 02:17
तर रावण १०-१० टोप्यापण घालायचा.....अदलुन बदलुन ..:) शिवाय एकाच वेळेला १० प्रकारच्या दारु आणि मुखशुद्धी पावडरी पण खायचा !! :)) लहानपणी म्हणे रावणाच्या आईला त्याच्या नक्की कुठल्या तोंडात भडकावुन द्यायची हा प्रश्न असायचा... शिवाय रावण ज्या गल्लीत जायचा त्या गल्लीतील ट्रॅफिक दुसरीकडे वळवायला लागायची म्हणुन त्याला कोणीच बाहेर न्यायचे नाहीत. - वानर वाट्या...

In reply to by शैलेन्द्र

सोत्रि Wed, 06/15/2011 - 12:20
__/\__ __/\__ __/\__ म्हणजे गोगोल ह्यांचा प्रतिसाद खंग्री, आणि त्या प्रतिसादावरचा हा प्रतिसाद महाखंग्री :) - (एक् मुखी आणि एक XX) सोकाजी

नरेशकुमार Tue, 06/14/2011 - 05:25
(विचार करन्याची अजिब्बत इच्छा नसतानाही बळजबरी) विचार करायला लावनारी पोस्ट. . . . मला वाटले की रा-वन बद्द्ल काही असेल. पन पदरी सॉरी खिशात निराशा पडली. . . . बरं ते जाउंदे, रावन अल्प्संख्यांक होता का ?

राजेश घासकडवी Tue, 06/14/2011 - 07:07
लोक एका डोळ्याने तिरळे असतात, रावण अठरा डोळ्यांनी तिरळा होता. कुठच्याही साध्या म्युझिकसिस्टिमवर गाणं लावलं तरी रावणाला ते डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड ऐकू यायचं. रावणाच्या क्रिकेटच्या टीमचं हडल खूपच मोठ्ठं व्हायचं. रावण टाइमपास हिंदी सिनेमे बघत नसे, कारण डोकं बाजूला ठेवणं म्हणजे त्याच्या दृष्टीने खूप कटकट होती. रावणाने गांधीवादाचा प्रयत्न सोडून दिला कारण एका गालावर थोबाडीत मारली दर त्याला एकोणीस गाल पुढे करायला लागत.

In reply to by श्रीरंग

विजुभाऊ Mon, 07/25/2011 - 15:05
मंदोदरीने रावणाला "ए.ऐक ना.एक माणूस की नाही बाब्बा होण्णार आहे" असे कोणत्या कानात सांगितले असेल?

योगप्रभू Tue, 06/14/2011 - 09:09
रावण महालात आला, की मंदोदरीला नसता ताप व्हायचा. एकतर त्याच्या दहाही तोंडांना घाण वास यायचा. बोलताना दहाही तोंडातून थुंकी उडायची. दहा तोंडांची बडबड असह्य व्हायची रावण लाडात आला, की 'दहाचा पाढा' कधी संपतो, असे तिला वाटायचे. चार तोंडे असलेल्या ब्रह्मदेवांची पत्नी सरस्वती कशी आनंदात वीणा वाजवत बसलेली असते, याचे मंदोदरीला नेहमी कुतुहल वाटे. एकदा तिने तसे विचारलेसुद्धा. त्यावर सरस्वती म्हणाली, 'अगं आमच्या यांना पुस्तक वाचायचा नाद आहे. जेव्हा बघावं तेव्हा कसली तरी जडजड पुस्तकं वाचत बसतात. चांगलं आहे ते. मला कटकट नाही. म्हणून तर वीणावादनाचा छंद जोपासता आला.'

In reply to by योगप्रभू

टारझन Tue, 06/14/2011 - 10:09
ब्रह्मदेवांची पत्नी सरस्वती कशी आनंदात वीणा वाजवत बसलेली असते
ब्रम्हा हे सोलो सेक्शुअल(चुभुद्याघ्या) असुन सेल्फ रीप्रोडक्टिव्ह होते . त्यातुन त्यांनी विष्वाची निर्मीती केली शिवाय सरस्वती ची ही केली . त्यामुळे सरवस्ती त्यांचं कन्यारत्न होतं . अधिक प्रकाश जाणकार टाकतील .

In reply to by योगप्रभू

विजुभाऊ Tue, 06/14/2011 - 15:38
चारही दिशाना तोंडे होती म्हनून ब्रम्हदेवाला राग आला म्हणून तोंड फिरवुन बसता यायचे नाही. शंका : ब्रम्हदेव झोपत कसा असेल. सरळ /उजव्या डाव्या कुशीवर की पालथा ?

१)रावणासाठी कोणत्याच कंपनीला हेड फोन विकसित करता आला नाही. २)तसेच रावणाला लहानपणी मऊ-मास-भात भरवायला १०आया लागायच्या. ३)एकदा एनाकोंडानी रावणाला गिळायचा प्रयत्न केला,पण तोच मुंडक्यावर पडला. ४)शिवाय रावणानी ब्रम्हदेवाकडे,अनेक ईतर कारणास्तव शरिराचे अवयवही वाढवुन मागितले होते,पण त्याचा चालु पसारा पाहुन ब्रम्हदेवाने ही मागणी फेटाळली....

शानबा५१२ Tue, 06/14/2011 - 09:58
रावण एका तोडांने पान खायचा व सर्व तोंडे लाल व्ह्यायची.करण ती ईंटरकनेक्टेड होती अशी माहीती एका गाईडने सांगितली होती.

अभिज्ञ Tue, 06/14/2011 - 10:19
रावण दहा सिगारेटचे एक पाकिट एकदम संपवत असे. रावण सलून मध्ये गेला कि न्हाव्याला त्याचे काम दिवसभर पुरत असे. एका डेंटिस्टने तर रावणाला सिरॅमिकच्या कवळ्या बसवून एका दिवसात नवीन "रिट्झ" घेतल्याचे ऐकिवात आहे. :) आणि सर्वात महत्वाचे रावण हा "पायाळु" होता. ;) अभिज्ञ.

अमोल केळकर Tue, 06/14/2011 - 10:45
५) लहानपणी रावण कंटाळला की कान गोष्टी खेळायचा. - हे खास आवडले अमोल

नरेशकुमार Tue, 06/14/2011 - 11:09
रावनाने मिपावर सदस्यत्व घेतले, त्याने एक लेख लिव्हला आनि त्यानेच खंडीभर प्रतिक्रियांचा पाउस पाडला. . . रावनाला १० नाही तर १०० तोंडे होती. असे ऐकुन आहे. कोनि खुलासा करेल काय ?

विजुभाऊ Tue, 06/14/2011 - 14:30
रावण औट झाला की त्याची क्रीकेट ची व्हायची. त्याची विकेट घेणाराला एका डावात संपुर्ण संघ गारद केल्याचे समाधान मिळायचे रावण विकेट किपिंग करायचा तेंव्हा ३ स्लीप दोन गली आणि चार लेग स्लीप ही ठरलेली फिल्ड अ‍ॅरेन्जमेन्ट असायची .

५० फक्त Tue, 06/14/2011 - 15:17
१. रावण एकटाच लंकन आयडॉल मध्ये भाग घ्यायचा आणि महाफायनलचा महाविजेता व्हायचा. २. होळीला रावण एकटाच दहा वेगवेगळ्या स्टाईल्नं बोंबलायचा.

In reply to by विजुभाऊ

टारझन Tue, 06/14/2011 - 16:05
हारांची ऑर्डर नोंदवली होती.
दिल हारा रे ... दिल हारा रे ओ दिल हारा रे दिल हारा .. दिल हारा रे ... दिल हारा रे ओ दिल हारा रे दिल हारा .. दिल हारा रे ... दिल हारा रे ओ दिल हारा रे दिल हारा .. दिल हारा रे ... दिल हारा रे ओ दिल हारा रे दिल हारा .. - दिलहारा फर्नांडो

रावणाला १० मेंदू होते कां? असतील तर प्रत्येक मेंदू स्वतंत्र होता कां? स्वतंत्र असतील तर त्यात समन्वय कसा होत असेल? त्याचे सगळे मेंदू एकदम काम करत असतील कां? विचार करतांना नक्की कोणता मेंदू वापरायचा हे ठरविण्यात त्याचा किती वेळ जात असेल?

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

आनंदयात्री Tue, 06/14/2011 - 19:52
अरे वा .. म्हणजे रावणाला पॅरॅलल कॉम्प्युटिंगचा जनक म्हणता येईल. बरे झाले अजुन एका पेटंटसाठी आता भांडता येईल. कॉलिंग सर्किट, कॉलिंग सर्किट ! !!!

In reply to by सूड

पिशी अबोली Mon, 08/12/2013 - 23:02
नाही. रावण नऊ तोंडांनी वेगवेगळ्या खाद्य प्रकारांचा आस्वाद घ्यायचा आणि शेवटच्या तोंडाने एरंडेल प्यायचा.

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन Sat, 08/17/2013 - 15:47
मोरोपंतांच्या "त्या" आर्येत साखरेऐवजी एरंडेल घालता येईल तर मग =)) उदरकंडुअतिशमनार्थ तेलें एरंडेलें प्यावी | तेही नसतां मग.....रिकामी जागा पाहिजें तशी भरावी || :P :P

तिमा Tue, 06/14/2011 - 19:12
रावण रामरक्षा म्हणायला लागला की आरेसेस ची शाखा भरलीये असं वाटायचं.

मी-सौरभ Tue, 06/14/2011 - 19:26
रावण एक्टाच ग्रुप डिस्कशन करत असे.. पण एका डोक्याला कसे सिलेक्ट करायचे हा प्रश्न असल्याने पुढ्च्या राउंड ला सीलेक्ट होत नसे.

In reply to by विजुभाऊ

टारझन Wed, 06/15/2011 - 09:53
हेल्मेट सक्तीला रावणाचा प्रखर विरोध होता
च्यायला .. असंही होतं होय :) तरीच पाकिटमार होता तो ;)

In reply to by विजुभाऊ

हेल्मेट सक्तीला रावणाचा प्रखर विरोध होता.
ऑ ? आम्ही तर धृतराष्ट्राचा विरोध होता असे ऐकले होते.

इरसाल गुरुवार, 06/16/2011 - 11:22
ह्यो खरा..... ह्याला ९ तोंड कि ह्यो... आणि ह्याला १० नक्की कोणता खरा ? कि ह्यो

In reply to by नरेशकुमार

टारझन Fri, 06/17/2011 - 10:15
त्या मंदोदरी रॉय मधे लोकांना काय दिसतं कुणास ठाऊक ? टमाट्याचा क्रॉससेक्शन कुठली ;) त्यापेक्ष्या त्या अबु हजामाची सुन पळवुन आणने वर्थ आहे ;) - टारेशा नोकिया

In reply to by टारझन

त्यापेक्ष्या त्या अबु हजामाची सुन पळवुन आणने वर्थ आहे
टार्‍याच्या कार्यास सुयश चिंततो व लागेल ती मदत देण्याचे कबुल करतो. लष्करे परोबा

विजुभाऊ Fri, 06/17/2011 - 10:53
यापेक्ष्या त्या अबु हजामाची सुन पळवुन आणने वर्थ आहे अरेरे .काय हे अध्ध्ध्ध्ध्पत्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्न्न्न्न्न्न्न कोण्या भल्या माणसाने कल्याणच्या सुभेदाराची सून साडी चोळी खण नारळ देवून पर्त पाठवलीहोती म्हणे. बहुतेक इथले मावळे पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करताहेत. तुम्ही लाख सुना पळवून आणाल .तुमचे थोरले आबासाहेब तुमच्यावर नजर ठेवून आहेत हे लक्ष्यात असू द्या.

In reply to by विजुभाऊ

टारझन Fri, 06/17/2011 - 11:03
कोण्या भल्या माणसाने कल्याणच्या सुभेदाराची सून साडी चोळी खण नारळ देवून पर्त पाठवलीहोती म्हणे.
कमॉन अं विजुभाउ ... आम्ही साडीचोळी अन खण नारळ देऊन परत नाही पाठवणार .. यापेक्षाही छाण छाण नजराणे देऊ :)

In reply to by टारझन

भारी समर्थ Fri, 06/17/2011 - 11:46
नजार्‍यांशिवाय नजराणे कुठले द्यायला तुमी (आमी)... तिथं व्हर्जिनल (बिर्जे) अडला होता जंगलात काटकर म्होरं, तुमची काय कथा महाराज.... भारी समर्थ

>> मंदोदरीची ऐश होती हं पण Smile १०-१० व्हेरियेशन्स मग वटपौर्णिमेचं काय ?

In reply to by नर्मदेतला गोटा

वपाडाव Tue, 07/19/2011 - 12:13
** मंदोदरीला वटपौर्णिमेच्या दिवशी फेर्‍या मारुन चकरा यायच्या..... ** अंगाईगीत गाताना रावणाच्या आईसोबत ९ दासी आजुबाजुला बसुन रावणाचे डोके मांडीवर ठेउन थोपटत असत.... ** रे-बॅन कंपनीने रावणासाठी गॉगल बनवण्याकरिता वर्ल्ड बँकेकडुन कर्ज घेतल्याचे ऐकिवात आहे..... ** रावणाला वाईड बॉल टाकण्याचे रेकॉर्ड श्रीसंतच्या नावावर आहे.....

विजुभाऊ गुरुवार, 07/26/2012 - 14:05
@ रावणाच्या मोबाईल ला दहा ब्ल्यू टूथ होते @ दात घासताना रावणाला दहा ब्रश काठीला प्यारलल बांधावे लागायचे. @रावणाचा भांग पाडताना दहा मिनी ड्राफ्टर प्यारलल काम करायचे @ रावण शाळेत शीर्शासन कधीच पडायचा नाही @ रावणाला त्याच्या सरानी "डोक्यावर पडलास का?" असे कधीच विचारले नाही. @ रावणाला परीक्षा हॉल मध्ये एकटाच बसवायचे. तो एकाच वेळेस प्रत्येक प्रश्नाचा स्वतंत्र विचार करु शकायचा

In reply to by विजुभाऊ

मदनबाण Sat, 07/28/2012 - 11:38
अरे वा... इजुभाऊ परत एकदा रावण रावण खेळायला लागले वाट्ट ! मागच्या जन्मी तुमच्या जिगरी दोस्त होता वाट्ट ! ;) असो... आता सगळे इतके रावणावर प्रेम दाखवत आहेत,तर मी म्हणतो... मागे कशाला रहावे ? जरासा चावटपणा करुन घेतोच ! ;) रावणाला दहा डोकी आणि २० डोळे असले; तरी सुंदर स्त्रीया पाहिल्यावर त्याच्या एका *जागी फार ताण यायचा ! ;) (*हॄदयावर... आले लगेच सगळे इथे काय लिहलं आहे ते वाचायला !)

विजुभाऊ Mon, 08/12/2013 - 02:24
१)रावणाने ग्राहक मंचात जावुन नये म्हणून जिलेट ने प्रेस्टो ची जहिरात बदलली. अगोदर ती एक ब्लेड करे काम दस दिन. अशी होती. ती बदलून जिलेट ने नंतर ती एक ब्लेड दस शेव अशी केली. २)रावण विमानात बसल्यावर दहाही सीट्स ऑक्युपाय व्हायच्या. दहा ही तोंडाना खिडकीला नाक लावून बसण्यासाठी मारामारी करावी लागायची. ३)रावण डोके दुखू लागले की अ‍ॅनासीन ची अख्खी स्ट्रीप संपवायचा. ४)रावणाला स्पॉन्ड्युलायटीस झाला होता. ५)तो स्टाफ पैकी कोणालाच डोक्यावर चढवून ठेवायचा नाही. ६)रावणाला हिन्दी फिल्म मध्ये इर्शाद हशमी सारखा रोल हवा होता. चुंबन दृष्यातच सगळी फिल्म सम्पायची म्हणून रोल मिळाला नाही

arunjoshi123 Mon, 08/12/2013 - 17:18
रावणामधे मध्यप्रदेशच्या दहा मंत्र्यांकडून एका झटक्यात राजीनामा घ्यायची क्षमता होती.

बहुगुणी Tue, 08/13/2013 - 00:47
अरे वा... इजुभाऊ परत एकदा रावण रावण खेळायला लागले वाट्ट ! मागच्या जन्मी तुमच्या जिगरी दोस्त होता वाट्ट ! smiley असो... [बाकी १९९० चं भारतरत्न अ-भारतीय डॉ. नेल्सन मंडेलांना दिलं होतं, तेंव्हा लंका-रहिवासी रावणालाही चान्स आहे ;-)]

बाळ सप्रे Wed, 08/14/2013 - 10:46
श्रीलंकेच्या संस्कृतीत रावणाचे स्थान काय असेल? देव की दानव? की त्यांना माहितीच नसेल की भारतात एक व्हिलन लंकेतला म्हणून इतकी वर्ष ओळखला जातोय!!! :-)

नशीब रावण स्त्री नव्हता ...नाहीतर किलकिलाटाने बिच्चार्‍या मंदोदरीचा जीव गेला असता =))

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड Mon, 08/19/2013 - 15:23
आता तो रावण जर स्त्री असता तर मंदोदरी कशाला आली असती त्याच्या आयुष्यात. आणि समजा आलीच असती तर तिला दहा तोंडांच्या आपल्या या मैतरणीची कंपनीच नसती का मिळाली!!

प्यारे१ Sat, 08/17/2013 - 00:01
आजचा सवाल वर निखिल वागळे बरोबर रावण एकटाच(?) बोलायचा. नि तरी निखिल त्याला 'मी तुमच्याकडं नक्की परत येतो आत्ता मला ट्राय च्या नियमानुसार कम्पल्सरी ब्रेक घ्यावा लागणार आहे ब्रेकपूर्वी प्रश्न पहा असं म्हणायचा.... ;)

म्हैस Mon, 08/19/2013 - 11:56
रावानाबद्दाल हे असल लिहिलेल थिक अहे. पन ब्रह्म देवन बद्दल ? हिन्दु धर्मा बद्दल साध्या साध्या गोश्ति माहित नसनअरे मुसल्मान , ख्रिस्चान का होत नहित ? सरवस्ती त्यान्चि मानस पुत्रि होति. त्यान्च्या पत्निचा नाव सवित्रि. मूर्खा मुलिशि कोनि लग्न कर्त का?

विजुभाऊ Mon, 08/19/2013 - 15:18
म्हैस काका/ताई मौशी ब्रम्हदेवाच्या या गुणापायीच त्याचे कोठे मंदीर बांधत नाहीत. (अपवाद:पुश्कर) त्याला बेटीचो* असेही म्हंटले जाते. हिंदु धर्माबद्दल एवढ्या साध्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील असे वाटते

म्हैस Tue, 08/20/2013 - 14:42
विजुभाऊ ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्यांची पूजा करत नाही ह्या मागे वेगळी गोस्त आहे. त्याचा कारण सरस्वतीशी लग्न हे नाहीये. ब्रह्मदेव , गाय आणि केतकी ची फुले अश्या तिघांना ह्या गोष्टीत शाप मिळालाय. आणि विष्णूंना आशीर्वाद मिळाला कि तुम्ही प्रत्येक अवतारात पूजनीय असाल. सांगा बारा हि कोणती गोष्ट आहे.? माहित आहे न तुम्हाला बेसिक गोष्टी.